Wednesday, September 21, 2011

फक्त तुझ्यासाठी ... भाग ७

अचानक जाग आली, आणि पूर्ण स्वप्न आठवलं. आधी कधी घडल नाही अस्... एकतर मला स्वप्न पडत नाही, आणि पडलाच जर तर आठवत नाही कधीच... स्वप्नाच होत का खर काही घडल, काहीही असो मला मात्र ते आवडलं...
उठली अन् सवयी प्रमाणे बसली याहूवर... पण त्याचा काहीच रेप्लाय नव्हता, अस् नाही की अपेक्षा होती पण तरीही उगाचच पाहाव म्हणून पाहिलं... मग काय रोजचाच दिनक्रम सुरु...
आज नवीन घरासाठी जाणार होते, म्हणून लंचला सांगितल त्याला की यायला उशीर होणार मला...
{काही बांधिलकी नव्हंती पण, तो फार चिडू लागला होता मी उशिरा आले तर, अक्षरशः भांडण करायचा, नेहमी शांत शांत असायचा पण भांडण करतांना त्राण कुठून आणायचा कुअस ठाऊक... सुरूच असायचा, मी काही ऐकून घेणारी नव्हते... मग काय मस्त शाब्दिक युद्ध सुरु... पण छान वाटायचं, हक्काच कुणीतरी आहे रागवणार, चिडणार... पण हद्दीचा हलकट आहे तो, कधी कधी माघार घेणार नाही... मलाच नेहमी नाग्गी टाकावी लागायची L चूक त्याची असो वा माझी, तो रुसलेला असो वा मी, बोलायची सुरवर मलाच करावी लागायची, इतका संताप व्हायचा की काय सांगू, पण काय करणार, उपाय नव्हता ना...}
आली संध्याकाळी घरी {शेवटचे २ दिवस राहणार पण तरी घरच ना...}...
आल्याआल्या याहूची ओढ होतीच, पण म्हटलं नसावा तो, थकलेली मी जरा आराम करावा मग जाऊया आपल्या विश्वात... पण काय करणार “मन” ऐकत नाही ना...
तुला सोडून जाण्याचा विचारच करवत नाही
मन अडकलंय तुझ्यात माझ
काय आहे हे कधी कधी विचार करते
काळीज गुंतून पडलंय माझ...
आणि काय नेहमीसारख मन जिंकल आणि मी आले याहूवर, जरा घरचे कपडे करून आले, तो होताच... तो चंद्रमा जणू बघत होता मला... {पण खडूसपणा नाहीना सुटणार पिंग नाहीच केलं त्याने...}
मीच आपलं..."हेय हाय ...कसा आहेस ?" त्यावर त्याच "आहा " अपेक्षित होताच, पण नाही आला...
मी पुन्हा "हाव आर यु ?" असा प्रश्न टाकला... तर हलकट शिरोमणी म्हणतात कसे “ ५ मिनिट झाले तुला याहूवर येऊन, जवळ जवळ ७ मिनिट झालीत घरात येऊन आणि आता विचार कसा आहेस...”
{आता हे मात्र खूप झाल, थकलेली मी आराम न करता याच्याशी बोलायला आले तर त्याच वेगळाच, म्हटलं सुनवाव चागलं, पण विषय बदलला असता काहीतरी सांगायचं, नाही share करायचं होत त्याच्याशी म्हणून जरा सवरल स्वतःला...}
“बोल न आता शांत का?”, त्याच सुरूच... {म्हटलं आता तर झालाच भांडण, मी लिहत होते की, “कशी आहे वैगरे विचारन तर शिकलाच नाही पण घरच काय ते तरी विचाराव...”}
पण तितक्यात त्यान विचरलं... नाही सांगितल... नाही भाडकलाच ना तो... “ इथ केव्हांपासून चिंतेत आहे, घर भेटल का नाही... पण तुला time pass करण्यापासून वेळ भेटेल तर ना... अग बसलीय काय सांग ना काय झाल ते??? एकट्या मुलीला घर नाही डेल होते ना ??? मग भेटल की नाही??? काय करणार आता???”... {काय बोलू सुचेना ना मला, आज पर्यंत असं किव्वा इतका कधीच नव्हता बोलला तो... कधीच नाही... स्पष्ट दिसत होत की त्याला काळजी आहे... वाट पाहत होता माझी तो...}
“ए मंद बोलणार आहेस का???”, त्याच आपलं सुरूच...
“अरे हो दम तर घेऊ दे जरा, थकली ना खूप...” मी जरा त्याला शांत करू पाहिलं...
“अग drama queen, नको भाव खाऊ सांग काय झाल ते??? तो कोण सतीश का अमित आलेला का तुझ्या बरोबर??? अन् तुझ्या त्या ‘शैली’च काय झाल तिला पण भेटला का रूम??? ”... त्याच सुरूच...
{किती नालायक असाव एखाद्याने, मित्रच नाव जे १०० वेळा तरी सांगितल असणार ते नाही आठवणार, पण मैत्रीणीच नाव जे मुश्किलीने ३ वेळा सांगितल ते बर आठवत...}
“अरे ऐक ना, उगाच नको मध्ये मध्ये विचारू... आणि हो ‘रितेश’ आलेला सोबत... माझा नवरा म्हणून... काय करणार त्याशिवाय घर भेटतच नव्हत ना... जम मजा आली... अरे त्या;अ पाहून घर मालकाने माही विचारलाच नाही... मस्त आहे घर, इथून जरा लांब आहे पण छान वातावरण आणि घरपण सुरेख आहे...”
