तितक्यात तो फोन जवळ गेला... loudspeaker सुरु
केला आणि redial केलं...
“अगदी १०० वर्ष आयुष्य... मी पण तुझीच आठवण काढत
होतो... आहा... आहेस ना???” फोनवरून आवाज आला...
काय बोलू??? काय होतंय??? सुरवातीला कळतच
नव्हतं... पण तो “आहा” ऐकला अन् माझं लक्ष उडलं... पुन्हा एकदा... काय होतंय काय
घडतंय काहीच कळत नव्हतं...
बोलता बोलता आठवण त्याची माझ्याजवळ
आली...
माझ्याबरोबर चाल म्हणाली,
“हो” म्हणायच्या आतंच, हात धरून घेऊन गेली...
माझ्याबरोबर चाल म्हणाली,
“हो” म्हणायच्या आतंच, हात धरून घेऊन गेली...
सोबत आम्ही चालत होतो,
कधी शांत तर कधी बोलत होतो...
सोबत आमची नव्हती संपत...
गप्पा तर जात होत्या अजून अजून रंगत...
कधी शांत तर कधी बोलत होतो...
सोबत आमची नव्हती संपत...
गप्पा तर जात होत्या अजून अजून रंगत...
तितक्यात महेशने कोपरखळी दिली... अन् तशी मी
भानावर आली... आलं लक्षात मागच्यावेळी काय झालं असावं ते...
“आहा, आहेस ना??? अग बोल कि काहीतरी...” तो फोनवरून बोलत होता...
“आहा, आहेस ना??? अग बोल कि काहीतरी...” तो फोनवरून बोलत होता...
“तुझ्या मौनाचा मोहोर
पुलकित सदाबहार...
पण हे तुझं बोलणं
एक अनपेक्षित चमत्कार...” न कळत मी बोलून गेले... अगदी सहजच... महेश तर जागीच थक्क झाला... त्याच्या कडे पाहून माझं ध्यान ध्यानावर आलं... आणि समजलं कि मी चारोळी बोलून गेले फोनवर...
पुलकित सदाबहार...
पण हे तुझं बोलणं
एक अनपेक्षित चमत्कार...” न कळत मी बोलून गेले... अगदी सहजच... महेश तर जागीच थक्क झाला... त्याच्या कडे पाहून माझं ध्यान ध्यानावर आलं... आणि समजलं कि मी चारोळी बोलून गेले फोनवर...
“आहा, आत्ता वाटतंय कि तूच बोलतेय... मगाशी फोन
केला तेव्हा तर काहीच नाही बोललीस, मीच बडबडत होतो... आयुष्यात पहिल्यांदा इतकं
सगळ बोललो फोनवर... ए मंद आहेस ना तिथं???”, त्यानं अगदी त्याच्याच पद्धतीत उत्तर
दिल...
“अरे बोलते तर आहे ना... अन् काय रे??? मगाशी
आवाज नाही येत होता, नेटवर्क मध्ये बिघाड असेल काय म्हणत होतास??? अन् आता का आठवण
काढत होतास माझी??? नक्कीच शिव्या देत असशील ना???”
“हो... शिव्याच देत होतो... फोन करायचाच होता कधीन कधी तर मग तेव्हाच का
नाही केलास??? किती छळायचं
दुसर्याला काही प्रमाण आहे कि नाही??? किती वाट बघायला लावतेस तू???
अगदी emotional black mail कराव लागलं मला... किती दुष्ट असावं एखाद्याने???” तो बोलत होता, जणू
मन मोकळं करत होता... अगदी ऐकत रहावसं वाटत होत... पण रक्तातच नाही ना ऐकून घेण,
काय करणार???
