Monday, June 3, 2013

फक्त तुझ्यासाठी... ३१

आज तर खूप मज्जा आली... आता वेळ होती मुंबई ला परतायची... आता अनामिक ओढ मला लागली होती...  आणि त्यात त्याची साथ ... खूप आतुर होते....


तू सोबत असलास...
कि सगळ जग कस सुंदर दिसत...
तार्यांनी भरलेला ते आकाश हि मग घट्ट मिठीत ओढवास वाटत...
आज पर्यंत असंख्य क्षण जे तुझ्यासोबत जगले...
नकळत माझ्या मनाच्या पाटीवर ते कोरले...
विचारले माझ्या मनाला तर ते हि आज खुदकन हसले...


आज कोण जाणे चारोळ्या खऱ्या व्हाव्या अस वाटत होत... असो... 
रूमवर आलो आणि तयारी सुरु केली... तेवढ्यात तो रुममध्ये आला, knock न करता सरळ आत शिरला... आतून रूम बंद केला त्याने... मी त्याला विचारलं, “काय झालं???” न बोलता पुढे सरकला अन् अगदी जवळ येऊन उभा राहिला... आज पुन्हा एकदा डोळ्यांनीच माझ्याशी बोलत होता... त्याच्या  काळ्याशार डोळ्यातून काहीतरी बाहेर येतय असं नेहमीच वाटत... मी हि मग हळुवार माझ्या पापण्या मिटत त्याच्या बोलण्याला होकार दिला... अभ्यासाचे विषय मला नेहमीच लवकर समजतात... पण त्याच्या डोळ्यांना समजायला मला का जणू खूप वेळ लागतो... किंबहुना त्याच्या सारखे डोळे कोणाचेच नाहीत... इतके सखोल... जणू त्यात खूप काही दडलेलं आहे... आणि ते मी शोधाव अस नेहमीच त्याला वाटत... मनाला हे सारं समजत असेल का? मग आपल्याला का हे उमजत नाही? असे असंख्‍य प्रश्‍न मनाला सत्वू  लागले... आज मला या भाषेचे ज्ञान झाले होते जणू... 

त्याच्या अन  माझ्या मनाची ही नि:शब्द भाषा आज एखाद्या फुलाप्रमाणे उमलत आहे. खरंच किती वेगळी असतेना ही भाषा...आपला रक्ताचा संबंध नसतानाही आपल्याला एकमेकांडे आकर्षित करते.... आपल्याला एकमेकांकडे खेचते... कितीही कंटाळा आला, बोर झालं तरी वेडं मन एका जागेवरुन उठण्‍यास तयारच नसतं...  मी स्वतःलाच म्हटले...
तो जवळ येताच ... एक अनामिक थंडी जाणवली मला मानेवर, अन् मग पूर्ण शरीरात... अस नाही की मी घाबरले होते, पण हे जरा अनपेक्षित होत... तो इतक्याजवळ आला की अगदी त्याची स्पंदन ऐकू येत होती... अगदी जोरात... न थांबता... अगदी रेल्वेसारख...
मी काहीतरी बडबडले, ज्याचा काही उपयोग नाही झाला... तो तसाच उभा  होता, जेव्हा हा अनामिक अबोला शांततेत बदलत होता, मी म्हटलं “पाणी घे तुला बर वाटेल”... मी फ्रीजकडे गेले उघडला... “अरे वाह इथ तर..........” वाक्य अर्ध्यातच सोडलं कारण तो अगदी माझ्या मागे येऊन उभा राहीला होता... मी पुन्हा काही बोलणार तेवढ्यात तो अजून  एक पाउल पुढे आला... आता मात्र मलाच राहवल गेल नाही... मग मीच हात खुले करून त्याला जवळ घेतलं... अन् त्याला उत्तर म्हणून अगदी घट्ट मिठी मारली त्याने... आज पर्यंत एवढी घट्ट मिठी कोणीच मारी नव्हती... (त्या जाड्या रुतुजाने जीवघेणी कोंडी केली होती ते सोडून)
मी त्याला अनुभवलं, त्याच्या प्रत्येक भावनेला अनुभवलं... त्याच्या त्या मिठीत मी हरवून गेले... त्याने त्याच मन माझ्या खांद्यावर टेकवल... अन एकदम मस्त वाटू लागलं... वेगळीच उब जाणवली, अन् मगाशी वाटणारी थंडी कुठे दूर पळून गेली... मन एकदम शांत झालं... आधी कधीच न जाणवलेली एक वेगळीच खुशी जाणवू लागली माझ्या रोम रोम मध्ये...
जरा वेळात मी मागे सरकले त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं दिसत होत, मी ते पुसलं... त्याने स्मित हास्य केलं... मग पुन्हा एक मिठी... मग तोच म्हणाला, “पटकन आवर मंदिरात जायचं आहे दाग्दुशेठ्ला भेटायला...”
आमची बस रात्री १० वाजता होत... यशदाचे मनेजर म्हणाले कि समान ते गाडीत ठेवतील म्हणून मग trolley मध्ये सामान ठेवल आणि पुणे  दर्शन करायला निघालो... बरच ऐकल होत "दगडू शेठ हलवाई " मंदिरा बद्दल, म्हणून मग तिकडे जायचं ठरवल... 

