Sunday, November 20, 2011

फक्त तुझ्यासाठी ... भाग १६


आज काय लिहू काहीच कळत नाहीये...
शब्दांना जणू आज काहीच बोलू द्यायचं नाहीये...

अव्यक्त भावनांचे काहूर मनात दाटलेय...
का कुणास ठाऊक शब्द आज गोठलेय...
खट्याळ विचारांनी मन भरलंय...
तू आणि तुझा विचार एवढंच मनात उरलंय...
फक्त तुझ्यासाठी...
त्याला मेल केला सकाळी सकाळी... अन जरा वेळ त्या निरागस चंद्र कडे पाहत राहिले... एक वेगळीच हुरहुरी जाणवली मनात... अगदी पहिल्यांदा बाबांनी सायकल घेतली होती तेव्हा वाटली तशीच... इतकी उत्सुकता त्या नंतर नाही जाणवली...
स्पंदन जोरात सुरु झालीत... अन मी स्वतःलाच हलकी वाटू लागली... अजून... नाही सांगता येत काय वाटत होत ते... काय काय मनात साठत होत ते... का कुणास ठाऊक आज तयार व्हायला जास्त वेळ घेतला मी... एक दोनदा नव्हे तर चागल ६ ७ वेळा आरशात बघितल मी... आता तर फोन नाही करू शकत... तो कामात असेल ना... ठीक आहे मग माझ्या लंच मध्ये करेन फोन...
पण फोन करून काय बोलू??? कस बोलू??? तो कसा बोलेल??? त्याला नाही आवडलं माझं बोलन तर काय??? आणि मला आवडेल का त्याचा आवाज??? त्याची बोलायची पध्दत???
{हे सार तर ठीक आहे पण नेमकं त्याला सांगायचं काय आहे ज्यासाठी फोनच हवा??? आणि इतक छळल मला त्याने...???????????
त्याचं लग्न तर नाही ना ठरलं???
Omg!!!!!!!!!!!! बापरे... असू शकत... कारण त्याला काम आणि मी सोडून दुसरे विषयच नसतात बोलायला... अन काम पण तर मीच सांगते ना त्याला करायला... मग त्याचं लग्न??? कुणाशी??? कधी??? अन मला चांगल वाटायल हव का नको??? मला तर आत्ताच कसतरी वाटतय... त्याचं लग्न होणार... मग आमचं बोलन कमी होणार.... मग तो मला विसरणार... मग माझं काय होईल??? या ३ दिवसात माझी काय हालत झाली मलाच ठाऊक आहे... मग पुढ कस होणार???
मी काय बोलणार त्याच्याशी??? काय उत्तर देणार???
अस तर नाही कि तो मला विचारतोय??? ... नाही नाही तस काही नाही आमच्यात हे त्याला पण ठाऊक आहे... पण त्याच्या मनात असेल तर??? नाही पण भेटलो नाही बोललो नाही मग का उगाच तो... पण जर विचारल तर???
मी पण ना काय विचार करू लागले कुणास ठाऊक... पण खरच आहे,.. मलाच माहित नाही माझ्या मनात त्याच्या विषयी काय आहे ते... मग त्याला काय सांगू??? खरच यार मला नेमकं काय वाटत त्याच्या विषयी... मला काय ठाऊक त्याच्याविषयी??? काय होतंय हे??? काय करू मी???
फोन करू का नको??? किती किती गोंधळ... काय लावलाय हे???
ऑफिसात निघाले मी... सांगायची गरज नव्हतीच कि कामात मन लागलंच नाही... काही म्हणजे काहीच करत नव्हते फक्त वेळ घालवत होते... लंचची वेळ झाली... अन मी त्याचा प्रोफील लावला... त्याने फोटो बदलला नव्हता... पण हे काय??? चिटींग... हद्द आहे रे... पण फार फार छान फोटो आहे... काय करू समजत नाहीये... उचलला फोन... लावला त्याला... मेल उघडून नंबर बघायची गरज नव्हतीच पाठ झालेला केव्हाना... अक्षरशः
