पुन्हा सकाळी ऑफिसात जरा उशीरच झालेला जायला, गेले आणि काम करू लागले... काम करायला मजा यावी अस काही नसल तर रटाळ काम नव्हत माझ... आणि माझ्या विश्वात जाण्याची मुभा असल्यामुळे काही प्रश्नच नव्हता... आमचा tl {team leaeder} तसा स्वभावाला चांगला आहे... काय हवं ते स्पष्ट सांगतो अन् ते दिलेल्या मुदतीत द्यावी हीच त्याची अट... कधी येऊन टोकनार नाही... का कधी उगाचच त्रास देणार... उलट त्याच्या अनुभवामुळे आम्हीच स्वतःहून त्याला विचारतो काही अडल तर...
तोही तितक्याच तरबेजपणे सांगतो... बऱ्याच वेळेस आम्ही लंचपण पूर्ण team मध्ये करतो...
सारे मला quick learner म्हणतात... त्यांच्या मते मी पटकन शिकते...{ अन् माझ्या मते मी कोणतीही गोष्ट कंटाळा येईल इथपत खेचुच देत नाही... }
बहुतेक मला दिलेल्या वेळे अधिक माझ काम पूर्ण असत...{काय करणार दुसर काही नाहीच ना करायला... त्यामुळं ऑफिसात सार लक्ष कामात...}
पण आज मन काहीसं भटकत होत, राहून राहून याहू ला भेट देत होत...
आणि आला तो चंद्रमा... मी लगेचच “ हाय!!! कसा आहेस???’’ विचारलं...
आणि आला तो चंद्रमा... मी लगेचच “ हाय!!! कसा आहेस???’’ विचारलं...
त्यानेही लगेच उत्तरं दिल “आहा”...
गप्पा सुरु झाल्या... त्याचा तो जेवायचा वेळ होता...
{अस वाटलं आज माझ्याशीच बोलायला आला आहे तो... अन् त्याचा ‘आहा’ म्हणजे जणू मला पर्वणीच खूप काही सुचायचं... सांगावास वाटायचं.... पण का कुणास ठाऊक विचाराव अस काहीच नाही वाटलं... तो PHD करत होता... nephrology वर .......लहान मुलांच्या kidney होणार्या रोगाबद्दल म्हणे त्याच्यावर... मला काही जास्त समजल नाही आणि मी कधी त्याला खोडून विचारलं नाही... माझ्यामते तो डॉक्टर होता, तितकच पुरेस होत जाणून घ्यायला... बाकी त्या चन्द्रमाची निरागसता जाणवायची त्याच्या बोलण्यातून...}
आम्ही वेळ मिळेल तसं भरपूर बोलायचो , मन्जे मी लिहायची आणि तो वाचायचा हेच आमच संभाषण होत... माझ सार काही बोलन ऐकून घ्यायचा तो अगदी शांततेत... आणि मलाही काहीतरीच मजा यायची त्याच्याशी बोलतांना... अगदी अलगद मनाची घडी उलगडायची...
माहित असायचं की तो येतो ते फक्त माझ्याशी बोलायलाच..... त्यामुळे एक शाश्वती ती असायचीच पण तरीही थोड्या अंतराने त्याला विचारत असायची...’ आहेस ना???’.....
त्याचा तो ‘आहा’ तर जणू माझ्या मनाची कवाड उघडायचा... अन् न विचारताच आत शिरायचा... सवयच जडली त्याची... आता तर स्टेटस हि online ठेवायची गरज नव्हती, माहित होत फक्त माझ्याशीच बोलाय्साठी येतो.... आणि जरी नसला तरी माझ काही बदलायचं नाही... अख्य करणार, औपचारिकता म्हणून काहीच शिल्लक उरलं नव्हत... तो जरी online नसला तरी offline message लिहायची मी... खात्री होती की तो वाचणार... हक्काचा झाला होता तो... माझ ऐकणारा, न बोलूनही खूप काही बोलणारा... माझ्यासाठी येणारा... अन् न रागवता माझ सार काही ऐकनारा...
मला वाटायचं की तो कुठतरी आहेच बसलेला... अन् त्याने कधी उत्तरं नाही दिल तर मग झाल...
“ करे का बोलत नाहीस???” इथपासून तर “बॉस ने रागवल का???” इथपार्यान्त् सार काही विचारायची...
“आहेस का? बोलत का नाहीस???” हे तर ठरलेलं वाक्य...
नाहीच काही सुचलं तर त्याचच नाव १० १५ वेळा लिहायची...{कधीच त्यान टोकल नाही, काहीही करण्यापासून रोखल नाही... माहित होत तो जास्त बोलका नाही, समजत होत फक्त माझ्यामुळे तो इतक्तारी बोलत होता... पण काय करणार घरची खेतीच समजली होती त्याला... त्यामुळे अनेकवेळा कळत होत पण वळत नव्हत...}

जेव्हाही वेळ मिळायचा तेव्हा लिहायची त्याच्यासाठी... जीवनाचा एक अत्यावश्यक घटक बनला तो...
सकाळी उठाकी की पहिले त्याला लिहणार... तयारी झाल्यावर पुन्हा तेच.... ऑफिसात काम झाल का लगेच माझी झेप yahoo कडे जायची... संध्याकाळी घरी आल्यावर फ्रेश होण्याआधी त्याच्याशी बोलन अंगवळणी पडल माझ्या... झोपण्याआधी न चुकता लिहायची...दिवस भरात तो online असेल तर लगेच उत्तरं द्यायचा... माहित होत मला कधीच avoid करत नव्हता...पण जास्त बोलत नव्हता... मोजकच....अनेकदा त्याला विचारलं सुध्या की तू मोजून लिहतो का???? की आज फक्त २०० शब्द लिहायचे अस काही???

{पण तो बोलायचा खूप बोलायचा, माझ्या विचारात जेव्हा त्याला वाटायचं तेव्हा यायचा... गप्पा मारायचा... सोबत फिरायचा... इतकाच नाही तर अनेकदा स्वप्नातही यायचा... माझ्या दिवसभर चाललेल्या बडबाडीचे वृत्त मलाच सांगायचा...}
सारा दिवस असंच निघून जायचा... काही वेळ तो सोबत असायचा इतर वेळ त्याचे विचार...आणि जर तरीही काही वेळ शिल्लक राहिलाच रात्री मी झोपलेली असतांना तर त्याचे स्वप्न...
{विचित्र गोष्ट होती... जरी मी त्याला पाहिलं नव्हत, आवाज नव्हता ऐकला तरी तो स्वप्नात यायचा...}
सवयच पडली होती ना... आणि वेळी जवळ जवळ ठरलेल्या असायच्या... मी रात्री झोपण्याआधी एक चारोळी किव्वा कविता पाठवायची... तेव्हा तो झोपलेला असायचा... मग सकाळी उठल्या उठल्या पुन्हा लिहायची... तेव्हा तो ऑफिसात असायचा... मग त्याच्या लंच time ला मी घरीच असायचे बोलायला...
मग माझ्या लंच timeला तो घरी गेलला असायचा... मी ऑफिसातून घरी लवकर यायचे... तेव्हा त्याचे जेवण आटोपले असायचे... सार कस बरोबर जुळून आलेलं होत....
फक्त तुझ्यासाठी....भाग ६
फक्त तुझ्यासाठी....भाग ६
0 comments:
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)