त्याने रिक्षा थांबवली ... काही न बोलता बसून होतो आत... इतकी गर्दी असूनही मंदिराची शांतता आपसूक जाणवली... मुंबईची असल्यामुळे देवासमोर हात जोडणे इतकच मला माहित... अस नाही कि देवात विश्वास नाही... पण अगदी बुडत नाही त्यात... आणि माझ्या अगदी विरुद्ध तो... त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटल जणू तो काहीतरी खूप श्रद्धेने देवाकडे मागत आहे... त्याची ती भावना मला त्याच्याकडे खेचत होती...
काय मागत असेल नक्की... मनाला आता हूर हूर लागली... पण तो काही सांगणार नाही हे माहित होत मला... म्हणून मग मी हि जास्त विषय खेचला नाही... असो...

त्याची सोबत अगदी वेगळीच आहे... प्रत्येक मुला मुली सारखी पण तरीही वेगळी... अस वाटत ... ह्या सोबतीसाठी काही करेन... त्याच्यासाठी काही करेन... प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवावासा वाटत होत...
इतक्या वेळा मंदिरात आले पण हा अनुभव काही वेगळाच होता... आता मंदिराच्या लाईनमध्ये कशी हरवणार होते मी??? तरीही कधी नजरेने तर कधी हाताने जवळ जवळ रहा अस सांगत होता...
एकमेकांच्या सोबतीत वेळ कसा गेला समजलाच नाही... थोड्यावेळ शांत मंदिराच्या अवर्यात बसलो होतो... आणि थोड इकडे तिकडे फिरत गप्पा गोष्टी केल्या...

जरा उशीर झाला त्यामुळे बस stand वर यायला... आमच्यासाठीच थांबले होते... आम्ही चढलो अन बस ने भर धाव घेतली...
तितक्यात तो म्हणाला... अग एकदा सामान बघून घेऊ... म्हणून आम्ही मोजायला सुरवात केली... 

