Wednesday, February 6, 2013

फक्त तुझ्यासाठी... भाग २७



आज जणू सगळ perfect वाटत होत..म्हणजे एखाद्या vaccation ची कशी perfect सुरवात व्हावी तशी... महेशच surprise, महेश आरती च एकत्र येणं... माझी अन माझ्या खास मित्राची अशी अविस्मरणीय भेट... किती सुंदर क्षण आहे...

एक क्षण असा कि हरवून जाते मन...
तुझ्या येण्याने... तुझ्या स्पर्शाने... तुझ्या हास्याने...
मी स्वतःचीच उरत नाही... जेव्हा बघतोस तू प्रेमळ नझरेने...
उरतात ते फक्त अबोल क्षण... जे असतात विणलेले असंख्य आठवणीणे !!!

राहून राहून आम्हा दोघांना सगळाच स्वप्नगत भासत होत... पण मग... त्या हवाई सुंदरीचा चेहरा आठवायचा आणि हे स्वप्न नाही... अस विश्वास बसायचा...
महेशला कौतुकाची २ शब्द सांगावीशी वाटत होती, त्याच्यावर लाडीकपणे रुसावंसही वाटत होतं अन त्याच्या पाठीवर एक धन्यवादाची शाबासकीही द्यावी वाटत होती... पण सारं काही भेटल्यावर...
आत्ता मात्र मी अन माझा तो... माझा निरागस चंद्रमा, अन् त्याची मी मंद... ह्या
surprise package ला मला आयुष्यभरासाठी स्मरणांत ठेवायचं होतं...
बसल्याबसल्या टिश्यू पेपर वर लिहीत होते,
बागडतोय फुलपाखरू ...
उधळूनी रंग आनंदाचे ...
पावसाच्या थेंबात त्या ...
खुलतोय रंग इंद्रधनुष्याचे ...

तोच त्याने टिश्यू घेतला हातातून अन् लिहलं...
इंद्रधनुच्या  रंगात  त्या  ...
सप्तर्षीच्या तारकत त्या  ...
सात हि दिवस असुदेत  ...
नयनात तुझ्या आनंद हा ...

“चारोळी काय तुलाच येते... मला हि यायला लागली...” तो हसत म्हणाला...
“ती कशी बरी??? संगत का असर
है... ऑर क्या???” मीही लागलीच उत्तर दिल...
“वा
  आपका ये अंदाज भी लाजवाब है... हम तो फिदा  हो गये... पण तू मराठी म्हण ऐकलीय का? ढवळ्याशेजारी पिवळा बांधला, वाण नाही गुण लागला... J” अस बोलून तो हसू लागला... अस म्हणताच त्याने माझे केस ओढले... आमच सगळे संभाषण  हवाई सुंदरी एकत होती आणि ती म्हणाली sir  & madam it’s our destination . thank you...

पुन्हा त्याच्या प्रश्नांची सुरुवात होणार होती, अन तेव्हा मला माणूस या जातीतील पुरुष या उपजाती बद्दल एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, कितीही अबोल असलीत बाहेरून, आत मात्र खूप सार्या गोष्टींचं कल्होळ घेऊन जगतात अन तो कल्होळ असा कुणीतरी पचवून घेणाऱ्या व्यक्तीसमोरच बाहेर निघतो, कधी न कधी, कुठेतरी...
मी असाच माझ्या अंदाजमध्ये एक प्रश्न केला त्याला...
तू जेव्हा लहान होतास तेव्हा तू काय होता??????? सांग बरर....
त्याला अस वाटले अरे आता तर आपण काय बोलत होतो आणि हिने काय विचारले हे... खूप डोके खाजवलं पण जेव्हा त्याला उत्तर नाही आले... “अरे  तू बाळ होतास... हेहेहेहे” म्हणत मी हसू लागले... 
‘आह्हा!! खरंच की!’ अपेक्षित असलेली त्याची प्रश्न नाही आलीत पण अपेक्षितच असलेला त्याचा तो जादुई शब्द आह्हा ऐकायला भेटला अन भरकटलेच मी...
"आहा" ...शब्द फक्त दोन अक्षरांचा....
आहे फक्त अन फक्त...
तुझ्यातला वेगळेपणा दाखवणारा...
जणू काय जादू करतोस ह्या एका  शब्दाने... 
हरवते मन...हरवते मी स्वतः ...
"आह्हा" मंद चाल airport आल... तो माझा हात धरत म्हणाला...
“काय जादू आहे रे तुझ्यःया आहा... म्हण्यात...अगदी मंत्रमुग्धच करतोस”...

