Sunday, September 18, 2011

फक्त तुझ्यासाठी ... भाग ६

पण आज जरा गडबडीत होते... कालच नवीन project आलेला... आणि मला tl ने महत्वाच काम दिलं... त्यामुळे काम वाढली... रात्री वेळच नाही मिळाला जराही... सार वाचायचं होत कारण आज साऱ्यांना कामाची नेमणी करावी लागणार होती... त्यामुळे सकाळीपण लवकरच निघाले...
कामात जरा व्यस्त होते तोच, एक unread msg डोकावला... inbox मध्ये नाव बघितलं आणि अचंमभीत झाले...”त्यान मला स्वतःहून msg केला”... {नेहमी मीच स्वतःहून सुरवात करते... तो असो वा नसो मीच बोलते... तो मोजकच पण छान बोलतो... फार मोजक पण हुशारीने... तो मला “मंद” म्हणतो... कारणही आहे म्हणा... मला ना त्याच्या खुपश्या गोष्टी समजत नाही... मी लगेच आपल् ‘म्हणजे???’ ची तलवार म्यानातून बाहेर काढते... काहीवेळा तर उगाचच त्याला चिडवण्यासाठी विचारते...}
तो msg वाचण्याआधीच मन प्रफुल्लित झाल... अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले... का कुणास ठाऊक पण मन गगनात उडू लागलं... काय असणार होत असून असून पण तरीही मन काही ऐकत का कधी???
चारचौघात एकट
बसण्यापेक्षा
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत ..
आपल्याला कोण हवंय
यापेक्षा आपण कोणाला हवंय
हेसुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत ..
आकाशातलेतारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्यतेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत ....!
एक सुंदर कविता त्यान पाठवली होती...अगदी जीवाला जाऊन भिडली...{तस त्याला चारोळी अन् कविता फार आवडतात... केव्हाही कुठेही वाचतो म्हणे...}
अन् त्या क्षणापासून ‘आठवण’ माझ्या मनाला जडली...
तो क्षण मनाने मनात जपून ठेवला...
अन् त्याच क्षणाने अपेक्षेचा अंकुर मनात रोवला....
सार काही अगदी स्वच्छ अन् लख्ख दिसू लागल...
मलाच माझ विशेष वाटू लागल....
.......................
काय करू समजेनास झाल....
शेवटी ठरवलं जास्त विचार न करता जे मनात येईल ते लिहून पाठवायचं....
अन् मी लिहलं...
' काहीच क्षण '
काहीच क्षण आपले असतात
आपल्यासाठीच आलेले असतात
पुन्हा फिरून येतील म्हटल तरी
परत चुकुनही येत नसतात .........
त्याच क्षणात
तू जगून बघ ....
थोडा वेळ का होईना
माझा होऊन बघ .....
सगळ काही
देऊन बघ ....
थोडासा जीव
लावून बघ .......
मान्य आहे तुला तुझ आयुष्य आहे
त्याच आयुष्याचा थोडासा भाग बनवून बघ
त्याच क्षणांना मनाने टिपून बघ ...
थोडासा जीव लावून बघ .............
फक्त तुझ्यासाठी...
का कुणास ठाऊक, माहित होत की तो वाचेल अन् त्याला आवडेल... फक्त तुझ्यासाठी हे त्याला सांगायचं होत... अन् त्यालाही ते कळणार होत,,,
सायंकाळी यायला जरा उशीरच झाला... काय करू ट्रेन सुटली... शेवटी माझा tl आला घरी सोडायला...
{सांगितलंय ना चांगला आहे तो... मदतही करतो... पण कधी कधी.... एरवी काम लावतो जशी आता लावलीत... पण काय करणार... आलीय भोगासी असावे सादर...}
आले घरी... आल्या आल्या नजर त्याला शोधत होती... आणि तो होताच... माहित होत माझीच वाट पाहत होता...{पण त्याने कधीच म्हटल नाही तस...मी तर खुशाल सांगायची, “मला तुझी गरजच पडलीय... खर तर तुझी सवय जडलीय...” पण तो तर खडूस आहेच... काय मनात ते सांगितल तर उल्का पडतील ना त्याच्या अंगावर... हलकट कुठला... पण खरतर मला कधी आवश्यकता वाटलीच नाही... त्यान सांगितल नाही तरीही न समजण्याइतकी मी लहान नाही... पण त्याने बोलल तर काय लहान होईल का तो???}