“हा बस झालं हा आता, सगळ मीच करावं
ना... मुलगा तू अन् अपेक्षा माझ्याकडून धिटाई करायची??? कडूस नाहीतर काय??? अगदी
जीव जाईपर्यंत तू सतवलस, अन् म्हणे मी छळते...!!! अरे किती रात्री, रात्रीतले किती
क्षण तळतळला माझा जीव काही मोजमाप आहे का त्याला??? अन् म्हणे फोन करायचाच होता तर
आधी का नाही केला??? म्हणजे अगदी हिंदी सिरिअल मधल्या विलन पेक्षा जास्त छळतोस
तू... आता बोल ना असा घुम्यासारखा शांत का
उभा??? उभा आहेस कि आरामात बसला आहेस... अरे बोल कि...” एका श्वासात सगळ बोलले...
“आहा, आता वाटतंय तुझ्याशीच बोलतोय, आवाज ऐकून क्षणभर तर मी चाट करतोय कि काय याचा
भास झाला मला... कारण चाटींग करताना जो जिवंतपणा आणायची ना, तोच जिवंत पणा जश्याचा तसा जाणवला मला... असू देत ते... एक गोष्ट सांगायची आहे तुला, अन्
सगळ्यात पहिले तुला सांगायची म्हणून कोणालाच नाही सांगितली अजून...”
“अरे बोल ना, मी ऐकत आहे ना...”
“मी केलेली मेहनत कमी आली... माझा पेपर प्रकाशित
होणार आहे... आणि मला बोलावलंय त्यावर व्याख्यान द्यायला... व्याख्यानानंतर मला
शिष्यवृत्ती किव्वा नोकरी देणार nephrology world counsil मध्ये... phd
तर
नक्कीच...”, त्याला झालेला आनंद जाणवत होता मला... अगदी इतका कि समोर असता तर
मिठीत घेऊनच सांगितलं असत त्यान... साहजिकच आहे... गेली ३ वर्ष केलेल्या मेहनतीच
फळ होत ते... तो नेमकं काय करत होता हे तर माहित नाही पण हो या पेपर आणि
व्याख्यानामुळे त्याला शेवटी त्याच्या मेह्नीच मोल नाव आणि पैसा या दोन्ही
स्वरुपात भेटणार होत ना... सरते शेवटी त्याच्या वडिलाच्या शेतीवरील आणि घरावरील
याच्या शिक्षणामुळे झालेल्या कर्जाची परतफेड होणार होती...
“किती रे छान बातमी दिलीस... अगदी खुश केलास
मला... मग काय मागतोस ते... खूप खुश आहे मी, देईल जे हव तुला...” मी आपल्या
नेहमीच्या राजेशाही शैलीत बोलली... आधीही अनेकदा बोलालीय, हसण्यावारी नेतो तो ठाऊक
आहे मला...
“मला तुझे ५ दिवस हवेत... conference मध्ये
व्याख्यान आहे, आणि मला तू सोबत हवी आहेस... मला भेटायचं तुझ्याशी... सोबत हवीय तुझी, कारण ही संधी माझं आयुष्य
बदलणार आहे... आणि तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहेस...”
ओह्हहह... काय बोलला अस तो??? काय उत्तर देऊ???
मी तर गांगरलेच... महेशकडे मदतीसाठी ओअहू लागले... तर तो हुशार, ‘तूच पाय मारलाय
कुऱ्हाडीवर’ अस look देत होता...
“ए मंद, बोल ना... अशी का शांत झाली पुन्हा???”
“बर ऐक ना... अरे मला नाही आवडत फोनवर बोलायला... मला फोनवर बोलन किवा वोईस चाट करण खूप बोर होत... हे आपल बर... टायीप करत असतो
त्यामुळे हात ,डोकं,मन,डोळे सगळेच बिझी राहतात... बोलायचा जाम कंटाळा येतो... मला जे लिहिता येत ते बोलता येत नाही... तुझ्याशी तर सगळच
बोलायचं असत... पण ते लिहूनच शक्य होत...
आपण चाट करू... चालेल ना???”
“ठीक आहे, राणी साहेब म्हणतील तस... फक्त शब्द
दिलं हे विसरू नकोस... मस्त एन्जोय
कर... मजा कर... बाय...”
"बर आता ठेवते... छान वाटलं बोलून... पण खरच लिहिता
येत तेवढ बोलता येत नाही मला... पण तरीही खूप छान वाटलं...