vibration जाणवत होते पूर्ण शरीरात... अन मी फोन ठेवला...
माहित होत तो घरी आहे... पण काय करू हिम्मत नाही झाली... म्हटल तो
msg करेल पण काहीच नाही... मग काय??? मी पण नाही केलं काही... मलाच थोडीना गरज आहे...
आज प्रत्येक क्षण हा युग प्रमाणे वाटत होता जणू वेळ हि येथेच थांबली आहे आणि माझी थट्टा करते आहे... काय होईल आज??? काय नाही??? पटापट काम उरकून लगबगीने घराकडे आली... सायंकाळ झाली... पुन्हा त्याचा प्रोफील लावला... पण तोच फोटो... काय करू??? काही करू का नको??? समजत नव्हत... आणि लगेच पिंग केले... message पाठवला... पण तिकडून त्याचा काही रेप्ली आलाच नाही... मला वाटले त्याला माझी मागणी आवडली नाही... मी विचारात होते हे काय झाले? ?? बोलायचे नाही का? ??तू फोटो पाठवणार आहेस का??? ठीक आहे मी माझी मागणी मागे घेते... पण बोल रे बाबा??? नाही राहू शकत मी तुझ्या बोलण्यावाचून ??? का असे करतोस??? बोलणारे... राजा???”... माझं मन अगदी धुंद होत... अश्रू डोळ्यापर्यंत आले होते... फक्त ओघळायचेच बाकी होते... का होताय हे माझ्या बरोबर??? काय करू मी??? मन रडत होत... डोळ्यात पाणी साचल... पण कॉम्युटर वर त्याचाच प्रोफिल होता... मी आता तर ठरवलं मनाशी... अन पुन्हा लिहायला सुरवात केली...
“माहित आहे मला तू आहेस म्हणून... मुद्दाम बोलत नाहीये... आणि मला रडवत आहेस... किती कठोर असावं माणसाने??? तुला माझी काहीच काळजी नाही कारे??? मला नाही राहवत याचा गैरफायदा घेत आहेस तू... मला छळत आहेस... जीव जाईल रे माझा अश्याने... बोल कि... किती ठोम्ब्यासारखा बसणार आहेस??? मी तर सांगितलं कि टाक फोटो, मी करते फोन म्हणून... पण नाही... तुला काहीच नाही ना... पहिल्यांदा काहीतरी मागीतल ते पण तू नाही देऊ शकत??? जर खरच तू असा आहेस तर मी तुला मुळीच ओळखत नाही... जराही नाही... मला आजवर वाटत होत कि मी तुला फार चांगल ओळखते पण नाही तस नाहीये... तू तसा नाहीये...” अन मला रडू कोसळलं... सार सार किती विचित्र घडत होत... चार पाच दिवसाआधी ज्याच्यामुळे मी हसत होते, जिवंतपणाने वावरत होते तोच आता मला रडवत होता... का करत होता अस??? का???
मग काय करणार करायसाठी काहीच नव्हत,,, म्हणून मी डायरी आणली आणि त्यावर, त्याच्या अन माझ्या पहिल्या भेटीपासून तर आज पर्यंत सार काही लिहायचं मनात घेऊन बसले... आठवणी...
आठवण येते कधी मला
अन गालावर खुदकन खळी पड़ते...
तर कधी हसता हसता
डोळी माझ्या पाणी आते...

