Thursday, October 18, 2012

फक्त तुझ्यासाठी... भाग २४



फक्त तुझ्यासाठी... भाग २४

महेशशी बोल्यावर मन जरा हलकं झालं... ते म्हणतात नं... fight between mind and heart... ह्याचा योग्य तो निकाल महेश ने लावला...
एक वेगळीच स्फूर्ती आल्यासारखी वाटते...
मी स्वतःला बदल्यासारखी जाणवते... खूप आनंदात आहे आज...
आज इतकी खुश होते कि.... माझ्या भावना मांडत होते... कधी मी माझ्या मनाला तर कधी माझं मन मला सावरत होते...
नाही नाही म्हणत....finally मी माझ्या निरागस चान्द्रमाला... माझ्या खास मित्राला... भेटणार... आज मन थार्यावर नाही... नकळत माझ्या ओठांवर हास्य आहे... आरशात थोडी लाजत बघतीये... नुसता इथल्या इथे जायचं तरी शंभर कपडे शोधतीय... चालायला लागले तर रस्ता विसारतीये.....एक काम निट नाही करतीये... तरी आनंदात आहे...
मन लहान मुलासारखा बागडताय... खूप चल बिचल होतंय... आज खूप खूप खुश आहे...
आज जणू स्वतःच्या प्रेमात पडलीये... तुला भेटायचा म्हणून वरून खालून निरखत आहे... तुला काय आवडेल ह्याचा विचार करतीये....तू काय घालशील ह्याचा विचार करतीये... चेहऱ्यावरच्या हावभावंकडे जरा जास्तच लक्ष देतीये...
तू काय बोलशील... कसा वागशील... मी कशी वागेन... तुला खायला काय आवडेल... वैगरे वैगरे... जणू मी माझ्या खास मित्राला नाही... पण crush ला भेटायला चाललीये अस वाटत आहे... मी इतका आज असेल नसेल तितका विचार करतीये...
बाहेर धो धो पाऊस कोसळत आहे...आणि मी स्वताच न ऐकता... माझ्या मनच ऐकत pausat भिजायला गेले...

कोसळणारा पाऊस आज वेगळाच शहारा देऊन जातोय...
बहुदा तुलाच भेटण्याचा इशारा देऊन जातोय....
येणारी प्रत्येक संर तुझी आठवण देऊन जाते...
वीज कडकडते अन मी घट्ट डोळे बंद करते...
तू माझा हात पकडून...मला शांत करत असल्याच..भास मग करते...
तू सोबत नसूनही मग...
तुझ्या आठवणीमध्ये... तुझ्यासोबत मला चिंब भिजवून जाते...!!!!

आज वर किती तरी क्षण तुझ्यासोबत virtually share केले...
पण आत्ता प्रत्येक्षात काही अविस्मारीया अश्या क्षन्नन न जगायचं आहे...फक्त तुझ्यासोबत...