एक, दोन, तीन, चार??? हाआआ?????? अरे चौथी बैग कुठे गेली????
मी सगळीकडे शोधलं... पण बैग कुठेच नाही सापडली... “अरे त्यात माझा laptop आहे रे... जणू माझ सगळ आयुष त्यात... आईच्या आठवणी... तिने लिहिलेले मला पत्र... माझ बालपण...  माझ्या परिवाराच्या आठवणी... माझ्या कविता... माझ्या गोष्टी... ऑफिसच काम ...  सगळंच रे...निर्जीव असूनही सजीवांन सारखा आहे रे मला...”  मला असह्य असा धक्का बसला... माझा धीर सुटत होता...मी आता रडायला आले... त्याच्या खांद्यावर डोके ठेवले... माझ्या केसावरून हात फिरवत तो मला शांत करायचा प्रयत्न करत होता...
“बघ न कुठेच नाहीये... आम्ही सगळ्या बस मध्ये चौकशी केली...  काही केल्या सापडत नव्हती... तो हि जरा tension मध्ये आला... आता माझी सटकली, रडू वैगरे सगळ रागात बदललं... अन् मी यशदाच्या म्यानेजर वर भडकले... ओरडू लागले... 
पण तो मला धीर देत म्हणाला...
"ए मंद, हे बघ रडू किव्वा ओरडू नकोस... सापडेल आपल्याला बैग... शांत हो आधी..." पण मला आता रडू आवरत नव्हत...
त्याने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत माझे डोळे पुसले न म्हणाला... “हे बघ... मी काय म्हणतो ते ऐक... फक्त ऐक... प्रश्न नको करू... ठीक आहे..." 
“अरे पण...” मी काही बोलणार तेवढ्यात त्याने मला टोकल... 
"मी काय म्हटल ... तेवढ ऐक... आणि आधी रडन थांबव माझी मंद..." तो एका मोठ्या माणसासारखा आता मला समजावत होता... अन् त्याने माझ्या कपाळावर एक किस दिला...
“तू निघ या गाडीत मी आलोच मागून तुझी बैग घेऊन...” एवढ म्हटला अन् निघाला...
आज पावसाला हि जणू उधान आल होत... कारणाविना... अगदी वेळ न पाहता बरसत होता... विजा कडकडत होत्या ... जणू माझ अन त्याचा अंत पाहत होता पाऊस... इतक्या पावसात तो परत निघायला उतरला...
आज महेश नंतर पहिल्यांदाच कोणाच्यातरी बोलण्यावर इतका विश्वास वाटत होता... त्या बैगशी त्याचा काहीच संबंध नाही... पण तरीही तो इतक माझ्यासाठी करतोय... कारण ती बंग माझ्यासाठी महत्वाची आहे... आणि मी त्याच्यासाठी हे माझ्या लक्षात आले... त्याचा आपलेपणा आज मला अधिक जाणवला... आता फक्त त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देवाची प्रार्थना करत होते त्याच्या सुरक्षितेची...
Tension तर होत... पण त्याच्या विश्वासावर विश्वास होता...

मी निघाले त्या गाडीत... मनात आल इतक्या रात्री परतण्यासाठी तरी कस वाहन मिळेल... ??? काय करेल???? मी सोबत थांबायला हवा होत का??? 
सतत शांत राहणारा आज खर खूप रागात होता... पण रागावल तर कोणी आपल्या सोबत co -ordinate नाही करणार हे माहित होत त्याला... म्हणून तो नरमला जरा... manager भेटले...   त्यांना सगळी वस्तुस्तिथी सांगितली... पण माझा जीव कुठे लागत होता... सतत त्याला फोन करावासा वाटत होता...  पण त्याने सांगीतलेल की तो sms करेन जरा जरा वेळात अन् सांगेल काय सुरु आहे ते...

मला हीच भीती कि इतक्या रात्री मदत करतील न सगळे त्याला... काळोख पावसामुळे अजून गाढ होत होता... हे भयावह काळेकुट्ट मेघ विनाधास्तीने बरसत होते... पहिल्यांदाच पावसाची भीती वाटत होती... कारण माझा तो एकता होता... कसा हा क्षण ... सोबत असूनही त्याच्या सोबत मी नव्हते... मला त्याची खूप काळजी वाटू लागली... निसर्गाने आमच्या भरणाची पूर्ण तयारीच केलेली दिसते... मी मनात म्हटल...  काळ्यकुट्ट मेघातून ठोकवणारी अग्नी आमचाच निशाणा घेत आहे जणू... 
कापसाच्या ढिगार्यातून छोटीशी सुई शोधण्यासारख  होत... त्याने एकट्याने हात पाय मारून काहीच निष्पन्न होणार नव्हत... सगळ्यांची मदत लागणार होती...  मी हीच प्रार्थना करत होते... कि सगळ्याचं सहकार्य त्याला मिळू दे... त्याला घट्ट मिठी मारावीशी वाटत होती... कधी न संपणारा प्रवास आज खूप लवकर बस धावत आहे अस वाटत होत... अशांत होत होते... पण मग त्याच्या चेहरा आठवला कि उमजायचं... मी तर इथे बसले आहे... त्याच काय होत असेल... मीच जर असा धीर सोडला... तर त्याने काय कराव... म्हणून पुन्हा मनाला समजवायचे... अन शांत व्हायचे... 

सगळ्यात आधी आज इथून किती प्रवासी निघाले ह्यांची यादी काढली... त्यांच्या सामानाची एन्ट्री register मध्ये चेक केली... रंग वैगैरे तर नाही... पण किती bag  होत्या ह्याची एन्ट्री नक्कीच होती... आणि त्या कोणत्या बस मध्ये ठेवायच्या हे हि लिहील होत...
किती वेळ त्याचा काहीच msg किव्हा फोन नाही आला... पण मला खात्री होती ... त्याने जे सांगितलाय ते तो नक्की करणार...

