Saturday, September 10, 2011

फक्त तुझ्यासाठी ... भाग ४



निघाले ऑफिसात, तशी ऑफिसातली लोक चांगली आहेत... तस कॉम्पुटरवर काम मला आवडत, त्यामुळे दिवस कसा जातो कळत नाही... सारेच चागल्या ओळखीचे आहेत...{ ते काय आहे, मला मनमोकळ बोलायला फार आवडत, त्यामुळे मला सारे चांगलं बोलतात, काही ना काही सांगतात...}
ओफिसातुनही माझ्या विश्वात पोहचण्याची व्यवस्था असते म्हणून बघते काय सुरु आहे ते...
तस मला बोलायची फार आवड आहे, ती कडे जाते तेव्हा फार धमाल करतो आम्ही... भाऊजी आणि माझा भाचा सारेच कस छान वाटत... माझ्याही मनात मग काहीसं काहूर माजत... पण म्हणतात ना सारच नाही जमत सावरायला......
मी तस बाहेर फिरन जास्त पसंत नाही करत... किंबहुना एकट फिरन नाही आवडत मला...
म्हणूनच बसते पुन्हा आपल्या चारोळीच्या सानिध्यात.... ताई पण करते, पण मोजक्याच आणि त्याही प्रेमावर... {बावजींना वाचायला सांगते, ते वाचतात अन् सांगतात छान आहे... तिला पण माहित आहे अन् मलाही की त्यांना नाही रस याच्यात, पण ताईचा हिरमुस होऊ नये म्हणून वाचतात...} मला नाही जमत बुआ ते, काय करणार अनुभव नाहीये ना...
कुणीतरी आपल्यावर प्रेम करतय,
कुणालातरी आपली ओढ आहे ,
हि कल्पनाच किती सुंदर,
हि जाणीवच किती गोड आहे...
हा तर वियश तर फारच चांगलाय,
पण काहींनाच तो लाभलाय...
प्रेमाची अपेक्षा अन इच्छा सार्यांनाच असते,
फक्त एका नशिबाची गरज तेवढी भासते...
मग तर काय!!!! हात तिचाच हाती हवा,
ग्रीष्मातला भानू देखील फक्त देतो गारवा...
सर जग मागे राहत, असतो आपणच राजा अन ती आपली राणी,
ओठांच तर ठाऊक नाही पण मन नक्कीच गात गोड गोड गाणी...
प्रेमात साजन अन साजणी,
असतात या प्रेमरसात न्हाउनी...
मग असते तीच लोचनी,
कधी रंगुनी तर कधी लाजुनी...
म्हटल स्वतला...
माहितीये या प्रेमाच्या नादात अनेक बुडाले रे,
या प्रेम अग्नीत असंख्य जीव जाळले रे,
तर म्हणतो कसा...
विसर झाले गेले सख्या रे,
प्रेम झालाय आता तुला रे...
पण करणार तरी काय???
प्रेमाची जादूच भुरळ घालणारी आहे,
अन प्रेमाच्या या दुनियेत नेहमीच एकाची भर पडणार आहे...
असंच आपला नेहमीसारखा दिवस गेला, थोड संगणकावर काम केलं अन् ते आवडलंही सरांना... कसला तरी उत्साह जाणवत होता मनात...घरी आले, फ्रेश झाले अन् सवयी प्रमाणे शेरली माझ्या विश्वात...
कुणाशी तरी बोलायची इच्छा होती, ताई तर अजून ऑफिसात असणार {तीपण working woman आहे ना...}
तो अन ती ...... समूहावर काहीच नावे नव्हते अजून... तीच सकाळची ओळ... म्हणून दुसऱ्या ओळीची वाट पाहण्याला उपाय नव्हता...
तितक्यात एक हिरवा दिवा पेटला... तो चंद्रमा जणू हाक मारत होता मला...
"हेय हाय ...कसा आहेस ?" त्यावर त्याच "आहा "...
मी पुन्हा "हाव आर यु ?" असा प्रश्न टाकला.
त्यान म्हटल " सकाळी भेटलो तेव्हा जसा होतो अगदी तसाच आहे , तू कशी आहेस??"...
त्यावर "मी छान आहे " अस साध अन् पाठनितल उत्तरं दिल...
"आहा ...मी दिसायला नाही विचारल " त्यान उगाचच छेद काढली...
त्यावर एक हसणारा स्मायली पाठवून मीही तोऱ्यात उत्तरं दिल "मी दिसायलाही छानच आहे "...
{ पहिल्यांदा कुणीतरी छेड काढलेली मला चालत होती... किंबहुना आवडत होती...
का कुणास ठाऊक “ मी दिसायलाही छानच आहे ", या माझ्याच वाक्याच मलाच हसू आल... तस बोलकी असली तरी स्वतः विषयी नाही जास्त बोलत मी... आणि जास्त उघड नाही होत कुणाशी, त्यामुळेच orkut, gmail कुठच स्वतःची जास्त माहिती नाही टाकलीय मी... फोटोतर नाहीच नाही... पण कस मलाच नाही कळल त्याला अस बोलून गेली...}
मग पुढ असंच पुन्हा माझा पट्टा सुरु झाला... “आज मी इथ अस वाचल पासून तर तुझा स्वभाव असा का???” पर्यंत सार काही बोलत होते... त्याच उगाच अद्जून मधून काहीतरी उत्तरं येत, पण बाकी मीच बोलत होते... अन् त्यानेही जास्त टोकाल नाही... ऐकून घेत होता सार काही...
या तीन दिवसात तिसऱ्यांदा बोलत {
chat} करत होतो आम्ही...
मी न थांबता बोलणारी अन् तो सार ऐकून घेणारा अन् मोजक्याच पण प्रभावी शब्दात उत्तरं देणारा अस वेगळाच गणित मांडल होत...
मग अचानकच मी विचारल "नेहेमी याच वेळी असतोस online कि ,आज सुट्टी म्हणून?"...
त्यान म्हटल "नेहेमी online असतो ,ज्याला बोलावस वाटत तो पिंग करतो,आणि मी पिंग करणार्यांचा हिरमोड करत नाही "...{ कुणी कस अस direct बोलू शकतो या गोष्टीच आश्चर्य वाटलं आणि हसू देखील आल...}
"खरच हसले हा ,मन्जे माझा हिरमोड केला नाहीस त्याबद्दल खरच आभारी आहे .माझ्या ओफिसमधे जीमेलिंग आणि ओर्कुटींग बंद आहे त्यामुळे मी याहू वापरते. फक्त रोज सकाळी आणि रात्रीच इथे यायला जमत . तुझी हरकत नसेल तर याहूग्रूप मध्ये add होतोस का ? कारण तुझी आणि माझी वेळ मागेपुढे आहे ." एवढ सगळ एका दमात. बोलून मोकळे झाले... का कुणास ठाऊक मजा येत होती बोलायला.... जणू फार जुनी ओळख आहे...{मनात आल जर नाही म्हटलं तर?????}
पण त्याने दिला याहू चा आयडी. मी पटकन add करून "welcom to my world " असा याहूवरचा पहिला मेसेज पाठवला... अन् माझ्या विश्वात त्याला सामावून घेतल...
पुन्हा जरा ती अन् ती... कडे फेर फटका मारून आले... अन् झोपी गेले...

फक्त तुझ्यासाठी....भाग ५

0 comments:

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)