Thursday, November 17, 2011

फक्त तुझ्यासाठी ... भाग १५


आज तर कसली झोप अन कसली स्वप्न... काहीच उमगेनास झालं होत... खरच मी त्याला ओळखते??? मला कल्पनेतही नव्हत वाटल तो अस वागू शकतो...
सारी रात्र कुस बदव्ल्यात घालवली... स्वप्नांची जागा मग आठवणींनी घेतली...
सार सार डोळ्यासमोर फिरू लागलं...
त्याचं अन माझं नात डोळ्यासमोर दिसू लागलं...
आठवण्या साऱ्या आठवू लागल्या...
काही बोलू तर काही चिडवू लागल्या...

काही तेव्हाच्या जेव्हा सार विसरून , तो माझं ऐकत राहायचा...
सार बोलून झाल्यावर प्रत्येक गोष्टीवर हसत राहायचा...

काही अलीकडच्याच स्वप्नात घेऊन गेल्या...
तो माझा अन मी त्याची सांगू लागल्या...
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद......
जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर दिलेला त्याने...
भरपूर वेळा हसवून,
तर कधी रागवून योग्य रस्ता दिला त्याने...

किती विचित्र असतात या आठवणी
त्याचीच आठवण त्यालाच आठवू लागली...
काही सांगत काही विचारत
त्याच्या आठवण पाशात गुंढाळू लागली...
दिवस तिसरा:
सकाळी उठूच नये अस वाटत होत...
उठूनही काय करणार होते... पण तरीही उठले... बसले ओर्कुट वर... त्याचा प्रोफील उघडून बसले... कमीत कमी १०००० वेळा पाहिलं असेल पण तरीही पुन्हा पाहू लागली...
काय करू कि तो बोलेले समजत नव्हत... खर तर त्यान न बोलणच मला समजत नव्हत... काय होतय??? का होतंय??? काही काही समजत नव्हत... समजत होत तर इतकच कि त्याच्या शिवाय मला राहता येत नाहीये... स्वतःला सांभाळता येत नाहीये... पण काही गोष्टी तर नाही ना सुटत... या कारणामुळे बाकी जगाशी मी केलेले करार तर नाही ना तुटत... म्हणूनच इच्छा नसतांनाही तयार झाले ऑफिसात गेले... पण त्याचाच विचार मनात... फक्त मनात नाही जीवनात... त्याला किती वेळा पिंग केल मलाच ठाऊक नाही... डोळे तर फक्त उत्तर येईल म्हणूनच थांबून होते... वेद हे मन, सगळ माहित होत त्याला कि तो नाही करणार उत्तर पण त्याने आपलाच लाऊन धरल...
अचानच मनात विचार आला... त्याला नसेलच बोलायचं तर उगाच मी का म्हणून वाट पहावी... त्याला खरच माझा कंटाळा आला असेल तर??? होऊ शकत ना!!! मा उत्तरही मनातूनच आल... त्याला कंटाळा येत असता तर डॉक्टर असूनही इतका वेळ नसता बोलला तो... काम करतो फक्त तेव्हा जेव्हा मी सांगते कि कर... नंतर बोलू... कधी नाही कारण दिल कि मी कामात आहे... मग कसा कंटाळा येईल...
मग काय कारण असाव??? अचानक का मी अशी नकोशी झाली मी त्याला... आठवतय त्या रात्री मला झोप नव्हती येत मला तर तो पण बसूनच होता... बोलत नव्हता काही पण सार काही ऐकत होता... “आहेस का???” पडताच
“मंद तू आहेस मी नाही, तेवढ कळत मला... बोल तू... आहे मी इथंच... नेहमीच असेन...”
मग अचानक काय झालं इतक??? कि तो बदलला??? फक्त फोन नाही केल म्हणून??? अचानक का सांगितल त्याने फोन करायला... अन नाही केल फोन म्हणून इतक??? बर झालं मी नाही म्हटले, नाहीतर कळल नसत कि तो अस पण वागू शकतो... इतका कठोर इतका खडूसपणा... इतका हट्ट??? हट्ट कसला हा तर चक्क गर्व करण आहे... का??? मला नाही ओळखत तो??? त्याला नाही माहित कि मी दुखावेल??? अस कस वागू शकतो तो???
मला माहित आहे बसला असेल स्क्रीन समोर... पण उत्तर नाही देत... कस अस वागू शकतो तो??? तोच काय ओनीही कस काय वागू शकतो असं???
संध्याकाळी घरी आले... मन उदास होत... काय करू समजत नव्हत... पुन्हा उघडून बसले त्याचा प्रोफील... बघत बसले... त्याला पिंग केलं खूप खूप लिहलं... पण काहीच उत्तर नाही...जस जगायचं करणाच गेल माझं... कशातच मन रमेना काही केल्या मन शांत होईना... एकदा तर मनात आल... साल खूप त्रास होतोय... मिटवून टाकूया हा त्रास... काय करायचं त्याच्याशी बोलून कोण तो??? मला तर हे पण माहित नाही तो दिसतो कसा... वागतो कसा... फक्त तो माझं ऐकतो... माझ्या सोबत असतो... मला सांभाळतो... म्हणजे अस नाही कि तो नाही तर माझं जगन थांबून जाईल... तो नव्हता तेव्हाही तर जगत होते ना मी... मग आता तो नसेल तरीही काय फरक पडणार... काही दिवस त्रास होईल... बोलायला कोण नसेल... माझी काळजी घ्यायला... मला मंद म्हणत समजावणारा नसेल ना...
सार सार विचार करतांना डोळ्यात पाणी आलं... नाही मी नाही राहू शकत अस... पण मी काय करू समजत नव्हत... काय होतंय??? का होतंय??? काय करू???
तितक्यात लक्ष गेलं ते आजच्या गिफ्टवर... मी डोळे पुसले आणि गिफ्ट बघू लागले... दैनंदिनी??? Scrapbook??? नेमकं काय आहे यातच गुंतले मी... मला??? काय रे... आज पर्यंतची गिफ्ट किती सुरेख आहेत... अन आज काय हे अस सुचल त्याला...
नाक मुरडायची काहीच गरज नाहीये... आणि हो हि तुझी सोबती... ना दैनंदिनी, Scrapbook ना poetic diary… फक्त तुझी सोबती... कारण काही गोष्टी असतात ज्या सांभाळून ठेवायच्या असतात...
My Diary tells me who I am
Or who I want to be
Its a mirror to my life
and my colorful personality!
Captured in it are moments of life
I feel best not to share
From jokes & secret crushes & wishes
More exciting than a fair!
Muses & muses - all that poetry stuff
Creativity is let loose, Beware!
From 'Thoughts' to 'Sunset'
From 'Nose to Head'
To words - that can a peeping Tom scare...
पण हे माझ्यासाठी... तुझ्यासाठी नाही... असूही शकत पण माझी काही जबरदस्तीनाही... वाटलाच तर लिही ते क्षण जे तुला साम्भालावेसे वाटतात... जे तुला वाटत कि कधीच हरवू नये... धुसर होऊ नये... गंजू नये... विसरू नये... महतीय तू एकटी आहेस... म्हणूनच देतोय...
हो पण हि तुझी सोबती तुझ्याच सोबत राहील पण... पण हि क्षण सांभाळू शकते तयार नाही करू शकत... ते क्षण जगायची अन मिळवायची जबाबदारी तुझी... अन सांभाळायची तिची...
‘काही गोष्टी, काही सवयी अन काही व्यक्ती अनमोल असतात... त्यांना जवळ ठेव... सांभाळ... या तुझ्या सोबतीनिमध्ये... अन पर्यायाने आयुष्यात...
टीप: जमेल असेल समजवायला(... तत्वज्ञान...) अशी अपेक्षा करतो अन नसेल जमल तर... काही नाही यार... फोटो, कविता, पत्ते काहीही लाव... मजा कर... फक्त हसत राहा... नाही पाहवत तुझा उदास चेहरा...
काय बोलला तो??? या पेक्षा का बोलला याचा विचार जास्त करू लागले... मी तर ऑफिसात कुणालाच नाही जाणवू दिल कि मी उदास आहे... चक्क दि ला पण नाही जाणवलं... मग याला??? कस??? का??? आणि याला बोलायचं तरी काय???
काही नाही समजलं तर एकच काम करते मी... केलं सुरु... त्याचं प्रोफील पाहू लागले...
इतक्यात...
तुझी आठवण आली कि
मि आकाशाकडे बघते,
अन् तू बोलशील हे मागयासाठी
तारे तुटन्यचि वाट् बघत् राहते!!!
वाफ़ळत्या चहात् सुध्दा तुझाच रंग असतो..
त्या रंगात हरवून जाते,
तुला बघण्यात अन आठवण्यात

