पण तो तरी कसा राहील??? नाही... अस नाही होऊ शकत... मी तर त्याच्यासाठी झुरतेच... पण तो पण तर रोज न सांगता वेळेवर येतो बोलायला... मला भेटायला... माझं ऐकायला... माझ्याशी बोलायला... बोलायला नाही... chat करायला... काय इतका फरक आहे कुणास ठाऊक... मला तर नाही जाणवत... त्याला जाणवतो का??? आणि असेलही तरी इतका कि त्यान माझ्याशी बोलू नये??? नाही... अस नाही होणार... उद्या सार विसरून जाईल तो... हे काय पहिल्यांदा भांडतोय होय??? मला तर आठवतही नाही एव्हाना किती वेळा भांडलो असणार आम्ही... कारण सुद्धा लागत नाही भांडायला... मुळी कारण नसताच कधी... आपल उगाचच भांडतो आम्ही... त्यामुळे नाही कधी मनावर घेतलं... आणि बहुतेक वेळा... नाही... प्रत्येक वेळा... मीच स्वतःहून बोलते... खडूस नाही बोलत स्वःताहून... पण नाही बोलत असहि नाही... मी सुरु केल्यावर कधी काही झालच नव्हत अश्या अविर्भावात बोलू लागतो... त्यामुळे मला कधी त्याच टेंशन नाही आलं... पण आज का कुणास ठाऊक मन घाबरत आहे... शंकेची पाल मनात चुकचुकत आहे...
कुणीच नाही बोलायला...
माहित आहे कस वाटत मनाला तेव्हा,
कुणीच नसत बोलायला जेव्हा...
सार सार अपूर्ण अधुर वाटत असत,
सगळ बरोबर असूनही काहीतरी कुठतरी चुकत असत...
मग वाटत मी नाही कुणाची ना कुणी माझा,
वीट येतो अश्या एकट जगण्याचा...
रुसत हे मन माझे,
माझाशी पण बोलत नाही...
कुणीच नाही बोलायला, “तो एक” पण नाही,
हे त्या वेड्याला पटत नाही...
माझाशी पण बोलत नाही...
कुणीच नाही बोलायला, “तो एक” पण नाही,
हे त्या वेड्याला पटत नाही...
या विचारांनी मन तर अगदी भरून गेल... इतक कि काय सांगू... म्हणून म्हटल जरा वेगळा विचार करुया... मन कशात तरी गुंतवू या... तितक्यात समोर एक लिफाफा दिसला... मग काय हळूच कपळावरची आढी जाऊन स्मित हास्य आलं... आजचं गिफ्ट... काय करू मी पण??? नाही राहत लक्ष्यात माझ्या... काय करू??? पण का करू??? मी नाही सांगत त्याला कि पाठव म्हणून... न सांगताच पाठवतो ... उगाचच... वरून नाव देखील सांगत नाही... मी तरी काय करू... माझ्या जागी दुसर कुणी असत तर फेकून दिले असते सगळे... मीपण विचार केला कि द्याव फेकून...पण काय करू??? खरच सुरेख असतात गिफ्ट... अन जणू रोज रोज तेवढाच विचार करत असावा तो... कि काय द्याव आज... कारण रोज नाविन्य अन वेगळेपणा उठून दिसतो ना गिफ्ट मध्ये... मग आज काय??? लिफाफा तर छोटा आहे... पण खर तर विचार करूनही उपयोग नव्हता... तो काय देईल याला काहीच नेम नव्हता...
उघडला लिफाफा... पत्र होत आज... पुन्हा मानाने सावध पवित्र घेतला... जो पहिल्या ओळीतच तुटला...
नाही नाही... आज पण प्रेम पत्र नाहीये...
माहित आहे तू खूप छान कविता करते... पण तुझ्यावर कविता नाही केली तू कधी... मग म्हटल चला मीच करून पाहतो... आवडली नाही तरी चिडायचं नाही... आरामात घ्यायचं... पत्र फाडायचं नाही... आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे, हसायचं नाही... हे सारे नियम मान्य असतील तर पुढे वाच नाही तर ठेव बंद करून... तुझी मर्जी...
{आता हे खूप झाल,,, म्हणे नियम... चुलीत गेले याचे नियम... हा कोण आला मला सांगणारा... नाही वाचायचं मला...}
ठाम मत बनवलं आणि... ठेवल पत्र बाजूला... काय बिघडणार आहे तस पण??? कोण कुठला तो... ना मला ओळखतो ??? ना मला ओळख सांगतो... तस पण काय लिहू शकतो माझ्याविषयी???
अरे हो...काय काय लिहू शकतो माझ्या विषयी??? जाणून घेण्याची इच्छा तर आहे... तास पण आज पर्यंत माझ्यावर अस म्हणून testimonial आलीत फक्त... बस L
तस पण वाचल तर काय बिघडल... त्याला कुठ कळणार आहे??? त्याला वाटत असेल कि मी नाही वाचणार... हो हेच करते... वाचून घेते...