“आणि तीच काय झाल?”, त्याच्या या प्रश्नावर इतका राग आला की काय सांगू...
“अरे ऐक तर, रितेश उशिराने आला म्हणून खूप बोलले त्याला...{पण त्यामुळे तो व्यस्त आहे अन् फिरस्तीवर असतो हे मालकाला लगेचच पटल...} आणि वरतून त्याला शैल्लीबरोबर तिचा पालक म्हणून जायचं होत म्हणून तिचे फोन वर फोन सुरूच... तो आलाच उशिरा मग तिलाही उशीरच झाला...
काही वेळात शैलीचा फोन आला... तिलाही भेटल घर... पार्टीला बोलवत होती मला पण म्हटलं तू वाट पाहत असशील म्हणून नाही गेले... रितेशने पण बोलवलं,,, पण मी त्यालाही नाही म्हटले... त्याला आभारी, thank u म्हटले तर त्याने हळूच विचारलं... “ मला लागली कधी खोट्या बायकोची गरज तर येशील ना???”.... मी काही बोलणार तितक्यात तो, “अग पण त्याच तर लग्न झालंय ना???”
मी, “ अरे हो मी पण तेच म्हटले त्याला, “अरे मान्यय तू आणि ‘रिता’ वेगळे होता आहेत पण अजून उशीर आहे ना??? २८ तारीख ना??? मग काय रे उगाचच चेष्टा करतो??? म्हटले अन् त्याला चिडवत फोन ठेवला...”
“अग आजच २९ ना??? किती तू वेडी? खराच मंद आहे...” तो अचाणक बोलला...
माझ्यातर नखशीकांत थरथराट झाला... “अरे हो आजच २९, म्हणजे आजच त्याची फरकाटे झाली... म्हणूनच तो उशिरा आला, अन् मी त्याला काहीच नाही बोलू दिल्... किती वाईट आहे मी... बिचारा रितेश... शी किती रागवले मी त्याला... अन् तो.... शी रे... काय केलं मी अस्... काय करू आता... त्याला काय वाटत असेल... कितीरे दुष्ट मी???”
“नाही ग, दुष्ट नाही, हा मंद मात्र आहेसच... असू देत आत्ताच्या आत्ता त्याला फोन लाव आणि चांगलं बोल... मंदपणा करू नकोसं शांत पाने बोल... लगेच फोन लाव मी वाट पाहतो...” त्याने लगेच माझ्यामनातल्या दुविधेला ओळखल अन् मार्ग सांगितला...
{ मी पण लागलीच फोन लावला...
“हे रितेश, काय झाल रे आज कोर्टात???”... मी सावध पवित्र घेत विचारलं...
“काय होणार, आज लोम्बकलेल नात पूर्णपणे तुटलं... सार सुटल माझ... L, खूप खूप प्रयत्न केला पण रीताने ऐकूनच नाही घेतलं...” त्याने अगदीच क्षीण आवाजात उत्तरं दिल्...
“बावलटा सांगता नाही का येत???”
“अग तुला आणि शैली ला मदत हवी होती ना...”
“अरे पण बोलता नाही का येत, की नाही जमणार माझ, किव्वा मला एकट रहायचं आहे किव्वा मला नको त्रास देऊस... अरे इतकी नाही मदत करू की समोरच्याला स्वतःवर पाच्तावा यावा... अरे एका शब्दाने नाही सांगितल मला???”
“जे झाल ते झाल, चांगलं वाटलं तू रागवली तर... नाहीतर सारे सांत्वना दाखवत होते सकाळ पासून... खराच चांगलं वाटलं...”
“इकडे ये डोक भोडते मग अजून चांगलं वाटेल.... अरे तू काही देव नाही मान्य कर, अन् दुखः वाटल्याने कामी होत हे तूच सांगितलेलं ना मला...”
“होग, पण सध्ध्या तूच घरच्या विचारात होतीस म्हणून...”
“काय बोलू नकोसं,,, काही असेल तर सांग...”
“बोललो ना सकाळीच, खोटी बायको म्हणून कधी बोलावलं तर ये.... L
“हम्म्म्म.................................” अन् मी फोन ठेवला, लगेच याहूवर बोलू लागले...}
“मी अशी का आहे रे??? बिचारा रितेश, अन् मी त्याला... आणि तो पण... त्याला नाही का कळत???”... मी माझ मन उघडून ठेवलं त्याचासमोर...
“ए मंद नको जास्त विचार करूस, गुढगे दुखतील उगाच... आणि मला उशीर होतोय... तू जर शांत झाली असशील तर सांग नाहीतर पुन्हा जाग रहाव लागणार मला...”
{आता हा सरळ सरळ emotional blackmail होता... पण खरंच छान आणि प्रभावी होता...}
“झोप...” इतकाच बोलले मी...
“हा, शांत तर झालीय पण जरा विचारपण कामी कर आता... आवाज इथपर्यंत येतोय...”
{त्याला कस कळल??? खरचं आवाज जाऊ शकतो??? नाही... मग???
हा इतक कस ओळखतो मला??? काय आहे अस् जे मला नाही समजल पण त्याने ओळखल???}
“होरे राजा, झोप आता...”
“चाल येतो, उद्या भेटू...” अन् तो गेला...

1 comments:

पवन भदाणे said...

bhannaaat...... waiting for next....:)

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)