मी आजुबाजूच भान न करता पटकन बोलून गेले... माहित नाही त्याने ऐकल कि नाही... पण मी मात्र खाली बघून घट्ट डोळे बंद केले... अन स्वतःल आश्वासन देत होते कि त्याने नसेल ऐकल...

airport वरची गर्दी... चेंगरा चेंगरी... गोंगाट पाहून... भारतात आल्या सारखा जाणवल... कदाचित घाटकोपर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी राहून ह्या सर्वांची अजूनही कुठेतरी सवय होती मला... म्हणूनच कदाचित शांत होते...
पण तेवड्यात त्याने माझा हात पकडला... अन मला बाहेर आणत होता... एकदा तर गर्दी पासून वाचवायला त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला चक्क जवळ घेतले... अन मी काहीच बोलले नाही...
हेच जर महेश ने केल असत... तर मुंबई मध्ये वावरली आहे मी... ह्यावर मोठा lecture  दिला असत.चार पाच शिव्या हि दिल्या असत्या...
पण ह्याला मात्र मी काहीच बोलले नाही... खरं म्हणायचं तर घाबरगुंड वाटायचा... पण नाही... कुठतरी शूर आहे माझा तो... भांबावूनचं टाकल त्याने मला...
त्याला कदाचित लक्षात आले असावे... म्हणून बाहेर येताच त्याने हात सरकवल... आणि typical hero  सारखा त्याचे केस निट करत... नझर फिरवत... नकळत थोडस लाजत... sorry  म्हणाला...
मी हि typical heroine सारखी माझी लट बाजूला करत... मिश्कील हसत... कडेने ओठ चावत... खाली पाहत होते...
दोघांनाही कदाचित बरच काही सांगायचं होत... पण एरवी chat मध्ये बाहेर येणारे शब्द... ओठांना किनारा समजून तेथेच अडखळत होते... मग काय? दोघापन शांतच होतो... एकमेकांच्या मनातल... guessing करत होतो... अन स्वतःला बाहेर आणण्याचा विचित्र प्रयत्न करत होतो...

पुण्याला निघालो....एका चांगल्या मित्र सारखा मला काहीच त्रास होऊ नये ह्याची काळजी तो घेत होता..
taxi करू आमचा दोघांच ठरल...
म्हटल २१/२ तासांच तर प्रवास असेल... काय करणार आम्ही... खर सांगायचं तर... काहीच सुचत नव्हत....
किती वेळ आम्ही दोघ काहीच बोलत नव्हतो...

मीच सुरवात केली मग....
“डॉक्टर लोकांची दुनिया खूप वेगळी असते म्हणे, पण तुझी दुनिया मात्र आम्हा लोकांसारखीच.. मला मध्येच अडवत तो म्हटला,
“डॉक्टर लोकांची दुनिया आपल्यासारखी नसेलही पण आपल्यासाठीच असते ना... अन हो मी काही डॉक्टर नाहीये, मी PhD करतोय Nephrology मध्ये, लहान मुलांच्या किडनीत होणार्या रोगांबद्दल... किंबहुना किडनीविषयी म्हणू शकतेस कारण ही जी conference आपण जाणार आहोत तिथे माझं काम जरा मोठ होतंय हे सिध्द होतंय, तरीही डॉक्टरेट असतं ते डॉक्टर नव्हे...”
हे तसं मला माहित होतं पण कधी लक्षातच नाही रहायचं... किव्हा कधी कधी मुद्दाम विसरायचे...

खिडकीतून येणारी थंड गार हवा सगळेच सूर बदलत होती... जुहु beach  वर उतरलो... का माहित नाही, त्याने काही म्हटलं नाही अन् मला तर नाही ऐकायचंच नव्हत...
taxi तून उतरल्यावर मी मुद्दामच त्याला चालताना धक्का दिला; आधी त्याला समजलेच नाही, मी दुसर्यांदाही तसेच केले... तो मुद्दाम मागे थांबला मला पुढे जाऊन दिले ... मागे बघतच त्याचा रागच चेहरा बघून मी घाबरून गेले... म्हटलं राग आला की काय??? हळुचकन तो पुढे आला अन डोक्यात टपली मारून  ए मंद चल आता उशीर होईल” बोलला, मला धक्का  देऊन पुढे निघून गेला... मीही माज्या डोक्याला हात लावला... हसत हसत त्याच्या बरोबर चालू लागली...

