{“ओह... m gonna be late…”, काहीशी चिंतेच्या स्वरात, स्वतःशीच बोलत, घाईत TAXI चे पैसे दिले... धावत पळत करत विमानतळावर पोहचले... काही विचित्र जाणवत होत... सार जग जणू थांबल्यागत भासत होत... हा!!! वेळ मात्र जोरात पळत होता... माझ्याहीपेक्षा जोरात... जणू काही मला उशीर व्हावा अस् त्याला वाटत होत... थांबलेल्या जगणे अचानक चलबिचल सुरु केली... अन् माझा गोंधळ उडाला... मी तर काय करू??? डोळे वेळ बघत होते...हात गर्दी सरकवण्यात व्यस्त होते... पाय लगबगीने धावत होते... कान ‘आपलं विमान तर नाही ना जात...’ याची खात्री करण्यासाठी साऱ्या सूचना ऐकत होते... पण मन... मन मात्र आपल्याच तंद्रीत होत... फक्त त्याच्याच विचारात हिंडत होत... ‘तो आल्यावर काय करू??? कस बोलू??? काय बोलू??? गळे भेटू??? हात मिळवू??? नेमकं काय करू???’ हे अन् असे असंख्य प्रश्न विचारत होत... विचारांची जणू F१ ची रेस खेळत होते... तशी खुपदा आलीय विमानाने येणाऱ्यांना घ्यायला... पण का कुणास ठाऊक??? आज सगळ वेगळ जाणवत होत... गर्दीपण नेहमीसारखी नव्हती... नेहमी गर्दीत असणाऱ्या अन् गर्दी आवडणाऱ्या मला तो गर्दीचा आवाज गोंधळ वाटत होता... अगदी नकोसा झाला होता तो आवाज... सगळ्यांना घाई ती होतीच पण माझी घाई जरा जास्तच होती... शेवटी इतकी गोंधळली की कुठ जाऊ अन् कुठ नको अस् वाटलं... मग जरा एका खांब जवळ थांबली... डोळे मिटले... “तुझी वाट पाहीन विमानतळावर...” त्याचे शब्द आठवले... अन् मग चौफेर नजर फिरवली... जेवढ्या दुरवर नजर गेली तेवढ सार सार मनात साठवलं... अन् पुन्हा चालू लागले... जवळच एक बाई आपल्या नवऱ्याला सोडायला आलेली होती... तिच्या डोळ्यातून त्या विरहाच दुख्ख स्पष्ट दिसत होत... जाणवत होत...पण तरीही ती त्याला चेहऱ्यावरील स्मितासह काहीतरी बजावत होती.. नक्कीच स्वतःची काळजी घ्या वैगरे वैगरे... पण माझं तस काही नव्हत... कुणाला सोडायला नव्हते आले मी... किंबहुना कुणालातरी... त्याला... भेटायला आली होते...
शेजारी एक नाव विवाहित जोडप बसल होत... मधू चंद्राला जात असावेत... कारण दोघांची नजर एकमेकांवरून ढाळत नव्हती... अगदी जागत कोणीच नाही अस् त्याचं वागन होत... ते तिच्यासाठी त्याच पाणी आनंन... तीच त्याच्या ओठाजवळच पाणी रुमालाने टिपण... सार किती छान होत... तिच्या चेहऱ्यावरून त्याची ति प्रेमळ नजर फिरण...अन् तीच ते लाजण... सार सार मजेदार होत...
तितक्यात मनात आलं... तो कसा दिसतो??? मी त्याला कस ओळखू??? मी त्याला आवडेल का??? नाही आवडली तर??? ही चिंता मला सतावू लागली...