माझ्या बैग ची सगळी माहिती त्याने व्यवस्थित दिली... तो म्हणाला ..."खर laptop बैग आहे ती... dell ह्या कंपनी ची... काळ्या अन् लाल रंगाची..." किती तरी जणांनकडे अशीच बंग असते... आता कशी शोधायची....??? रात्री चे २ वाजले... मी एकदा त्याला फोन केला... त्याच्या सुरक्षे  बद्दल विचारायला... माझा आवाज तर अगदी मंदावला होता... पण इतक्या रात्री त्याच्यासाठी खूप भीती वाटत होती... मी हेल्लो म्हणाले तितक्यात तो म्हणाला... "मी ठीक आहे ... काळजी नको करूस... मी एका बसचा पाठलाग करत आहे कार मध्ये... डीटेल नंतर सांगेन... आणि लवकरच आपल्याला बंग मिळेल... तू plz बघ रडू नकोस... तुझा असा आवाज ऐकला तर आणखी शोधायला वेळ लागेल...” मला प्रेमाने समजावत तो शांत करत होता... 
पण पाऊस हि जणू आज मला घाबरायला मदत करत होता... भाग पाडत होता... त्याला त्याची काळजी नव्हती... पण मी स्वतःला सांभाळाव इतकाच त्याला वाटत होत... खरच सखे मित्र हि आपली साथ सोडतात पण ह्याने माझ tension त्याच समजून उचल होत... 
मी स्वतःला आवरल ... डोळे पुसले अन म्हणाले... “नाही रडत... पण तू मात्र तुझी काळजी घे...” 

(तेवढ्या वेळात हे सार झालं...
आता कोणाच्या किती बंग होत्या हे शोधन तर झाल... पण सर्वात मोठ काम होत त्या बस ला शोधन ज्यात laptop बदली झाला होता... हो... बदलीच झाला असणार मी म्हटल... नाही तर हरवेल कसा....??? तो यशदाच्या luggage पोहोचवणाऱ्या department कडे गेलेला... तिथून समजल आजच्या संध्याकाळ मध्ये किती बस निघाल्या अन सामान कोणी ठेवल ते... सगळ्या एन्ट्री त्यांच्या register मध्ये होत्या...
त्याने चला काहीतरी clue मिळतोय म्हणून जरा धीर आला...  मला तर काहीच सुचत नव्हत... त्याची खूप काळजी वाटत होती पण...

“एका प्रवाशी ने म्हटल... पाणी घ्या ... काहीतरी खा ...जरा बर वाटेल...”
पण हे पाणी अन जेवण  तरी कस गोड लागणार होत... माझा तो माझ्यासाठी सगळ काही विसरून जीवच रान करत होता... मी नको म्हणाले... अन फक्त हात जोडून प्रार्थना करत होते...

आता हे समजल कि असे किती प्रवाशी आहेत ज्यांच्याकडे हि laptop बंग आहे... आणि ते कोणत्या बस मध्ये आहेत... बस driver च्या पुस्तकातून समजल... कि कोणता driver कोणती बस चालवत आहे...  त्यालाही तिथे माझीच काळजी वाटत होती...
आता शेवटच्या टप्प्यावर  luggage dept ने सगळ्या त्या बस drivers ला फोन केला ज्या प्रवाश्यांकडे laptop बंग होती... 
त्या सगळ्या drivers ला थांबायला सांगितले आणि प्रव्श्यांना त्यांची बंग चेक करायला विनंती केली... सुदैवाने एका प्रव्श्याकडून समजले कि तो त्याचा laptop नव्हता... आणि देवाची कृपाच कि ती हि बस मुंबईला जायला १०  वाजता निघाली होती...)

त्याने कार ने जाऊन ती बस पकडली अन ती बंग त्याला मिळाली... आता पाहटेचे ३ वाजले होते...
त्याने लगेच मला फोन केला... आणि सांगितल बंग मिळाली... चुकुनी एका माणसाने त्याची समजून दोन्ही बैग ठेवल्या होत्या... मला तर रडूच आले... काही बोललेच नाही मी... त्याला अन बैगला अंगाशी घेऊन मिठी मारावीशी वाटत होती...
“ओये मतीमंद... रडन थांबव आता... तुझ्यासाठी साऱ्या प्रवाश्यांना त्रास झाला sorry  म्हण... ३ बस ३ च्या ऐवजी ५ तासात मुंबईला जाणार आहेत आज...” तो माझी चेष्टा करत म्हणाला...