{मला तर कधी तो माझ्यापेक्षा वेगळा वाटलाच नव्हता....त्यामुळे माझ्या जिजुंवर नाही तितका त्यावर हक्क गाजवायचे मी... मीच बोलत असायचे अन् त्याला म्हणायचे का नाही बोलत तू???
बिचारा कधीच काहीच नाही बोलला... वाटेल तेव्हा वाटेल तस बोलायचे त्याला... माकड पासून हलकट पर्यंत सार काही बोलायची... राग तर नाकावर असतो माझ्या... चिडायला अन् रागवायला काही कारण तर लागत नाहीच मला...}
न बोलणारा तो, शांत अढळ पर्वत तो.... पण पर्वतालाही पाझर फुटतो तसाच “तोही” आजकाल माझ्यावर चिडतो... त्याचही बरोबर आहे ना... मला काम जास्त लागल्या पासून त्याला कमी वेळ देत होती मी... बिचारा त्यालाही काहीशी सवयच जडली होती ना माझी... म्हणून तो चिडू लागला होता... हक्क गाजवू लागला होता... पण त्यालाही समजायला पाहीजे ना....... वेळात वेळ काढून त्याच्याशी बोलायला येते मी... काहीही काम असो त्याच्यासाठी थोडा का होईना वेळ देते मी... आज कल तर त्याच्याशी बोलता येणार नाही म्हणून ताई कडे जान कामी केलं मी... अजून काय करू??? उगाचच चिडतो, काहीसा ओरडतो, थोडा भांडतो... माझी काही चूक नसूनही मला शिक्षा देतो.... L
पण मला त्याच समजून सार काही करतो म्हणून,,,, अजून जास्त जवळचा वाटतो तो मला...
आता त्या दिवसच पहा ना...
वाटलेलं जम तापला असणार तो... त्याच्यासाठी इतकी छान कविता लिहली पण एका शब्दाने काही विषय नाही काढला त्याने... उलट मलाच बोल लावू लागला... “कुठ होतीस??? कळत नाही का मी वाट पाहतो...” मी जरा सांबाळून घ्यायचा प्रयत्न केला... “ अरे काम होत ना, काय करू?”...
समजून घेण तर दूर उलट मलाच सांगतो, “म्हणजे तूं काय वाटत मला काम नसतात??? रिकामटेकडा आहे का मी???” मग मीपण किती ऐकून घेणार... मग काय झाल भांडण...
तस भांडण म्हणून काही भांडण नव्हत ते... पण उगाच....
आणि तो काही चुकलो म्हणणार नव्हताच... म्हणून मीच म्हटल आणि काही क्षणात वर्षासारखा जाणवणारा अबोला दूर केला... त्याला झोप लागत होती अस म्हणून लगेचच झोपी गेला...
मग मीच विचार केला... ‘ खराच किती निरागस आहे हा... पण मनातलं का बोलत नाही??? मला त्याची गरज आहे पण त्याच काय??? मी येते म्हणून बोलतो, माझा हिरमोड न करायला ??? का त्यालाही नाही होत माझ्याशिवाय करमायला???’ या विचारातच झोपी गेले... जेवणही केलं नाही....
{ काही वेगळच वाटणार, बहुतालच जग... जणू काही असंख्य दरवाजे असलेली इमारतच माझ्या समोर होती... हळूच एक दरवाजा उघडला अन् त्यातून तो बाहेर आला... एक एक कवाड उघडत मला माझीच ओळख करून देत होता... मग एका दरवाज्याजवळ थांबला अन् म्हटला....
का ग उगाचच तू इतकी चिंता करते???
काहीच क्षण म्हणते अन् असंख्य सोडते???
तुझा झालोय अन् तुझाच राह्लोय...
तुझ्या सोबतच्या एका क्षणात एक जीवन जगलोय...
आयुष्याचा भागच नाही पण तुला सार आयुष्यच दिलंय...
जीव तुझ्यात अडकलाय इतक तू मला वेड केलंय...
अस म्हणताच तो एका दारात शिरला... अन् त्याच्या आठवणीनीच्या रुपात प्रत्येक दरवाज्यात उरला....}
फक्त तुझ्यासाठी ... भाग६



0 comments:

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)