Saturday, January 5, 2013

फक्त तुझ्यासाठी... भाग २६




त्याने हेड फोनेस काढले तरी मी अचंबित अश्या नझरेने त्याच्याकडे बघत होती....जणू अजूनही काहीच उमजत नव्हतं... त्याला हे जाणवल... अन...
दोन सेकंद तो माझ्याकडे आश्चर्याने बघत बसला....अगदी गोंधळ्या सारखा....."मी हिला ओळखतो का????" अस ghajni सारखा जणू त्याला वाटत असाव...

विचार
करायच्या तर काही परिस्थिथित नव्हतेच मी... आश्चर्य अन् गोंधळ अस काहीस होत माझं... दीर्घ श्वास घेतला... म्हटलं... आपणच बोलूया...
चेहरा तर नाही पण निदान अवज तरी ओळखेल...अस म्हटल अन मी बोलायला सुरवात केली....
“हेय हाय....ओळखलस???”, आता मनात आलं कधी याने नाही म्हटलं तर मग काय???
आणि हो मीही चूक करू शकते, फोटोच तर पहिला आहे... असो जे होईल ते... तासही बोर होत होतं बसल्या बसल्या... 
इतक्यात.....
मंद तू..................................”, तो जोरात बोलला, बोलला काय ओरडलाच...
जणू अचानक निकाल लागावा अन् आपण पास व्हावं अश्यातला काहीसा वागत होता तो...
आणि मग काय अनपेक्षित असा सुरु झाला प्रश्नांचा
भडीमार...
“तू इथे कशी... म्हणजे... ह्या plane मध्ये??? मला वाटल थेट येशील... किती छान योगायोग आहे यार... योगायोगच ना??? का तू घडवून आणलं???
तुला कसं माहित मी ह्याच विमानात आहे??? त्यातही तुला विमानाचे वेळा कश्या माहित ग....
??? मलातर अगदीच हसू आलं... खर सांगायला झालं तर माझीही हीच परिस्तिती मनात १००० प्रश्न न् त्याहून जास्त आश्यर्य अन् त्याहून जास्त आनंद होता... एवढंच त्याने ते बोलून दाखवलं मी नाही...
“आणि नेमकी हीच जागा... कशी काय??? तिकीट बुकिंग ऑफिस मध्ये ओळखी वैगैरे आहेत कि काय ग???
आणि इतक्या वेळ मी हेडफोन घालून बसलो होतो तर सांगितलास का नाही...???
तुला माहित होता मी ह्याच विमानाने येणार??? बोलना... बघातीयेस काय अशी एकटक लावून माझ्याकडे... बोल न काहीतरी...”

मी साहजिकच त्याच्याकडे गुंग होऊन बघत बसले... म्हटल हाच तो??? जो नेहमी गप्पा बसून माझ ऐकत असतो ...
इतका बोलतो??? नवीनच जाणवल....
पान का कुणास ठाऊक मला बोलताच येत नव्हत... तितक्यात तो पुन्हा म्हणाला...
“हा.... आत्ता समजलो, मी स्वप्न पाहत आहे... किती मुर्ख आहे मी... स्वप्नंच हे...”
तो असकाही बोलला की हसूच आलं मला, पण काहीस खर वाटली, मीही स्वप्नंच पाहत आहे वाटत... अन् मग सगळ्या गोष्टींची घडी बसली... स्वप्न असेल तरच सगळ खर असेल... हहहहश्श्श्श्श्श्श......
तितक्यात, एक हवाई सुंदरी आली (
Air Hostess), म्हणाली, “मलाही खूप आवडलं असत की हे स्वप्न असत, अन् विमानात कुणी इतक्या जोरात ओरडलं नसत, पण sir, madam हे स्वप्न नाही, आणि हो तुम्ही या विमानात एकटे नाहीत... J ति गोष्ट वेगळी आहे की मराठी नाही समाजात सगळ्यांना पण तरीही...” इतकं बोलली अन् जाऊ लागली... जातांना मागे फिरली अन् म्हणाली, “आणि हो madam मला तुमची style आवडली बरका...”  
तो पुन्हा काहीतरी बोलणार होता, आता काहीतरी म्हणजे काय ते मला माहित होत,
त्याने हात पुढे केला अन् माझ्या चेहऱ्यावर आणला... केसांना हात लावत हळू हळू त्याने हात जरा खाली आणला, अन् अचानक
नाक ताणलं माझं... जरा दुखलं पण हसू आलं... अस का केलं असाव बर???
“आहा, म्हणजे तू खरच आहेस आणि हे स्वप्न नाही तर...” त्याचं ते बोलन अन्  त्याहून त्याचा तो आहा... त्यामुळे मीही बोलन सुरु केलं...
“अरे हो श्वास तर घे... इतके प्रश्न... दम नाही का लागत तुला???
बोलू देशील तर बोलेन न मी...
मीच तुला ह्या विमानात पाहून खरा आश्चर्यचकित झाले... किती बोलतो तू???
चाट तर नाही करत इतकी??? आणि ही माझं कुणी काही ओळखीच नाही कुठ...
विमानाचे बुकिंगस मी नाही माझ्या मित्राने केले रे... माझा कॉलेजचा मित्र... म्हणजे तसे आम्ही खूप भांडतो... मी त्याला
भरपूर शिव्या नाही का घालत तो... तिकीट पण मी काही सांगीन त्या आधीच त्याने तयार केले होते...”
तोहि नेहमी सारखा मी बोलेन ते ऐकून घेत होता... त्याला म्हटल...
“भेटवीन एकदा तुला”...
“भेटेनच... कोण हा जो माझ्या मंदला सांभाळू शकतो... कोण हा शूर वीर...”
अस माझी चेष्टा
  करत होता... 
“कसला नालायक आहेस  रे... विसरला बहुतेक मीच सांभाळते तुला प्रत्येकवेळी... नको जास्त शहाणपणा दाखवूस... कोणत्या शर्ट वर कोणता टाय घालावा हे तर मलाच सांगाव लागत अन् ममोठा आला मला सांगणारा...”
मी हि माझ्या नेहमीच्या स्वरात त्याला उत्तर दिल....

