Tuesday, August 6, 2013

फक्त तुझ्यासाठी... भाग ३४

आपले भेटणे... अन तुझे अन्मिष पाहणे...
आपली पहिली भेट मी विसरू शकणार नाही...
तुझे ते बोलके डोळे ... मी विसरू शकणार नाही...
तुझा तो पहिला स्पर्श नेहमीच माझ्यात राहील...
तुझ्या मिठीतली उब नेहमीच मला जाणवेल...
तुझी ती वेड लावणारी गालावरची खळी...
नेहमीच मला तुझ्या आणखी जवळ आणेल...


एकमेकांपासून दूर जातांना पाऊले कुठे साथ देत होती, पण निघणे भाग होते चेहऱ्यावर हसू उमटवून अन मनातून खंत व्यक्त​ करत निघालो आम्ही दोघे आमच्या वाटेला.... प्रत्येक पावलाला मागे वळून बघत होते व तो तेथेच निश्चल उभे होता वाटत होते कि तो पण माघे बघेन... प्रत्येकाच्या आयुष्यात  एकदातरी  असा क्षण ​येतो  जेथे डोके बधिर होते अन हृदय ताबा घेते...

तुज्यापासून दूर जातानाहि...
घुटमाळतोय जीव तुझ्याच जवळी...
मन खट्याळ , मन नाठाळ...
मनाचा ठाव घ्यावा कोणी...
मनाशी गट्टी जमवावी...
कि त्याचे हट्ट पुरवावे...
मनाचा ताबा घ्यावा...
कि त्याच्या विचारांना हवा द्यावी...
मन भिरभिर करत जातंय त्याच्याच जवळ...
जसा भुंगा फिरतो फुलांजवळ…


पाय पुढे  पाऊले जरी टाकत होती पण मन मला मागे खेचत होते... सांगत होते कि नको जाऊ त्याच्या पासून दूर जा धावत त्याच्या जवळ अन सांग हवी मला तुझी सोबत... या क्षण पुरती नाही तर कायमची आयुष्य भरासाठी...

हा विचार करताना एकदम हसू आले, movie मध्ये कितीतरी  प्रेम कहाणीचा इजहार airport वर झालाय... आजही जर माझ्या बाबतीत अस काही झाल तर… तो... तो तर बिलकुल नाही करणार ... एक numberचा मानी आहे केली तर मलाच सुरवात करावी लागेल... पण त्यालाही मी इतकीच आवडत असेल का जेवढा मला तो... तो पण माझ्या आयुष्यभराच्या सोबती साठी आतुर आहे का???  त्याच्या आयुष्यात मी सोडून कोणी एवढे जवळचे नाही हे कशावरून??? हे प्रश्न खूप भेडसावत असतात एक न अनेक... शेवटी एकाच प्रश्न त्याच्या पासून दूर जाताना हे अस काय होतंय??

तुज्या पासून दूर जाताना...
कोंडतोय श्वास…
धडधडतंय काळजात ...
येताय आसवांच्या धारा …
सठ्वल्या पापणीच्या ओंजळीत …
घट्ट केलय हृदय , पाऊले चालले ओढीत…
नको हा क्षण, घेऊन जातोय तुझ पासून दूर मज …
येउन बिलगावे तुझ अन सांगावे कि घेऊन चल मझ तुझ समवेत…
माझ्या आयुष्यातला हा पहिलाच क्षण... काहीसा बावरा अन काहीसा लाजरा... पहिल्यांदाच कोणाच्यातरी डोळ्यातले  भाव मी इतके अचूक टिपले होते... शांत असूनही आम्ही बोलत होतो... म्हणतात न... शांततेला हि आज आवाज फुटला होता... त्याच्या एका स्पर्शाने मनाला कंप फुटला होता... एका क्षणासाठी जेव्हा त्याने माझा हात धरून पुन्हा सोडला... चलबिचल झाल्यासारखं झाल... अस्वस्थ वाटल... पहिल्यांदाच... जवळ आला तेव्हा श्वास न श्वास त्याचा ऐकू आला... आई ग... हे सगळाच माझ्यासाठी खूप खास आहे... मौल्यवान आहे... माझी सर्वात मोठी साठवण आहे...

विचार करता करता...
कसे वाहू लागते वारे हे गोड आठवणींचे...
स्पर्शून जाते मनाला...
ते क्षण आपल्या पहिल्या भेटीचे...
काही क्षणांची  भेट ... ओढ लावून गेली आयुष्भाराच्या साथीची...
होई वेडेपिसे माझे मन... पुन्हा वावही अशी अविस्मरणीय भेट...


आज कोणीच मला सोबत नको... सतत बद्बाद्णारी मी... माझ्या न त्याच्या भेटी मध्ये गुंग होते... तो नसूनही त्याच्याशी बोलत होते... हसत होते... त्याला आठवून लाजत होते... कोण काय  म्हणतंय... आजूबाजूला काय चालू आहे... काश्याचाच भान आज नव्हत... त्याचेच विचार ... त्याचेच शब्द... त्याचाच चेहरा... खरच इतक कोणी वेड होऊ शकतो... मी झाले आहे... त्याच्यासाठी !!!
आता सारकाही बदल्या सारख वाटत होत... सुंदर... अवचित...

सर्वत्र हिरवळ पसरलेली... पावसाने बहरलेली...
हलका हलका पाऊस चेहऱ्यावर झेलताना...
नझर त्याची थबकलेली...
वातावरण अगदी सुंदर होऊन... शहरा अंगात भारत होता...
ओठांची ती थरथर... अन डोळ्यांची उघडझाप...
सगळी मज्जाच काही निराळी होती... !!!


