Sunday, March 24, 2013

फक्त तुझ्यासाठी... भाग २८




अन् अचानक समोरून एक भली मोठ्ठी ट्रक आली अन्... आता काय सांगू कसं वाटलं???
घाबरले दचकले, तितक्यातच त्याने शांत केलं...
म्हणाला “ओये मंद... घाबरू नकोस... भारतात आहोत आपण, इथ अशीच कट मारायची  पद्धत आहे इथ... इतकं घाबराय्सार्ख काय झालं???”
“काही नाही रे... इतक्या प्रयत्नांनतर आयुष्य आवडत आहे, त्यामुळे जरा.......”
अन् त्याने अचानक माझ्या खांद्यावर हात ठेवला... मनात विचार केला होता खूप वेळेस, वोईलीन वाजेल, चंद्र खाली येईल जमिनीवर वैगरे वैगरे... पण हे तर अगदी ताईने वाईट स्वप्नानंतर गळे लगाव तस वाटलं... शांत विश्वासू...

अन् मी बोलू लागले...

शब्दात नाही मांडता येत
पण खर सांगते स्वतःवर खूप प्रेम करते आता...
एक हक्काचं नात जगत आहे तुझ्यासोबत...
तुझ्या येण्याने मे फुले राहीन तुज्यासोबत प्रत्येक क्षणी...
आता तुझं अन् माझं एकटा जगन मला मान्य नाही...
फक्त तुझ्यासाठी...

“ए मंद, खूप छान बोलतेस ग तू... आवाज पण खूप छान, तस पण मी सांगितलच होत तुला फोनवर... पण भीती वाटते, तु हरवण्याची...” तो अगदी डोळ्यात डोळे टाकून बोलत होता...
“तू फार कमी बोलतोस रे...”
“अस का??? कळेलच तुला... पूर्ण जगात तूच आहेस ज्याच्याशी मी इतकं सहजतेने वागू शकतो...”
“का??? विचारू शकते का???”
“हो विचार ना

“मग सांग ना...”
“तुला माहित आहे का तुझ्या अन् माझ्या नात्यात सगळ्यात ताकदवर अस काय आहे???  आपल्या नात्यात किंबहुना तुझ्या सगळ्यात सुंदर आहे ते म्हणजे ती सहजता जी तू आपल्या नात्यात किव्वा माझ्यात आणली आहेस... या सहजतेमधुनच सुरक्षा निर्माण होते... मला लहानपणापासून हवं होत तर ते म्हणजे ही सुरक्षा अगदी बाबा गेले तेव्हा पासून...”
“अरे पण मी तुला बदलवत तर नाही आहे ना??? मी तुझ्यावर दडपण तर नाही ना???”
“अग वेडाबाई, तू तर साय आहे आपल्या नात्यावर किव्वा माझ्यावर... साय तर दुधातूनच तयार होते अन् छत धरते... साय म्हणजे गुलामी नव्हे, सायीखाली दुध दडपणात नसत... तसच काहीसं तुझं पण आहे
          छान वाटलं खूप... एक तर खूप छान बोलला म्हणून, दुसर तर मला साय म्हणाला म्हणून... सुंदर तर मी आहेच पण साय... याने तर ६ मारला यार... आता मी काय बोलणार होते कपाळ???
तस विचार करून आलेली काय बोलू काय विचारू, काय सांगू... पण एक तर विमानात शेजारी येऊन बसला, अन् आत्ता कित्ती सोप्प्या भाषेत किती खोल भावना सांगून गेला...
“काय विचार करतेस ग??? बोल ना काहीतरी??? नाहीतर एक काम कर काहीतरी मग किव्वा इच्छा व्यक्त कर... करतो पूर्ण... विचार करून बोल...” झालं... हा तर शेवटचा प्रश्न होता ज्यासाठी मी तयार होते... अगदी हात हलायला लागले इतक्या जोरात हृदय धकधक करत होतं...
“अरे काय बोलू सुचत नाहिये, खरच नाही, असाच शांत बसावं अस वाटत आहे...” अंगावर आलं अन् शिंगावर घेतलं अस वाटलं मला... आता काय हुशारच आहे मी लहानपणा पासून...  स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी अस वाटत होत मला...
“ठीक आहे, करतो तुझी इच्छा पूर्ण, नाही बोलायचं आपण जास्त, फक्त एकमेकांची सोबत
enjoy करू...no talking unless it’s urgent... and m not asking but telling...”
omgggg आता काय करू???
हे तर फिल्मी situation झाली..जिथे प्रेयसी अन तिचा प्रियकर मुक्त शब्द बोलत असतात..म्हटल वाह! हे हि अनुभवायचं राहील होत तर... वेगळाच अनुभव आहे पण हा...!!!!
शांत राहण हा स्वभाव नाही हे माहितीये त्याला पण तरीही त्याने म्हटल म्हणजे नक्कीच काहीतरी त्यात मज्जा असावी... म्हणून मी मान्य केल...
शहाणी मुलगी”, तो म्हणाला... जणू माझा चेहरा पाहून त्याने माझ मन ओळखल होतं...
म्हटलं पाहूया ह्या गर्दीत... गोंधळात त्याला माझे शब्द अन्
  मला त्याचे ऐकू येतात का???
सध्या काहीतरी विचित्र सुरू आहे... नक्की काय माहीत नाही, पण धरवत नाही आणि सोडवत सुद्धा नाही असे काहीतरी आहे... खूप शोधले चाचपडत राहीले शांततेत  बराच वेळ काहीतरी हाती लागेल ह्या आशेने पण काहीच हाती लागले नाही...

तो हि शांत मी हि शांत... सुर्य आता मावळतीला आला... हातातला पेन काहीश्या काळोखाच्या  गडद शाइत बुडवून मी काहीतरी खरडत चाललीये कागदावर...