आत्ता कस जर मनमोकळा बोलल्यासारख वाटत होत... दोघान कडून...
“बाकी अजून काय म्हणतेस ग???” आता तो कमीच बोलत होता, शांततेत नेहमी सारखा... 
“मी काय बोलू... तूच बोल... नवीनच समजल मला कि तूहि इतका बोलतोस...
काहीच बोलत नाहीस कधी..मी बोलेन तेव्द ऐकत असतोस नुसता... चाट वर इति शांत असतोस रे??? अस का???”
“अग मला तुझ्या कविता वाचायला आवडतात... आणि परत तुला कोणीतरी हक्काचा श्रोता हवा न... कोणीच न ऐकून कसा चालेल... खर सांगू तर मला खूप आवडत तू बोलते ते ऐकायला... अगदी agadi non-stop recording...”
आज का कुणास ठाऊक पण त्याच्या चेष्टा कारण हि मला गोड लागत होत... नाही तर त्या जागी महेश असता तर दोन शिव्या देऊन मोकळे मोकळे झाले असते कधीच...
पण तो हि मज्जा म्हणून बोलत होता... हे जाणवल मला...
“तू हि काही कमी नाहीयेस... मुलीन न घाबरतोस... म्हणूनच मी वगळता तुझी खास अशी कोणी मैत्रीण नाही... आणि असेल तरी कोण...??? इतका मौन कोण मुलगी माझ्या शिवाय सहन करणार आहे... उगाच मी आहे म्हणून सगळ ठीक  आहे... किती रे मित्र आहेत तुला...”
“मित्र तर खप आहेत ग खूप... हवं तिथ सगळेच आहेत, अगदी
taxi चालवणारे आहेत काही तर काही थेट अंतराळवीर (astronaut) आहेत...” उत्तर तर दिल त्याने, पण ऐकुण थोडीच घेणार होती मी???
“हे सारे मित्र लहानपणाचे असतील ना??? नवीन बनवलेस इतक्यात???”
“मग बनवलेत की... आरती नाही का आठवत तुला???
Conference साठी आलेली???”
“अरे हो तुझी सुंदर परी ना???”

“हो तीच... ति अन् तिचा होणारा तो, दोन्ही चांगलेच मित्र झालेत माझे... तो तर तिच्याहून जास्त... खूप विचारतो माझ्याविषयी... आणि हो, मला तर हे तिकीट पण त्यांनीच पाठवलं आहे...” इतकं बोलला अन् थांबला...
“ओये तुझं तिकीट काढालं त्या मित्राचं नाव काय ग??? महेश का???” त्याने अगदी शांतपणे विंचरल... अन् मी काही उत्तर देणार त्याच्या आधीच महेश, आरती, तिकीट सार गणित समजलं मला, अन् हेच शेवटचं प्लेन कसं हेही कळलं... मनात आला...  surprise पण त्यानेच प्लान केलेलं असाव... कारण असे कारनामे करण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नाही...
म्हटलं हो, “महेशच...” पुढ न् मी काही बोललो अन् न तो... पण लक्षात आलं काय झालं आहे ते... तस जरा विचित्रच पण पचलं...
 
फक्त तुझ्यासाठी... भाग २७
SDC

3 comments:

Anonymous said...

गुलाबाचे फुल होऊनी राहावे
भ्रमर होऊनी तू सोबतीस राहावे
पकलीन पाकळी मह्कून फुलावे
न बोलतच साथ द्यावी
एका अनामिक नात्याला अलगद विरघळून जावे .......

Unknown said...


गुलाबाचे फुल होऊन तुझ्या सोबत हसावं,
पाकळी-पाकळी महकुन खुप फुलावं,
नजरेत तुझ्या सुख वाटून घ्यावं,
एका अनामिक नात्यात अलगद विरगळुन जावं...!!!

anaconda said...

दोन्ही कविता खूप खूप छान आहेत...

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)