तितक्यात विमान उतरल्याची सूचना झाली... माझ काळीज जवळ जवळ बाहेर येऊन त्यला शोधू लागलं... बरोबरच होत... डोळ्यांनी तर त्याला कधी पाहिलं नव्हत... मग आता कालीजाच त्याला ओळखणार होत... अन् त्याच काळीज मला... पाहन तर दूरच पण बोललोही नव्हतो आधी आम्ही... अन् आज भेटणार होतो... काय करू??? मी चांगली तर दिसतेय ना??? ड्रेस आवडेल का त्याला??? मी आवडेल ना त्याला??? साऱ्या विचारांचं काहूर माजलं होत... तितक्यात... तो समोरून आला... नक्की तोच आहे... पाहताक्षणीच ओळखल मी... किती छान दिसतो तो... तो माझ्याकाडे येतोय अन् माझ्या हृदयाचे ठोके चुकू लागले... पण...आलाच हा पण पुन्हा मध्ये... तो माझ्या जवळ न थांबता पुढे गेला... का??? तो मला ओळखू नाही शकला??? मी त्याला नाही आवडले??? का??? का??? का???}
इतक्यात काहीतरी वाजल अन् माझी झोप मुडली... मी त्याला शोधात होते... कुठ आहे??? का गेला??? इतक्यात धान्यात आल की स्वप्न होत... बर झाल स्वप्न संपलं... अस् स्वप्न??? स्वप्न का अस् असत??? माझा जीव गेला असता... स्वप्न होत का सत्याची चाहूल... मन इतकं कासावीस झाल की काय सांगू... घसा कोरडा पडला...
कुठेतरी वाचलेल
पहाटेच स्वप्न खर ठरत म्हणून...
पहाटेच स्वप्न खर ठरत म्हणून...
रोजच मला माझ मन तुझ्याच विचारात सापडत...
रोज पहाटे तुझ स्वप्न पडत...
आणि रोज सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवते...
ते स्वप्न आठवणीच्या रुपात मनात साठवते...
ते स्वप्न आठवणीच्या रुपात मनात साठवते...
रोज रात्री झोपतांना माझंच मला प्रश्न करतं... तू तर म्हटली होतीस पहाटेच स्वप्न खर ठरत...
मग माझ मन त्याच्या मनाला समजावत... “बाळा मोठ स्वप्न थोडाच एका दिवसात खर होत...
आज नाही तर नाही. उद्या नक्की पुर्ण होईल.."
याच शब्दात अजून एक दिवस माझा जाईल...
याच शब्दात अजून एक दिवस माझा जाईल...
माझा आणि माझ्या मनाचा का कोण जाणे पण या स्वप्नांवर खूप विश्वास आहे..
रोजचाच तर झाल आहे...
रोजचाच तर झाल आहे...
माझी रोज तुझी वाट पाहण...
तुझं न चुकता स्वप्नात येण....
रोज स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहण...
नाही झाल पूर्ण तरी रोज एक स्वप्नात शिरण...
पण आज जरा उलट होतंय...
आजच स्वप्न पूर्ण होऊ नये अस् मनात येतंय...
पहिल्यांदा अस् झाल की मन तुझ्या स्वप्नाला भितय...
बर झाल ते स्वप्न एह्तच तुटलं... नाहीतर काय झाल असत कुणास ठाऊक...झोपतच हृदयाचे ठोके थांबले असते... खूप बर झाल... पण स्वप्न तुटलं एका आवाजामुळे... कसला??? कशा मुळे??? मग मी ध्यानावर आले... अजूनही तो आवाज येताच होता तो ऐकला... आवाज येत होता एका डब्ब्यातून... अर्र्रर्र्र... आज मी gift पाहायचंच विसरली... अस् कस झाल??? बिचारा जो कोणी इतक्या प्रेमाने gift पाठवतो... त्याला वाटत असेल की मी लगेचच पाहते त्याचे गिफ्ट... पण त्यला जर कळल की मी विसरून गेली तर वाईट वाटलं असत त्याला... किती वेंधळी आहे मी...
लगबगीने उठली आणि पाहिलं... आवाजावरून तर tape recorder वाटला... पण बघते तर काहीतरी पांढऱ्या रंगच होत... बरोबर एक पत्र.... मनात आल...लोक गुलाब देऊन प्रेम पत्र देतात याने चे काय दिल्... पत्र वाचयला सुरवात करताच हसू आल...