माहित होत नाही राहू शकणार वाचल्याशिवाय... मला माहित आहे तू सगळे नियम मान्य करशीलच... माझी जादुच तशी आहे...
आता मात्र माझं डोक फिरल... हे नाही सहन करणार मी... नाही म्हनजे नाहीच वाचणार... काहीही होऊन गेल तरी चालेल... जादू म्हणे... समोर असता ना तर सांगितल असत...
{मग काय??? झोपून घेतलं... आज पुन्हा अवचित घडल... झोपेतही मी एकटीच... त्याच्या स्वप्नांची वाट पाहत पाहत रात्र थकली पण स्वप्न नाही आल... मग मी अन रात्र दोन्ही निघालो त्याच्या स्वप्नांना शोधायला... खूप खूप शोधल्यावर दिसलीत...
“कोण तू?काय पाहीजे?"तुझी स्वप्नं अनोळखी नजरेने
पाहत मला विचारतात...
जसे कधी मला भेटलीच नाहीत
पाहत मला विचारतात...
जसे कधी मला भेटलीच नाहीत
अशाच पद्धतीने माझ्याशी वागतात...
काही केल्या त्यांना मी समजाऊ शकले नाही...
किंबहुना त्यांची समजून घ्यायची इच्छाच नाही...
..
..
.
तुझी स्वप्न सुद्धा खरच अगदी तुझ्यासारखीच आहेत...
तुझी स्वप्न सुद्धा खरच अगदी तुझ्यासारखीच आहेत...
माझ्याचसाठी असूनही माझ्याशी रुसत आहेत,
त्याच्याही मनात असत भरपूर
पण मीच बोलाव याची अपेक्षा करत आहेत... }
दिवस पहिला...
सकाळी उठले... अन नेहमी सारखं पहिले पाहिलं काही पाठवल आहे का त्याने??? काहीच नव्हत... मग काय त्याचं प्रोफील उघडून बसले जरावेळ... ऑफिसात गेले... जेवायच्या सुट्टीची वाट पाहू लागले...
सुट्टी होताच त्याला msg पाठवला... “हेय, हाय... कसा आहेस???”, पण काहीच उत्तर नाही...
“हेल्लो ........आहेस का ?...........कुठे आहेस ?.........ल्याब मध्ये कि घरी आहेस?...........बोलत
का नाहीस?............रागावलाय का माझ्यावर ?.............का रागावला?.....माहित नाही मला, पण तरीही आधीच sorry म्हणते ........पण बोल रे ...........उगाच नाटक नको करूस ........कधीची वाट बघतेय तुझी .......तू कुठे आहेस?.....काय करतोयस?..........घरी नाहीयस का तू ?................तुला माहित आहेना तुझ्यासाठीच येते मी.......मग आता बोल कि ...........किती रे भाव खाणार....... बोल कि.... माहितीय ना तुला नाही सहन होत मला....... वाट पाहायला लावायची एखाद्याला ............आता राग येईल हा मला........ये ना रे.. तुझा "आहा” ऐकायचाय मला......मला माहित आहे तू आहेस ..............पण बोलायचं नाहीय तुला ...............ठीक आहे मग .......जाते मी...........नको बोलूस.....बस रुसून तसाच..............आता
परत येणार नाही बाय ......” अगदी अगतिक होऊन बोलत होते मी... काय करणार मी पण,,, हे काय वागन झाल... साडेल कुनिकाडचा....
““काय रे......काय चालू आहे तुझ? का नाही बोलत आहेस?..................माझ्याकडून काही चुकल का ? माफी मागितली न मी .....ते हि कारण नसताना ........मग तरीही? ...........तू जो पर्यंत रिप्लाय देत नाही .....मी लिहित राहते............तुला माहित आहे .............मग तरीही का त्रास देतोस ..............मला फार महत्वाच बोलायचं तुझ्याशी .खूप अर्जंट आहे ...परत भेटू शकणार नाही आत्ताच बोलायचय..............."!
नेहमी अस काही बोलले कि तो उत्तर द्यायचा... पण... पण आज नाही काही बोलला... का??? काय झाल???इतका कसा रागवला....??? नाही.... कामात असेल तो.... किव्वा घरी नसेल कदाचित... हो नसावाच घरी... नाहीतर तो आहे आणि उत्तर दिल नाही अस कधीच नाही झाल... कधीच नाही...
काम आवरून लवकर घरी गेले... गेल्या गेल्या तो आहे का अस पाहिलं... नव्हता तो... का??? कुठ असेल??? त्याला खरच तर नाही ना राग आला??? अरे पण राग येण्यासारख काय आहे त्यात???
“बोल कि रे राजा... नाही सहन होत मला अबोला... बोल कि... काय झाल तुला... संग तरी मला... बघ तू बोलला नाही तर मला झोप पण नाही येणार रे... आणि तू सोडून दुसर कोण आहे माझं ऐकून घ्यायला.. बोल कि... मला माहित आहे तू ऐकत आहेस ते... वाचत आहेस... बोल ना... काय रे???
जा नको बोलू... आलीस आठवण तर मग msg पाठव... बाय...”