चहा मात्र थन्ड् होवुन् जातो!!!
प्रत्येक् वेळि आरशात् मात्र
फ़क्त् तूच मला दिसतो,
अन् तुला निरखुन् पहान्यात माझे आवरणे नेहमि रहाते!!!
ऑफिसात काम करण्याचा वायफळ प्रयत्न
करत करत दिवस काढते,
अन तुझ्या उत्तराच्या अपेक्षेत,
माझ्या टेबलावर फायलींची रंग वाढते...
फक्त तुझ्यासाठी...
त्याला मेल केला... अन एका मिनटात...
“इतकच बोलायचं असेल तर फोन कर... नंबर पाठवत आहे...” हलकट पणा तर जन्मापासून घेऊन आला असेल ना... खडूस...
काय करू... दुसरा पर्याय नाहीच... म्हणून...
“ठीक आहे... पण तुला पण माझं एक ऐकाव लागेल... तुला तुझा फोटो पाठवावा लागेल... अन माझा मागणार नाही याची शास्वती द्यावी लागेल...” मी उत्तर दिल...
{आता काय करू हरले तर मी आहेच... काही त्यान तर काही माझ्या मनाने हरवल मला.. पण स्वीकारणार नाही सहजासहजी... म्हणून मी पण माझी अट टाकली... अन त्याचा फोटो भेटेल याची अपेक्षा करू लागले...
तो नाही म्हणू शकताच नव्हता... कारण एका मिनिटात उत्तर आल म्हणजे तो पण बोलायला झुरत होता अन माझीच वाट पाहत होता हे निश्चित झालं तर...}

आता हि रात्र कशी जाईल???
त्याच्याशी काय बोलू??? त्याला नाही आवडला आवाज तर??? त्याचा फोटो देईन ना तो??? नाही दिला तर??? मग नको करू फोन??? अजून अबोला सहन करू???
अन दिलाच... तो कसा दिसत असेल??? पहिल्यांदा पाहणार त्याला... हि रात्र... हि रात्र... हि माझ्या जीवाची वैरी रात्र कधी जाणार??? कशी जाणार???

0 comments:

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)