झोपायाआधी रोज सारखा मेल लिहायला घेतला पण आज... जरा वेगळाच मनात आल आणि त्याला चारोळी लिहून पाठवली...
“
खूप सुंदर भेट आहे ' तू ' माझ्यासाठी
अगदी शेवटपर्यंत जपावी अशी
त्याहूनही अनमोल तुझ्या असण्याची जाणीव
शेवट झाला तरीही अनुभवावी अशी ...!!
फक्त तुझ्यासाठी...
तुझ्यासाठी बनवलीय ,तुला डोळ्यासमोर ठेवून,प्रत्येक शब्दात तू आहे ,प्रत्येक ओळीत तुझा भास आहे , पूर्ण चारोळीला तुझाच स्पर्श आहे ."
शांत झोप लागली...
{ काग उठ ना... हळूच म्हणत तो जवळ आला, उठवत मला खिडकीपाशी घेऊन गेला...
बाहेर रिमझिम पाऊस मजा करत होता, माझ्या अन् त्याच्या व्यतरिक्त तिथ फक्त पाऊसच होता...
बाहेर रिमझिम पाऊस मजा करत होता, माझ्या अन् त्याच्या व्यतरिक्त तिथ फक्त पाऊसच होता...
काही थेंब हलकेच झेलत त्याने माझ्या चेहऱ्यावर उडवले,
त्या थंड अन् काहीश्या अनपेक्षित थेंबांनी मी जरा दचकले...
बाहुपाशात घेत मला, हळूच कानात म्हणाला...
जा भूतलावर आलोय फक्त तुझ्यासाठी,
‘तूला’ माझ, अन् फक्त माझ करण्यासाठी...
तुझ्या अनुभवात आणि भाव विश्वात
एकटाच येऊन राहण्यासाठी....
मी तर आहे फक्त तुझ्याचसाठी,
जसा हा पाऊस धरणीला शांत करण्यासाठी...
आज तुला अन् मला पाहून हे आकाशात बघ कसे ढग दाटले,
धरणीला भेटण्यासाठी या आभाळाचे काळीज फाटले...
या आभाळाने पाहिले आपल्याला मिठीत,
जळतोय बिचाऱ्या या विरहाग्निच्या धगीत...
पाऊसाने भेटून मिटवली धरतीची तहान,
जसे मिठीत माझ्या विसरलीस तू ध्यान...
पाऊसाने जसे सारे मन भिजून जातात,
खर तर धर्तीसाठी हे थेंब प्रेमगीत घेऊन येतात...
पुन्हा सारे म्हणतात आला पाऊस ओला ओला,
पण तुझं माझ प्रेम दिसत त्याच्या प्रत्येक थेंबात मला...
म्हणता म्हणता पुन्हा काही थेंब त्याने माझ्या मानेवर शिंपडले...
यावेळी दचकण्याऐवजी मी त्याला घट्ट बिलगले... }
सकाळी उठले... सरळ खिडकीजवळ गेले... बाहेर तर पाऊस नव्हता, पण अचानक त्याच्या असण्याच्या कल्पनेने तिथेच थबकले... मनाला समजावलं अन् माघारी जाऊ लागले, तोच खिडकीतून काही तुषार मानेवर पडले, sprinkler च्या रुपात त्यालाच मी पाहिलं, हसले अन् कामाला लागले...
आज तर खूप काम आहेत, सामान न्यायचं ना... आणि साहेबांची मोठी मागणी आहे ना, सगळ्यात पहिले नेट हवं घरात... तस मला पण आता त्याच्याशिवाय जगण कठीण जाईल... बर झाल त्यान सांगितल...
किती किती सावरायचं... समजतच नाहीये काय करू... ते बंद खोले पाहून पाहून चक्कर येत आहेत... काय करू ??? इतक सार??? पण त्याच्याशी बोलायचं म्हणून सार पहिले आवरायल हवं ना.. म्हणून करतेय...
{तस उचलायला वैगरे माणस लावलीत आणि मित्र मैत्रिणीपण आहेतच, पण तरीही दगदग तर पुरनारच ना...जरी काम बाकीचे करत आहेत पण डोक तर मी खपवत आहे ना... मान्य आहे planner सुजेन आहे पण तरी पण... अरे यार शिफ्ट मी होतेय ना... मग???}
जवळ जवळ सगळ झालं... छोटीशी पार्टी पण झाली... संगल्यांना कसेतरी बाहेर काढले अन् नेट लावलं...
“हाय, कसा आहेस?”, माझा नेहमीचा प्रश्न विचारला...
“आहा, किती ग उशीर???”...
मग काय, सार सांगितल कुणी काय आणि कस केलं... केव्हा अन् किती ओरडले, किती हसले... सार सार त्यान न विचारताच सांगत होते... अधून मधुन आहेस नारे हाणून खात्री करत होते... तो लगेच बोल ग आहे इथेच म्हणून पुन्हा माझी बडबड सुरु करायचा... मला तर सवय आहे खूप खूप बोलायची पण तो कस एवढ वाचू शकतो याच विशेष वाटलं... थाक्लीय म्हणून लवकर झोपायला सांगितल त्यान...
‘ठीक आहे पण उद्या तुला माझ एकाव लागेल’ या अटीवर संभाषण थांबवलं... आज मात्र त्याला काही मेल न करताच झोपले...
{डोळे झाकून तो मला कुठेतरी नेत होता... ना काही विचारत होता न काही सांगत होता...
“बघ डोळे उघडून”, सांगून त्याने डोल्यावारचे हात काढले...
एका रिकाम्या plot मध्ये आमचे घर त्याने मांडले...
चांदणे पांघरले होते, अन् निजायला जमीन होती...
तो सोबत असतांना याहून अधिक कशाचीच आवशकता नव्हती...
तरी पण बेड रूम कुठ अन् हौल कुठ?
सार त्याने आधीपासूनच ठरवलं होत...
इवल्याश्या plot मध्ये
सार जग त्याने मांडलं होत...
“या बाल्कनीत उभ राहून मुक्त पाऊसात खेळू आपण,
याच हौल मध्ये सुखदुखाचे मिश्रण घोळू आपण...
या खिडकीत बसून रातराणीचा बेधुंद सुवासात हरवू आपण...
आणि या टेबलावर बसून एकमेकांना ओठाने घास भरवू आपण...”
पण सगळे पाहत आहेत अस् त्याला आठवण करून भानावर आणल मी,
मनात नसूनही त्याला बहुपाशातून स्वतःला सोडवल मी...
“कुणी पाहतंय, काय म्हणतील या गोष्टीत गुंतायचं नसत...
‘आला आपला क्षण’ म्हणून त्या क्षणात जगायचं असतं...”
फक्त तुझ्यासाठी ... भाग 9
0 comments:
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)