वातावरण काहीस बदल अन आभाळ आल... मी त्याच्याकडे पाहिलं अन् माझा आनंद त्याला जाणवला हे त्याच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आल... मुंबई सारख्या शहरात इंद्रधनुष्य दिसल... पाउस  सुरु झाला... हिवाळ्यात पाऊस??? पण न् बोलताच हा वेगळाच प्रकार अनुभवत होते... तसाही मुंबईच्या पावसाचा भरवसा कुणी द्यावा??? अगदी हम तुम पिक्चर आठवला, जास् ते भेटल्यावर काहीसं गडबड वा काही निराळ होत तशातल काही... तोंडापर्यंत आलं पण बोलायचं नव्हत ना... मग काय बाहेर बघत बसले पण तोही तितक्याच मग्नतेने पाहत होता जणू त्याला कळल मला काय बोलायचं आहे ते आणि तो लडकी क्युन वाली शिटी वाजवू लागला...
काय सांगू, बोलण्यात जी मजा नाही ती त्या भावनेत होती...
 आमची मैत्री एकमेकांना आज छान उब देत होती...

आता तर काय... माझ्या मनातल्या विचारांना मात्र समुद्रासारखीच भारती आली आहे... काय करणार माझ्या चंद्राचे आकर्षण आहेच काहीतरी खास... त्या अंधारात तो बाहेर काहीतरी शोधत होता...
चंद्र शोधत होता हे नंतर लक्षात आले... मनात म्हटल... चंद्र कसा दिसेल आज... तो तर माझ्याबाजूला बसला आहे न... तरीही मंद...  झाडांच्या नक्षितून सांडणार्‍या त्या प्रकाशात  नजर रुतवुन चंद्र शोधते होता...
मंद स्वतःला शोधत अस्वस्थ होत होता...

आई शपत... आज तर मला किती गाणी सुचत होती... त्याच्या प्रत्येक हावभावावर ... त्यातच taxi वाल्याने
‘खोया खोया चंद..खुला अस्मा...” हे गाणं लावल होत...

आणि मी तेह गुणगुणू लागले... तेवढ्यात त्याने माझ्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहिलं, तोच गाणं लगेच बद्दल... आता काय तर...
‘ऐसे तो ना देखो के हमको नशा हो जाए
खुबसुरत सी कोई हमसे खता हो जाए
ऐसे तो न देखो तुम....!!!!’  म्हटल काय चालू आहे... ड्रायवर नकळत जणू माझ्या मनासोबत गाण्याच्या भेंड्या खेळत होता...

त्याच्या बहुतेक हेह सारे लक्षात आले अन तोः मिश्किल हसायला लागला... काय सांगू... आता तर स्वतःची जीबच चावली... म्हटल हा ऐकतो कि काय मला... पण फार चान  वाटत होत ..कोणीतरी मला माझ्याच नकळत ऐकत होत...मानाने माझ्या जवळ येत होत... बोलून तर सगळ्यांनाच समजत...पण न बोलून जी एकमेकांजवळ येण्याची मज्जा आहे..ती काही निराळीच...
त्या क्षणाला मला माझ खूप आवडत गाणं सुचल...


धुंद होते शब्द सारे...
धुंद होत्या भावना...
वार्यासंगे वाहता... त्या फुलापाशी थांब न...

सये... रमूनी सार्‍या या जगात
रिक्त व्हावेसे परी
कैसे गुंफू गीत हे ?
धुंद होते शब्द सारे....

गातेस हि चान ग...ऐकव न पुडे ..तो खूप आवडी ने म्हणाला....

मेघ दाटूनी गंध लहरूनी
बरसला मल्हार हा
चांद राती भाव गुंतुनी
बहरला निशीगंध हा
का कळॆना काय झाले
भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा
विश्रांत हा
शांत हा

धुंद होते शब्द सारे
धुंद होते भाव सारे

पण या वेळेस ड्रायवरने गान लावलंच नाही मी मलाच न् कळत गाऊ लागली होती...
“मस्तच... तुला माहितीये मंद... तू part time काम करू शकतेस गाण्याच...”
आता हे serious कॉम्प्लेमेंत होत का माझी उडवली हे लक्षात नाही आल... पण त्याने आवर्जून माझ गाणं ऐकल...ह्यातच मला सगळ काही मिळाला...
ह्या अश्या मस्तीत मुंबई सोडून आम्ही पुण्यात कधी आलो समजलाच नाही...
त्याच्या चेहर्यावरची खुशी मात्र मला खात्री करून देत होती... कि conference आता फार दूर नाही... आणि पुढे काय होईल ह्याची खूप खूप जास्त उत्सुकता... त्याचाहून हि जास्त मला... असणारच न... एक तर त्याचा पहिला गौरव... अन त्यात तो मला व्यासपीठावर घेऊन जाणार... पूर्ण रस्ता हाच विचार करत होते... अन... पोहोचलो यशदामध्ये... जिथे आमची थांबायची व्यवस्था होती...

फक्त तुझ्यासाठी... भाग २९ 
 

SDC

Get Your Own Free Hypster.com Playlist.

2 comments:

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said...

धुंद होतात शब्द सारे …… धुंद होतात भावना …….
डोळे मिटुनी ……. तुझ्याच पाशी थांबणा ……

गीत होतात मल्हार ते ……
जेव्हा साद घालती चांदणे ……
वार्या संगे सडा शिंपडी दारा निशिगंध तो……

तूच गीताचे शब्द माझ्या …… तूच गीताची पंक्ती……
भास आभास करून देतील …….तुझे आठवणीतील क्षण ते ……

धुंद होतात शब्द सारे …… धुंद होतात भवना ……

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)