‘पत्र लिहण्यास काही तस खास कारण नाही पण म्हटलं इतक्या रात्री उठावल तर बोलाव जरा... नको आचार्य करू.... मला माहित आहे की तू नाही उघडलं आल्या आल्या... त्यामुळे तुला झोपेतून उठवण हेच करावं लागलं... राग आला तर येऊ दे... जर तू माझ्या भेटवस्तुला दुर्लक्षित करते तर मी तुझी झोप मोड कारण काही वागव नाही... असू देत... आता तुला वाटेल की मी माझी माहिती सांगेल नाव, काम वैगरे वैगरे... पण तस्ल काही होणार नाहीये... अन् हो हे प्रेम पत्र नाहीये... प्रेमाने लिहलय पण प्रेम पत्र नाहीये... हा तर... आज काळ खूप स्वप्न पाहतेस ना... मला कस कळल नको विचारू... रोज ऑफिसात उशिरा जाण्याला तेच कारण असू शकत... म्हणून गजरच घडयाळ देतोय... हो ही पंढरी वस्तू म्हणजे घडयाळ आहे... Sfera alarm clock... कंपनीची कागद नाही पाठवली नाहीतर तू माझा पट्टा शोधशील अशी वेडी अशा लागली असती ना मला म्हणून.... तर... मलाच सांगाव लागणार... वर छतावर लावायचं याला... चित्र पाठवत आहे... मी काढलंय... हसली तरी मला दात नाही दिसणार... असो... गरज झाल्यावर लगेच उठत नाहीस हे समजू शकतो मी... म्हणून तर पुन्हा बंद करायसाठी "sleep" बटन दबाव लागत... प्रत्येक वेळी बटन दाबल्यावर घडयाळ वर जात... म्हणजे snooz करता करता घडयाळ इतकं वर जात की तुला उठून बंद करा लागेल...
आणि हो आता जरी मला शिव्या देल्यात तरी हरकत नाही... माहित आहे आज नाहीतर उद्या मान्य करशील आज पर्यंतच सगळ्यात कामी पडणार गिफ्ट आहे... चाल पुन्हा बोलू कधी तरी...’
माझा तर विश्वास बसेना... एकदा वाटलं नाही ग स्वप्न आहे... मग जाणवल नाही... कोण कुठला हा??? त्याला कस ठाऊक सगळ??? इतकं??? माझ्या सवयी... अगदी मी त्याची गिफ्ट नाही बघणार इतका विश्वास??? आणि तरीही दिल गिफ्ट... म्हणजे मी घडयाळ वापरेल हा अजून द्रुढ विश्वास... काय करू??? गरज तर आहे खरंच घड्याळाची... अन् इतका विश्वास करून दिली त्याने... पण मी घ्याव का??? तस घ्यायला काही हरकत नाहीये... आजकाल तर कोणीही कोणालाही गिफ्ट देतं... आणि घड्याळ आहे यार... पण का घ्याव... कोण तो??? का देतोय??? माझी इतकी का माहिती ठेवतोय??? काहीच समजेनास झालंय... एक काम करते... माझ्या त्याला विचारते काय करावं अस्...
मनात विचार चक्र सुरु होत... तितक्यात... माझाच वापरलेला शब्द माझ्यासमोर येऊन उभा राहिला... “माझ्या त्याला” ... माझा??? खरच माझा आहेका??? असो... त्याला नक्की सांगते... सांगावच लागणार... तोच तर मदत करू शकतो... मंद मी मंद माझ मन... किती किती विचार करत त्याच... नेहमीच भांडत बसत... मनातलं मन म्हणतो तो तुझा आहे... पण मनालाच मान्य नाही... आणि मला तर भेट देणार्यची चिंता वाटू लागलीय... ऐकू कुणाच??? का मन अस् करत... माच मन आहे मग माझ्या डोक्यात, मनात आणि मनाच्या मनात वेगवेगळ का सुरु असत... मनालाही मन आहे माझ्या बघा ना...
मनात विचार चक्र सुरु होत... तितक्यात... माझाच वापरलेला शब्द माझ्यासमोर येऊन उभा राहिला... “माझ्या त्याला” ... माझा??? खरच माझा आहेका??? असो... त्याला नक्की सांगते... सांगावच लागणार... तोच तर मदत करू शकतो... मंद मी मंद माझ मन... किती किती विचार करत त्याच... नेहमीच भांडत बसत... मनातलं मन म्हणतो तो तुझा आहे... पण मनालाच मान्य नाही... आणि मला तर भेट देणार्यची चिंता वाटू लागलीय... ऐकू कुणाच??? का मन अस् करत... माच मन आहे मग माझ्या डोक्यात, मनात आणि मनाच्या मनात वेगवेगळ का सुरु असत... मनालाही मन आहे माझ्या बघा ना...
किती सोपी गोष्ट आहे पण समाजाचत नाही कुणाला,
असत एक अंतर्मन प्रत्येकाच्या मनाला...
म्हणूनच तर अनेकदा मनही मनासारख वागत नाही...
मन मनाचे नाते कधीच तोडत नाही,
अन आपण प्रयत्न केला तरी, तो ते नात सोडत नाही.