संध्याकाळचा तोः मावळता सुर्य पाहत मी म्हटल... “किती सुंदर आहे न रे...कोणाचे हि भान हरपनारे... आपल्यात सामावून घेणारे...”
“हो न... मला देखील तू तशीच वाटतेस... भान हर्पव्णारी... तुझ्या dp च्या फुलाप्रमाणे आहेस अगदी... सुंदर... नाजूक... अगदी फुलासारखी...कोणालाही एकाक्षणात पसंत येणारी...”
मला खरं तर आवडत होत त्याने माझ कौतुक कारण... पण उगाच मी त्याला म्हंटल... “पुरे रे आता...”
... पण हा... तू एकदा भांडायला लागलीस न... कि राक्षस वाटतेस अगदी... शूर्पणखा आठवते...
माझी चेष्टा करत तो म्हणाला... आणि माझ लाजन... सगळ मातीत मिळवल नालायाकाने...
मग मी हि म्हणाले... “तू हि रुसतोस न... तेह्वा... अगदी पंकज उदास वाटतोस... भाव खाऊ कुठचा... तू हि काही फार मोठा हुशार नाहीयेस हां... भांडता हि येत नाही तुला... फट्टू कुठचा...”

“बघ बघ वाटतेस न राक्षस... खर संग... तो अजून खेचत होता... मंद कुठचा...

“चल आपण पाणी पुरी खाऊया...” मी फर्मान सोडलं...
त्याने पहिलीच तिखट पाणी पुरी खाल्ली... अन
 मग काय?  जोरात ठसका आणि डोळ्यातून पाण्याची धार... मला जोरात हसू आले मी हसतात हसतात त्याची पाठ चोळू लागली  पण तेव्हा खर तर माज्या हि तोंडचे पाणी पळाले होते ... मी त्याला वर चिमणी कावळा दाखून ठसका कमी करू लागले... सगळे निट झाल्यावर कोपर्यात काकूच्या छोट्या मुलाला ठसका लागला... जाताना आम्ही दोघे  एकदम जोऱ्यात हसायला लागलो कि त्यांनी रागातच आमच्यावर कटाक्ष टाकला... आम्ही गुपचूप पळ काढला...
तेवड्यात तो बोलला “चल फुगे घेऊ या”... “
wow... मी खुश होणार तेवढ्यात... पण ते घेऊन फोडायचे...”
“काय?
??  
फुगे घेऊन फोडायचे...” त्याने सगळे फुगे घेतले फुग्यावाल्याकडून... अन आसपासचे छोट्या मुलांना घेऊन एक एक दिला... 
सगळ्यांना circle मध्ये उभे केले... आधीच सगळ्यांना instruction  दिल्या होत्या... सगळ्यांनी एकाच वेळी फुगे फोडले व नाचू लागली... its stupid  but  really  funny ... बाकी उरलेले आकाशात सोडून दिले... 

“ए मंद... सूर्याच्या समोर उभी राहा न... तो अचानक म्हणाला...”
“का रे...”
“प्रश्न खूप विचारतेस....सांगतो तस कर निदान आज तरी...
“आज तरी???? किती रे हलकट हा...” मी म्हटल... नेहमीच तर त्याच्या मन सारखा होत असत...
मी जाऊन उभे राहिले... अन त्याने पटकन त्याचा cybershot काढला... आणि मी काही बोलेन इतक्यात माझा फोटो click केला....
“सूर्यापेक्षा हि किती सुंदर दिसतेस ग... तुझे हे उडणारे केस, गोंधळलेली नझर, काहीतरी बोलणारे ते ओठ...  कपाळावरची ती रेष... तू शांत असूनही तुझ्याबद्दल सांगणारे तुझे मन ह्या फोटो मध्ये झळकतेय... तू न... शब्दच नाहीत... म्हटल मुंबई मध्ये खूप बघण्यासारख आहे... तर कॅमेरा घेऊया... पण सगळ्यात सुंदर तर वाटतेस ग मला...”
“अरे वाह... साहेबांनाही कोणाचीतरी प्रशौंसा करता येते म्हटल...” मी त्याला चिडवत म्हटले... खर तर मला काही सुचत नव्हता हे जाणवून नव्हत द्यायचं मला...
“तू खरच अशी आहेस... का माझी photography चांगली आहे ग???”
“नालायक...” मी त्याला लाडिकपने मारत म्हाणाले... “दे तो camera इकडे”...
बसलेल्या
couples  चे फोटो काढले... एकाचा तर गालावर किस करतांना चोरून फोटो काढला...
आणि पटकन कॅमेरा त्याच्या हातात दिला...
म्हटल... “चल आता taxi च मीटर वाढत आहे... निघूया नाहीतर दुसरी कडे नाही जाता येणार...”
“हो न... पण तू देणार आहेस न पैसे... मग चालेल मला मीटर वाढलेला...” तो म्हणाला...

पण मला नाही चालणार मुर्ख... आणि मी त्याचा हात खेचत घेऊन गेले...
taxi भरधाव निघाली... अन् अचानक समोरून एक भली मोठ्ठी ट्रक आली अन्..............
 

SDC

3 comments:

Hema said...

a..Mumbai madhe accident nahi karaycha bar ka...ata tr bhetalet te..

anaconda said...

:)

Hemant said...

Bhai.... Its been more than 10 days now. Lavakar next Part Release kar...... ??? :)

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)