खर सांगू तर त्याच्या आठवणी मला एकट राहूच देत नाहीत...
काय करणार त्या सुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाहीत...
या विश्वात असतांना देखील नव विश्व त्या दाखवतात...
कधी सार स्पष्ट तर कधी सार काही दिसेनासं बनवतात...

दूर लोटण्याचा प्रयत्न करण कधीच सोडलंय मी...
कारण एक भावनिक नात यांच्याशी जोडलंय मी...
हीच आहे माझी खरी मैत्रिण
नेहमी साथ देणारी....
आगंतुक असली तरी
हवी हवीशी वाटणारी......
अशा या आठवणींनी भरतेय मी डायरी... जे मला वाटलं... जाणवलं... जे स्वप्न मला आठवले... गिफ्ट मला भेटले... सार काही लिहू लागले... आता ठरवलं होत कि उठायचच नाही सगळ झाल्याशिवाय... मनातलं सार लिह्ल्याशिवाय... पण एकदा का gift चा विषय निघाला तर आजच गिफ्ट पाहिल्याशिवाय कस चैन पडणार होता मला....
हो आजचं गिफ्ट... बघितलं तर छोटच होत... पण जो कोणी हे गिफ्ट देतोय त्याला चांगलंच ठाऊक होत मला काय आवडू शकत, काय नाही... पण आज काय असणार??? बघितलं... एक सिडी होती... आता मात्र जरा विचित्र वाटण साहजिक होत... CD??? का??? कसली??? इतकच लिहलं होत...
‘ऐक आवडेल तुला...पूर्ण नको ऐकुस... दमाने खा...
J
आत्ता एवढ लिहल्यावर ऐकन साहजिकच होत.. “पु.ल. देशपांडे कथानक...” किती छान वाटलं काय सांगू... पु.ल. मलाच काय तर जवळ जवळ सगळ्यांनाच आवडतात... त्यांची कथानक अन ते पण त्यांच्याच आवाजात म्हणजे पर्वणीच... ऐकल एक कथानक... ‘म्हैस’... खूप हसले... मन मोकळ झालं थोड... अन सांगितल्याप्रमाणे थंड करून खाव विचार करून बंद केलं...
पुन्हा त्याचा प्रोफील उघडला... त्याला
offline msg टाकला...
“बाय...
miss u a lot… झोपते मी...”
अन मी झोपी गेले... मन हलक वाटत होत... रड्ल्यामुळे??? त्या सिडीमुळे??? नेमकं काय ते नाही कळल... पण काहीही असो चांगलं वाटत होत...
{ बसले होते... संध्याकाळी... बंगळीवर... मस्त वाटत होत... तितक्यात तो दिसला... दिसला काय तो शेजारीच येऊन बसला... शांत होता... नेहमीपेक्षा जरा जास्तच शांत... तस मी मनात ठरवलं होत कि तो आला कि त्याला चागलं झापायचं.... सुनवायच कि मला किती त्रास दिला वैगरे वैगरे.. पण त्याला पाहून राग टिकण तर अशक्यच... वरून त्याला अस पाहून कळेनास झालं काय करू... केली हिम्मत अन विचारलं... “काय झालं रे राजा इतका का उदास??? नेमकं काय झालं???” त्यावर तो बोलला...
“फार त्रास होतोय ग... फार जास्त... न भूतो न भविष्यति...” अन त्याचे डोळे पाणावले... काय सांगू काय वाटलं मला ते.. जगात सगळ्यात वाईट अशी परिस्थिती असेल तर ती हि... आपण ज्याच्याजवळ मन मोकळ करतो त्याच्या डोळ्यात पाणी पाहून जाणीव होण् कि ‘त्यालाही भावना आहेत... अन स्वतःच्या त्रासात आपण त्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष केलं’...
हिम्मत केली अन त्याचा हात हातात घेऊन विचारलं... “मला नाही सांगणार काय झालं???”
त्याने अगदी ५ वर्षाच्या मुलागत हुंदका देत “हो” म्हटला...