त्याला होकार कळवायचा म्हणून फोन घेतला...
शंबर वेळा तरी नो. dial करून cut केला असेल... इतकी का आतुर आहे मी...??? असा विचार मनात सतत आला...
शेवटी ठरवल...म्हटल जे होईल ते बघू आणि फोन लावला....
तो फोन उचले पर्यंत जीव नुसता वर खाली वर खाली होत होता....my heart was beating so fast that anyone could hear ....
त्याच "आह्हा " ऐकल अन जणू हृदयाचे थोकेच बंद पडले...
“आहा... तुझ्याच फोनची वाट बघत होतो... कशी आहेस ग मंद???”, कसं कळत त्याला काय अन् कासव बोलावं ते??? थैमान घालणाऱ्या मनाला कसं शांत कराव ते???
“माझ्या फोन ची वाट बघत होतास... अअअ... मग केला असतास एक फोन रे... चांगला डॉक्टर आहेस... पण फोन करायला मात्र होत नाही... अअअअ... outgoing बंद आहे का???” मी उगाचंच ताफरायचं म्हणून बोलले... का कुणास ठाऊक पण बोलता जमत नव्हत मला... पण तरीही शक्य तितकं normal बोलायचा प्रयत्न करत होते मी...
“आहा... ए मंद तू आहेस मी नाही... नसेल बोलायचं तर ठीक आहे, मी online ये आपण chat करुया... लवकरर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ” इतकं बोलून त्याने फोन ठेवला... माहित नाही का पण मी सुटकेचा निश्वास टाकला...
काय मंद...कशी आहेस???” त्याचं नेमकं हवहवस ओळखीच वाक्य टाकलं... अन् मी माझ्यात आले...
“फोनवर शांत का होतीस??? बोलत का नव्हतीस???...
“नाही नाही..मी चाचपडत म्हटलं....अरे तुझा आवाज नीट नव्हत येत...
तू काय अमिताभ बचन आहेस का....तुझा आवाज ऐकून मी शांत पडायला...” मी बचावात्मक पवित्र घेतला...
“नाही ग....मी तर त्याहून हि खास...
बर सांग न... येत आहेस न...??? ते असू दे पहिले शांत हो अन् छानसं काहीतरी लिह बर... हव तर माझी मागणी समज... पण मन शांत कर... आणि मलाही शांत कर...” का कुणास ठाऊक त्याला सगळ माहित होत मला कसं सांभाळायचं... कसं शांत करायचं...
“अरे पण कशाविषयी लिहू??? विषय तर सांग... अन् हो अस अचानक लिह्तेय म्हणून कशी वाटली हे मी विचारणार आन्ही अन् तू सांगायचं नाही... चालेल???”
“नक्की... जशी आपली आज्ञा राणी साहेब
J ... अन् विषय तू अन् मी...” आता याला काय सांगू हा विषय तर अनंत आहे ... काय अन् किती लिहू??? कुठून सुरु करू??? मग काय लक्षात आलं, त्याच्या साठी लिह्तेय... अन् हात अचानक आपोआप सुरु झाले...

“कळत नकळत व्यक्ती भेटत असतात...
ओळखी पासून सुरवात करत... मैत्री करत असतात...
हझारोंनी प्रश्न असतात एकमेकांबद्दल मनात...
पण विचारू कसं? हेच नाही येत ध्यानात...
नकळतच मन त्या व्यक्तीशी जुळत जाते...
त्या एका आठवणीच्या सहवासात मग सौख्य लाभत जाते...!!!

कहाणी  आपली निराळी... थोडी कठीणच सत्यवत वाटण्यासाठी...
पण तुझा" निरागस चंद्रमा " आहेना... ह्या गोष्टीची साक्ष देण्यासाठी...
ओळख  झाली "hi hello " talks पासून...
ती मैत्रीत बद्दली  अधिकाधिक chats पासून...
कामात  सतत स्वतः ला गुंतवणारी मी...
न थांबवू शकले स्वतःला तुझ्यात गुंतण्यापासून...

स्वतः पासून दूर होत... फक्त तुझी होत गेले...
मी सतत बोलत राहिले...
आणि तू एका शाहण्या मित्रा सारखा ऐकत राहिलास...
भांडलो ... वाद विवाद झाले...
कधी रागावले... कधी हिरमुसले... पण...
कधी तू... तर कधी मीच स्वतः ला समजावले...
तू केलेले emails मी सतत वाचते...
तू online येण्याची अगदी आतुरतेने नेहमीच वाट पाहते...

हा प्रवास आपल्या मैत्रीचा...
जणू  कोसळणाऱ्या पावसाच्या  सरींचा...
जशी पावसाची सर अलगद येऊन जाते...
जमिनीला स्वतःला जमिनीत सामावण्यासाठी...

तशीच तुझी माझी मैत्री अलगद खुलत जाते...
माझ्यातल्या “मि”ला “आपल्यात” मिसळण्यासाठी...