मन दुखावल होत... अस कस कुण्णी इतक्या निर्दयपणे समोरच्याला दुर्लक्षित करू शकत??? कस काय???
{त्याला काय नाव ठेवते??? तू पण तेच केल... कुणीतरी तुला रोज गिफ्ट देत... न चुकता न थांबता... कसलीही अपेक्षा न करता... अन तू तर त्याने तुझ्यावर केलेली कविता वाचुन्पण नाही पहिली... त्यला कस वाटत असणार??? पण त्याला कळेल तरी कस??? अस कस नाही कळणार.??? प्रत्यक गोष्ट न सांगता कळतेच ना त्याला... मी त्याचं गिफ्ट उघडल नसेल पासून तर मला आवडेल पर्यंत... मी ऑफिसात उशिरा जाते पासून तर मी कविता नाही वाचनार पर्यंत सार तर ओळखल होत त्याने... शक्यता आहे कि त्यामुळेच त्याने आज नाही पाठवल गिफ्ट... त्यला इतक कळू शकत का उगाच थापा मारतो??? आणि जर काळात असेल तर??? त्याला किती वाईट वाटेल??? मी तरी उत्तर यावी याची वाट पाहते... पण त्याने गिफ्ट देतांना कधीच काही परतीची अपेक्षा नाही धरली... किती मी वाईट...}
मी उठले आणि कवितेच पत्र शोधू लागले... सापडलं...
“तू...
तू जीवन...
तू फुलातला रंग...
तू सात सूर गाण्यातले...
तू चार ओळींची मस्त चारोळी...
तू आठव आश्चर्य जगणे न पाहिलेलं...
तू जीवन...
तू फुलातला रंग...
तू सात सूर गाण्यातले...
तू चार ओळींची मस्त चारोळी...
तू आठव आश्चर्य जगणे न पाहिलेलं...
...फक्त तू...
तू आहेस स्वतःत जिवंत अस आश्चर्य...
तू चारोलीतला दडून बसलेला भावार्थ...
तू सुरांमाधला अबोल गोडवा...
तू कल्पना फुलांचीही...
तू अर्थ जीवनाचा...
तू अंगण माझे...
तू अणु...
तू....”
तू आहेस स्वतःत जिवंत अस आश्चर्य...
तू चारोलीतला दडून बसलेला भावार्थ...
तू सुरांमाधला अबोल गोडवा...
तू कल्पना फुलांचीही...
तू अर्थ जीवनाचा...
तू अंगण माझे...
तू अणु...
तू....”
काय बोलू??? काय समजू??? हे सार खरच माझ्याविषयी लिहल असेल??? यातली मी मीच का??? कस एवढ सुचू शकत कुणाला??? कोण हा??? का अस करतो??? किती छान लिहतो... वरून हसू नको म्हणतो, मुर्ख.... कोण हसणार??? शक्य आहे का???पण प्रश्न म्हणजे... मी??? मी कुणाला इतकी महत्वाची असू शकते???....
झोप तश्याच विचारात लागली... पुन्हा त्याच्या स्वप्नांची वाट पाहू लागले...
“रात्र ती संपली नाही
डोळ्यांत मी जागली
तुझ्या ओढित जायचे
स्वप्नासाठी झोपली....”
डोळ्यांत मी जागली
तुझ्या ओढित जायचे
स्वप्नासाठी झोपली....”
दिवस दुसरा...
त्याच्याशी बोलन सोडून बाकी काहीच दिसत नव्हत...
ऑफिसात जाण्याआधी त्याला मेल केला....
बेधुंद वाहणाऱ्या वारा जेव्हाही मला स्पर्श करून जातो,
तू जवळ असल्याची ती चाहूल असते...
क्षणभर डोळे मिटल्यावर
तू जवळ असतोस
पण डोळे उघडल्यावर भान येते
तू येणार ही फक्त माझी वेडी आशा असते...
तू जवळ असल्याची ती चाहूल असते...
क्षणभर डोळे मिटल्यावर
तू जवळ असतोस
पण डोळे उघडल्यावर भान येते
तू येणार ही फक्त माझी वेडी आशा असते...
जरी माझी नसली तरी आहे फक्त तुझ्यासाठी...
ऑफिसातून दुपारी जेव्ण्यावेली पुन्ह तेच...
“हेय, हाय... कसा आहेस???”,,, पण काहीच उत्तर नाही...
"तू एकदम..अचानक एवढा कठोर कसा होऊ शकतोस ???मी असा कधी विचारच केला नाही कि तू मला इतक दुर्लक्षित करू शकतो ... तुला मी इतरांपेक्षा फार वेगळा समजत होती ...तू माझा गैरफायदा घेतोयस... माझ्या मोकळेपणाचा तू उपयोग करून घेतोयस अस नाही वाटत का तुला??? मला तुझ्याशी बोलायचं असत हे तुला माहित असत... पण मला हे माहित नव्हत कि तुला मी नकोशी झालेय... अजिबात बोलावस वाटत नाहीय का तुला??? काहीच बोलायचं नाहीय का???
2 comments:
all poems r awsum...
thank u... :)
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)