मनातन दुखावलो गेलो होतो मी... आजपर्यंत कधी असा प्रसंग आला नव्हता ... मी कधीच कोणाला 'माझ्याशी बोल....मला बोलायचय तुझ्याशी ' अस म्हणालो नव्हतो... पहिल्यांदा मनात हि इच्छा कोणासाठी तरी निर्माण झाली होती तेही ... तिलाही वाटत असेल, पण कस बोलू मी ?.....असा विचार करत असेल ती..... अस वाटून... मला क्षणभर सुचेच ना काय बोलाव ते... मला अनपेक्षित होत सगळ... मला हि अस आडवळणाचा रस्ता घेवून अप्रत्यक्षरीत्या नाही म्हणेल अस चुकून सुद्धा वाटल नव्हत... तरीही तिचं चालूच होत ...बोलन... भांडण... समजावण... मी काही एक रिप्लाय करत नव्हतो ...
माझ्या सगळ्या भावना... केलेल्या तिच्याबद्दलच्या कल्पना सगळ्यांना कुठे तरी जखम झाल्याची जाणीव झाली... मी फारच हळवा आहे... अस पहिल्यांदाच मला जाणवल... मी खरच गुंतलोय का तिच्यात???”
मला समजताच नव्हते काय बोलू काय सांगू... मग त्याने माझ्या डोळ्यात पाहून मला विचारलं...
आणि तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल का??? मग मीच अशी समजूत करून घेतली होती का माझी??? तिला काही वाटत नाही, तर मग का येते बोलायला...? का ढीगभर मेसेज पाठवते मला??? माझी समजूत का काढत बसते??? कि फक्त तात्पुरती गरज आहे माझी तिला??? फक्त मन मोकळ करण्याच साधन वाटतो का मी तिला ???.....
ह्या प्रश्नांनी तर मला वेड करून ठेवल होत... काय सांगणार होते मी... कधी असा विचारच नव्हता केला मी... कधीच नाही...
विचार माझा पिच्छा सोडायला तयार नव्हता, आणि मी त्यांना अवोईड करू शकत नव्हतो... उपाशीच झोपलो त्या दिवशी ... दुसऱ्यादिवशी उपवास असूनही... अशीच वागत राहिली असती अन, माझ मन दुरावल असत तर तिला... खरच दुरावल असत का???
इतक हलक्या होत्या का त्या भावना ... कि असल्या शुल्लक कारणासाठी ते उडावं... दूर जाव??? नाही काहीच माहित नाही... काहीच कळत नाही ... तू सांग नेमकं काय झालं ते... सांग ना ग... खूप त्रास होतोय ग... अक्षरशः श्वासदेखील नीट घेता येत नाहीये... काम कारण तर दूरच राहिल... मला झोप येत नाहीये... खाण्यात मन लागत नाहीये... काय सांगू गेले तीन दिवस कसे काढले मी... मी मीच राहिलो नाहीये... सार जग संपल अस वाटतय मला... फक्त तिच्या चारोळ्याच वाचतोय मी... दुसर काही सुचतच नाहीये... सांग ना इतक सोप्प होत का सार??? एवढ जास्त मागीतल का मी??? मला नाही का मन??? मला नाहीका भावना??? मी नाही का मागू शकत काही??? अन दुसर कुणी असत तर मागितलं नसत ग... पण... पण ती मला माझी वाटली म्हणून हक्काने मागितलं... पण ती अशी वागेल अस स्वप्नातही वाटलं नव्हत मला... कधीच नाही...” बोलता बोलता त्याचा बांध तुटला... अन तो कोसळला... ढग फुटाव असे ते अश्रू वाटत होते... मला काय बोलू हे सुचतच नव्हत... श्वास अटकला माझा... त्याला इतका त्रास दिला मी??? मला काही कळेनास झालं... ग्लानी येऊ लागली... तोच... तोच...}
अचानक डोळे उघडले... खरोखर श्वास थांबलेला माझा... धाप लागली मला... सर्वांगावर घाम सुटला... काय होत हे??? नेमकं काय??? मी अस वागली???...
उठून त्याचा प्रोफील लावला... त्याने फोटो टाकले होते... खूप खूप... पण फोटोंकडे लक्षच लागत नव्हत... मी फोन उचलला... पण म्हटलं तो झोपला असणार आहे... म्हणून फोन ठेवला परत...
आठवणीचा पसारा जेव्हा
अखेरचा श्वास गाठतो
मनातल ओठावर यायला असा
वेळच कितीसा लागतो.............Iफक्त तुझ्यासाठी...
आज मी तुला फोन करणार...”
त्याला मेसेज केला...

0 comments:

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)