आपली मैत्री जणू एक प्रवास...
अनोळखी... पण हवा हवासा वाटणारा  सहवास...
कहाणी... न बोलताहि बरच काही सांगणारी...
अन स्पर्श हि न करता मनाला भिडणारी...!!!!!!!!!!!!!!


हो....येत आहे तुला भेटायला...त्या क्षणी तुझ्यासोबत असायला...
तू stage वर जाशील तेह्वा सर्वात जोरात टाळ्या वाजवायला ... किव्हा जमलचं तर शिट्टी वाजवायला...
तुला आनंदात पाहायला... तुझ्या आनंदात सहभागी व्हायला... तुझ्यासोबत काही अविस्मरणीय अश्या क्षणांना जगायला...” मी मनात असलेलं सगळ बोलून गेले... सगळ...
“खरच...मला माहित होता तू नक्की येशील...शेवटी तू माझी मंद आहेस न...
माझ्यासोबत stage वर येशील...??? तुझी MY INSPIRATION ...अशी ओळख करून दिली तर चालेल न...”
हे काय विचारून बसला हा वेडा???

“हक्काने ने नेशील... तर माझी मंद अस म्हटलास तरी चालेल...
conference
नंतर काय मग????
“अग तुझ्यासोबत वेळ घालवायच हे मुख्य कारण... conference तर कारण आहे... त्यामुळे वेळ कसा जाईल तुझ्यासोबत मला नाही कळणार... अन तुला हि नाही कळू देणार...”
“म्हणजे नक्की काय करणार???? ...
तुझा हात पकडून किनार्यावर फिरायला घेऊन जाईन...
तुझ्या खांद्यावर हात ठेऊन तुझ्यासोबत फोटो काढीन....
तुला घट्ट मैत्रीची मिठी मारीन... नारळ पाणी घेऊ...
आणि हो तुला chat आवडते न ....ती हि खाऊ......
मावळत्या सूर्य समोर तुझा तेज अधिक वाढत असल्याच जवळून पाहायला.....तुला तुझ्या मैत्रीला...तुझा सहवास..अनुभावीन...
अजून बराच काही...पण सगळा सांगितला तर... तू सवाद होशील न....
पण एक नक्की....अविस्मरणीय अस वेळ आपण एकत्र घालवू...”
मी तर डोळे विस्परून पाहताच राहिले... इतका विचार??? इतक्या गोष्टी???
कसं जमल त्याला??? असा विचार कित्ती केला असेल त्याने???
“डॉक्टर नाही इंजिनियर शोभला असतास तू... कुठून आला डॉक्टरी पेशात कुणास ठाऊक???” मी खरच अचंबित होते अजूनही...
“अ मंद किती वेळा सांगू मी नाही डॉक्टर... मी शोध करतो फक्त... हो पदवी आहे मला पण तो वाला डॉक्टर नाही मी... ” तो जणू स्वतःला व्यक्त करत होता...
 आता मी काहीतरी बोलन आवश्यक होत... विषय संभाळण महत्वाच होत...
“बापरे किती plans आहेत रे तुझे....आतुर आहे मी ह्यांना जगायला..मज्जा करायला तुझ्यासोबत...”

SDC

2 comments:

Hema said...

Simpy awesome!!!
कोसळणारा पाऊस आज वेगळाच शहारा देऊन जातोय...
बहुदा तुलाच भेटण्याचा इशारा देऊन जातोय....
येणारी प्रत्येक संर तुझी आठवण देऊन जाते...
वीज कडकडते अन मी घट्ट डोळे बंद करते...
तू माझा हात पकडून...मला शांत करत असल्याच..भास मग करते...
तू सोबत नसूनही मग...
तुझ्या आठवणीमध्ये... तुझ्यासोबत मला चिंब भिजवून जाते...!!!!

Kadhi bhetnar ahet te...Bhetaw lawkar!!
I,m loving it!!

Hemant said...

Hey Dude... M egarly waiting for the next part. Kahani full form madhe aahe boss.... Hats off to you..... Really Great..... :)

Pudhacha bhag lavkar release kar..... I hope we all are waiting for it.... :)

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)