त्याला कधी भेटते अस झाल होत... आनंद प्रेम त्याची माझ्यासाठी असलेली काळजी... सगळ एकत्र जाणवत होत...


मित्रा जिंकलस रे...
ह्या काही दिवसात आपलस करून घेतलस रे...
नाही म्हटल तरी तुझ्यात अडकतीये... 
तुझाच अविभाज भाग होतीये...
तुझ्या सवाई... तुझी वागणूक... सगळच आज स्पष्ट झालं...
पहिल्यांदा काहीतरी न शोधातच मिळालं... 
मैत्रीची खरी परिभाषा सांगितलीस तू...
कर सांगू तर मैत्रीची सीमा नकळत ओलांडलीस तू...

 


अखेर सकाळ झाली... अन आता आम्ही भेटणार होतो... पाऊस तर  अजून थांबायचं नाव देखील काढत नव्हत... पण मी  भिजत आहे ह्याच भान कुठे होत... मला तर दिसत होती आता फक्त त्याची साथ... स्वप्न पाहिलं होत एकदा मी भिजत असल्याच... अन तो मागून मला मिठी मारत असल्याच... जणू आज ते खर होईल अस वाटत होत... खूप भिजावस वाटत होत... 
शेवटी तो taxi ने आला... तो हि भिजलाच  होता... 
मला कोण जाणे महेश चे शब्द आठवले... "ए मंद... भावना ओंजळीत घेऊन तू अशी जगू नकोस... त्यांना व्यक्त करण्यातच खरी मज्जा आहे..." अन मी त्याला घट्ट मारली... अन अपेक्षित ते रडू आलेच... 

त्याची मिठी सोडावीशी वाटच नव्हती... मी म्हणाले...मी खूप घाबरले होते रे काळ रात्री... पाऊस नुसता बरसत होता... त्यात तू एकटा... विचित्र विचित्र प्रसंग आठवत होते... तू नीट आहेस न रे??? 
 बघ मी म्हणून तुला मंद म्हणतो... इतके विद्रोहाचे वातावरण आपल्याला संपविण्यासाठी नाही, तर येणार्‍या संकटाचा सामना कसा करावा हे सांगतो होते... कोणी आपले पाय  या ओढ्याच्या पा‍त्रात आपले पाय डुंबण्यापर्यंत पुसला झेलू शकतो का... हे ते पाहत होते... जेणेकरून पाऊस स्वत:च आपल्याला शरण जाईल...  आणि या विजेला घारबण्याचे कारण नाही. कारण तिला माहित आहे, ही तुझी अन माझी मैत्री ह्या  निसर्गाने तयार केली आहे. अशी मैत्री  तिने कुठेही बघितली नाही. त्यामुळे ती आपला फोटो काढत आहे, ते तू का समजून घेत नाहीस...

अंग, आजचे हे निसर्गाचे तांडवनृत्य आपल्यासाठीच आहे. असा योगयायोग कधीच साधून येत नाही.

आज हे थांबणार नाही...  या पहिल्या पावसातच तर दडलेल्या नवीन विजांना अंकूर फुटतो. पाऊस आणि माती यांचही नातं आपल्यासारखंच आहे... म्हणूनच तर आजही त्यांचं नातं अतूट आहे...
किती छान समजावलं त्याने मला... जणू हा पावसाच अन त्याचा प्लान आहे अस तो सांगत होता... हीच तर त्याची समजूतदार पणाची कला मला प्रचंड आवडते... मला अजून त्याच करते...  
भान विसरून वेड्या सारखे हसत होते... तेवड्यात तो म्हणाला... आता नको का तुला तुझी bag ??? ... अरे हो... दे ... ह्याच्यासाठी तर इतका खटाटोप...  आणि आम्ही माझ्या घराकडे  पावसात रमत गमत... त्याची मजा लुटत... एकमेकांवर पाणी उडवत ... निघालो... :)  








-- 


Get Your Own Free Hypster.com Playlist.

0 comments:

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)