आज माझ्या चारोळी किव्हा कवितां न काही अंत नव्हता... खूप गाव... नाचव अस वाटत होत...
काही क्षण वेड लावणारे...
बेधुंद होऊन मग  स्वतःच नाचणारे...
काही क्षण मनात घर करणारे...
मनाची परवानगी न घेता ...तिथेच रमणारे...
काही क्षण खरच अविस्मरणीय अन हवेहवेसे वाटणारे...!!!


मी माझ्याच जगात रममाण असतांना, अचानक हवाई सुंदरी जवळ आली आणि खुर्चीची पेटी लावायला सांगितलं मला... खराब वातावरण emergency अस काही बाही बरळत होती ती... म्हटलं ठीक आहे काय फरक पडतो तसही... पण मग जरा ध्यानावर आले, विमान बऱ्यापैकी हलत होत...

अक्षरः विजा शेजारीच पडतात की काय अस काहीसं वातावरण झालं होत... मन शांत करायसाठी लिहू लागले...
कोण कुठून कसा तू आलास...
पटकन कसा माझा तू झालास...
प्रत्येक क्षण तू आठवतोस...
नसूनही जवळ अगदी भासतोस...
कधी उगाच माझी चेड काढतोस...
मला कसाकाय तू अचूक ओळखतोस...
डोळे मिटले कि तू दिसतोस...
उघडले तोच तू गायब होतोस...
तुझ्याबद्दल लिहायला बसले... तर शब्द अडतात...
विचारांच्या traffic मधेच ते तुझ्याशी बोलतात...
तू... तू... अन फक्त आपण...!!!
 

आता मात्र विमान इतकं हलत होत की लिहण पण अशक्य झालं मला... म्हटलं काय वैताग आहे हा...
तेवढ्यात मागील शिटावरची ती चिमुकली रडू लागली... अन् तिचे बाबा हतबल होऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागले... मग मी मागे पाहून तिच्याशी बोलू लागले, तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले...

माझ्या शेजारच्या काकूंनी सुचवलं मी गाण म्हणून तिला शांत करावं... मग काय माझ्यातला Indian idol जागा झाला... अन् मी जरा बेसुरीच पण हळू गाऊ लागले...
कळत नकळत social networking वर प्रेम जडले...
ओळखी पासून सुरवात होत... chatting जे धागे आपोआपच विणले...
त्याचा एक पिंग येण्याची वाट पाहत ... त्याच्यात मी गुंतले...
एक दोन तीन दिवस... आता ओढ त्याच्या मैत्रीची मला लागली...
स्वतःला कायम busy ठेवणारी मी... माझ्यासाठी नाही तर त्याच्यासाठी वेळ काढू लागले...
बघता बघता दिवस रात्र chatting होऊ लागली...
विश्वास आमचा एकमेकांवर हळू हळू वाढत गेला...
नाही नाही म्हणता number आमचा exchange झाला...
पहिल्यांदा कोणाला तरी फोने करायला इतकी भीती वाटली...
पण त्याचा आवाज ऐकताच... मी माझीच नाही उरली...
फोन वर बोलणे नित्याचे झाले... chatting मग कमी झाली...
अनोळखी असूनही ओळखीच वाटणार ह्या सुंदर मैत्रीच्या नात्यातून...
नवीन नात जन्म घेऊ लागल... दोघांच्या  नकळत आम्ही एकमेकांसाठी खास झालो...
आता भेटण्याचा भुंगा मनी गुणगुणू लागला...
मग दोन देशांच्या आम्हा वेड्या पाखरांना... नव्या गगनाचा वेड हे जडल...
chatting अन आवाजावरून... चित्र मी त्याचे रंगवले होते...
प्रत्यक्ष भेटीच्या ओढीने मी वेडी पिशी आता होत होते...
अखेर भेटलो... एकमेकांच्या अजून जवळ आलो...
सतत बोलणारी मी... त्याच्यात डोळ्यात पाहून शांत झाले...
एखाद्या जलद लोकल सारख... जग धावत होत...
पण मी ... आम्ही
फक्त एकमेकांना अनुभवत होतो... !!!!

ती छकुली तर शांत झाली पण माझ्या शेजारच्या काकू अन् त्या मुलीचे बाबा माझ्याकडे पाहत होते... मी म्हटलं, “काय??? लेटेस्ट गान आहे मराठी सिनेमातलं...”

अन् तोच आम्ही हसू लागलो... हे पाहून ती मुलगी पण हसू लागली... कळत नकळत पूर्ण विमानातल वातावरण जरा सैल झालं...

या साऱ्या गडबडीत विमान उतरायची घोषणा आली... अन् मी अनामिक ओढीने किव्वा अनामिक कंटाळ्याने मी काय काय लिहलं ते  पाहू लागले... 







SDC
काय मग... एकदातरी अनुभवल असेलच हे गाण...

Get Your Own Free Hypster.com Playlist.

3 comments:

Anonymous said...

sagar rao mahoul kelat. ek number. Madhumangesh Patil

GST Training Delhi said...

It was terribly helpful on behalf of me. Keep sharing such ideas within the future similarly. This was truly what i used to be longing for, and that i am glad to came here! Thanks for sharing the such data with USA.

App Devlopment Company said...

Awesome work.Just wished to drop a comment and say i'm new your journal and adore what i'm reading.Thanks for the share

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)