माहिती आहे गुंता फार झालाय, पण कधीच सोडवत नाही.
उलट आपण प्रयत्न केला तर, कोणता धागा कुठे हेही सांगत नाही.
हा मनाला आवडणाऱ्या व्यक्तींची काळजी मन फार घेतो,
असेल नसेल ते सारे प्रयत्न तो प्रियजनांसाठी करतो.
सर जग मनासमोर नतमस्तक होत,
जे त्याला हवाय तेच अन तसाच त्याला पुरवत.
मग सार्या कहाणीला मन तरी कसा अपवाद ठरेल?
म्हनुंच “मनाचं मन” ठेवायसाठी ‘मन’ काहीही करेल...
आज त्याला काही मेल नाही केला... म्हटलं मनातलं सगळ छान पैकी सांगू तेव्हा जेव्हा तो समोरून लागलीच उत्तरं देऊ शकेल... दुपारी जेवतांना त्याला बोलू म्हटलं तितक्यात त्याचा मेसेज...
“आहा... एक खूप खूप आनंदाची बातमी आहे...” त्याचा मेसेज माझ्यासमोर ठेपला.. जणू काही माझी online येण्याची वाटच पाहत होते साहेब...अचानक काय झाल पण... साहेबांनी स्वतःहून कशी बोलयला सुरुवात केली...असो तो खुश तर त्याच्या खुशीत मी खुश...
“hey hi, सांग ना काय झाल इतका खुश??? सांग ना...”
“आज मी तुझी खूप आतुरतेने वाट बघत होतो... मला एक आनंदाची बातमी तुझ्याबरोबर शेअर करायची होती... आज माझा पेपर... प्रसिद्ध झाला... मी केलेल्या कामाची प्रशंसा झाली... मला हा आनंद तुझ्यासोबत साजरा करायचा आहे... आज खरच मनापासून तुझ्याशी बोलायचं आहे मला.. खूप खूप बोलायचं आहे...” अरे वह त्याचा पेपर प्रसिद्ध झाला... त्याने किती मेहनत केलीय त्यावर माहित आहे मला... जवळ जवळ एक पूर्ण वर्ष... मला ऐकून फार आनंद झाला... मग मी त्याला खूप खूप लिहून पाठवल... अगदी मराठी इंग्रजी जमेल तस...
"अस नको, माझ्याशी बोलून माझं अभिनंदन केलस तर मला जास्त आवडेल"...
त्यावर "अरे बोलन काय??? लिहीन काय??? येत तर मनातनच ना ! मग बोलण्याने असा काय फरक पडणार आहे??? तसही मला फोनवर बोलन किवा वोईस चाट करण खूप बोर होत ... हे आपल बर... टायीप करत असतो त्यामुळे हात ,डोकं,मन,डोळे सगळेच बिझी राहतात ... बोलायचा जाम कंटाळा येतो... मला जे लिहिता येत ते बोलता येत नाही ... तुझ्याशी तर सगळच बोलायचं असत... पण ते लिहूनच शक्य होत ..."...................................................................
"हेल्लो ....बोल ना .... काय झाल आता???...................आता प्लीज एवढ्याश्या कारनावरण भांडण नको आपल्यात ....." तो गप्पच होता... मला क्षणभर सुचेच ना काय बोलाव ते... पण तरीही मी बोलत होते...
"अरे बोलत का नाहीस??? काय झाल एवढ चिडायला ??? बोललच पाहिजे का??? बोलण्यापेक्षा मला लिहीन सोप वाटत... आता तरी बोल... माझा जीव इथेच घुटमळत राहतो... तू नाही बोललास तर... पिल्लू ऐक ना... मलापण काहीतरी महत्वाच सांगायचं आहे... काहीतरी विचारायचं आहे...अरे बोल ना... काय हे लहान मुलासारखं???" पण त्याच्या कडून काहीच उत्तरं नाही...
“बर... राग शांत झाला कि मग बोलू...चल... बाय... सी यु... अरे कमीत कामी बाय तरी... असू देत नाही तर..." काय झाल त्याल अख्य माहित पण मनात शाकेची पाल चुकचुकली नाही बोलला परत तर काय??? मी काय करणार??? कशी राहणार???
म्हणून त्या दिवशी खूप खूप वेळा पिंग केलं त्याला... पण काहीच उत्तरं नाही.. आता काय करू??? काय झाल??? तो इतका का दुखावला??? हे आमच शेवटच बोलन होत???
0 comments:
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)