बाय " अन् महेशने फोन बंद केला...
फोन ठेवताच महेशची बडबड सुरु झाली... “तू काहीच
का बोलली नाहीस??? इतकी शांत तू कधीच नसतेस??? किव्वा नसायचीस???”... मी तरी काय
करू सार गप्पपणे सहन केलं... शांतपणे... पण ही तर वादळापूर्वीची शांतता... मग
काय... वादळ तर आलंच,,,
“हो रे, नालायका... तुम्ही ना सारे मुलं सारखेच
असतात... तो तिथं एक असा आणि तू इथं एक असा... मला काही निट समजत नव्हत, माझा
गोंधळ होत होता म्हणून तुला इथं बोलावलं... तुला सगळ सांगितलं आणि तू काय केलंस???
माझा गोंधळ अजून वाढवला... सल्ला तर दिलाच नाहीस पण फालतूची बडबड करतोय
मगापासून... जर असंच करायचं असेल तर जा निघून... तो तिथं दरवाजा... मी निस्तारेल
माझा गोंधळ...”
“अग बाई, असे नव्हते म्हणायचे मला... पण तू थोडं अजून मोकळेपणाने बोलली असतीस तर...”
“अग बाई, असे नव्हते म्हणायचे मला... पण तू थोडं अजून मोकळेपणाने बोलली असतीस तर...”
“मोकळेपणाने म्हणजे नेमकं काय???” मी वैतागून
विचारले त्याला... माहित आहे अस विचारल्याशिवाय तो काही सांगणार नाही... नाही
म्हटलं तरी ओळखते त्याला... चांगल्यानेच ओळखते त्याला...
“काही नाही... तू आधी शांत हो पाहू... आपण नंतर बोलू या विषयावर... उगाच डोक्यावर भर नको देऊस... अजून तुला त्याच्या offerचा पण तर विचार करायचा आहेच... नंतर गुढगा गुखेल अन् माझं नाव घेशील...” तो हसतच म्हणाला...
“काही नाही... तू आधी शांत हो पाहू... आपण नंतर बोलू या विषयावर... उगाच डोक्यावर भर नको देऊस... अजून तुला त्याच्या offerचा पण तर विचार करायचा आहेच... नंतर गुढगा गुखेल अन् माझं नाव घेशील...” तो हसतच म्हणाला...
पण मी तर काही उत्तर द्यायलाच तयार नव्हते
म्हणून,
“ठीक आहे निघतो मग मी, तस पण आल्यावर चहा कॉफी
काही विचारलं??? अग ते सोड साधं पाणी पण तर नाही विचारलं तू...” अस म्हणत तो
दाराकडे निघाला...
आता हा जर निघाला तर माझं काय??? बोलले तरी आठवत नव्हत काय झाला विषय... आणि offerचा पण काहीतरी करावं लागणार होताच ना... पण तरीही नेहमीप्रमाणे मी म्हटलं जाऊ देत... जास्त भाव देण्यात काहीच अर्थ नाहीये...
आता हा जर निघाला तर माझं काय??? बोलले तरी आठवत नव्हत काय झाला विषय... आणि offerचा पण काहीतरी करावं लागणार होताच ना... पण तरीही नेहमीप्रमाणे मी म्हटलं जाऊ देत... जास्त भाव देण्यात काहीच अर्थ नाहीये...
“जा तू...” इतकच मी त्याला म्हटले...
“अग इतक्या वेळ बरोबर असल्यावर म्हणूस जनावराला
काय तर सामानालासुद्धा अस नाही फेकून देत ग...” त्याच्या आवाजात अनामिक गंभीरता
आली...
“काय रे.. कितीक वेळ झाला तुला इथं येऊन???
काहीपण बोलतोस...” मी हसण्यावारी नेण्याच प्रयत्न केला...
“मी अत्ताविषयी नाही बोलत... जस तू मला तुझ्या
आयुष्यातून फेकलं होत त्याविषयी बोलत होतो...”
0 comments:
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)