Friday, August 3, 2012

फक्त तुझ्यासाठी... भाग २२


{तो... त्याच्या मनाचे भाव लिहत होता... जिवलग अश्या डायरीत जणू मन मोकळ करत होता... अन्.....

 आज प्रथमच हि आनंदाची बातमी आई वडीलांना न सांगता... तिला सांगितली... (मी अस का केल... विचारच करत बसलो...)

जीव तिच्यात गुंतत जात आहे...
माझी थट्टा करत तो तिच्यात समावत आहे...
सांग ना... कोण आहेस तू? मला इतकं वेड लावणारी....
साध्या सुध्या  माणसाला कवी बनवणारी...!!!!!

मी चक्क चारोळ्या लिहिल्या... साध्या का होईना... पण प्रथमच....!!! मनात विचार चक्र सुरु झालं...
कोण असेल ती???  कशी वागत असेल.... मुंबईची आहे म्हणे... मग typical मुंबैया मुलगी असेल का??? का सगळ्यात राहूनही स्वतःची ओळख  जपणारी असेल... कशी आहेस यार्र्र... सर्वच जाणून घ्यायची किती इच्छा आहे मला... ‘पण विचारू कसा’ हाच प्रश्न आहे मोठा... एकदाच तिच्याशी बोललो... पण तो कर्णमधुर आवाज सारखा ऐकत राहावा अशी इच्छा होत आहे... मी विचार करतो तशीच आहे का??? आणि नसली तर????  
"कोण नसली तर"... मित्राने विचारलं... आणि मी भानावर आलो... पार्टी मध्ये आहे ह्याच भान राहिलच नाही... सतत ति सोबत असण्याचा भास... तिच्याच उत्तराची वाट... नाही म्हणाली तर???  योग्य दिसेल परत विचारणं??? का उगाच footage खायला नाही म्हणेल??? please तिला हो म्हणू देत  !!!

तुझ्या उत्तराची आतुर तेने  वाट बघत आहे......
सकाळ संध्याकाळ फक्त तोच प्रश्न डोक्यात आहे....
हो म्हणशील कि नाही....
यावर जणू माझे जगणे अवलंबून आहे....!!!!

पार्टी तर कधी संपली माहीतच नाही... घरी आलो...

विलक्षण ओढ लावली आहेस...
मनाला हूर हूर लावून...
नकळत माझ्या जीवाशी तू खेळत आहेस...
तुझं एकदाच ऐकलेलं ते निखळ हास्य...
तुझं लाझण... ते नझरेन बोलणं..
माझं रुसणं... तु मला मनवण...
मी तुझ्या नकळत तुला हळूच मिठीत घेणं...
आणि तू लाझात माझ्या नझरेत पाहणं...

तुला कळत नाहीये का... आत्ता स्वप्नातही कविता करायला लागलोय... एकदाच काय ते उत्तर दे...
पहिल्यांदाच कुठल्या मुलीशी इतका बोललो होतो... मनमोकळा, हक्क गाझवत तिला conference साठी विचारलं... खरं हक्काने यायला सांगितलं... अगदी जवळ ची मैत्रीण असल्या सारखी वागलो... (किंबहुना मैत्रिणी हून अधिक असल्य्सारखी...) खरं तर असं का बोललो मलाच माहित नाही... पण जेह काही असेल... तिची आतुरतेने वाटत बघत आहे...
का कोण जाणे पण पहिल्याच chat मध्ये आपलीशी वाटली... तिचा हेक्केखोरपणा... मनमोकळेपणा... तिचं निरागस बोलणं...
अगदी मनाला भिडली... अगदी आपली वाटली... तिच्याशी बोलत राहण्याची ओढ वाटली...
हा अनुभव फार सुंदर आहे... मनाला पंखाच नाही देत उडण्यासाठी... किंबहुना... मनाला हवेची झुळूक बनवतोय हा अनुभव... लहान मुलासारख आत्ता मन माझे बागडत आहे... आनंदाने फिरत आहे... हसत आहे... फक्त तुझ्यामुळे....

हे खरच प्रेम आहे का... का आणखी काही... माहित नाही...
मी मात्र आत्ता माझा नाही...
नाही म्हटलं तरी तुझाच विचार करतो..
पुन्हा पुन्हा  हव्याश्या  वाटणाऱ्या  त्या क्षणांत जगतो...
मन आत्ता तुझ्यात विरघळले आहे... माझे भान तू हरपले आहेस...
काहीतरी करायला हवे तुला भेटण्यासाठी... ह्या विचारात रोज रात्री जागतो मी....!!!!!!
 
अनुभवत आहे मी तुला... ‘फक्त तुझ्यासाठी’ कवितांच्या साठवणीत...
जगतोय मी तुह्या गोड - आंबट आठवणीत...
तू दिसतेस मला माझ्या येणाऱ्या भविष्यात...
तू आहेस माझ्या प्रत्येक श्वासात...
                                 
खरच किती बोलायचा आहे ग तुझ्यासोबत..तुझ्याबद्दल ....मनसोक्त..कसलेच बंधन न बाळगता...
भेटशील न ग एकदा???
इतक्या चांगल्या माणसाला कवी करून ठेवला आहेस....

बोलायला अगदी ताठ वाटतेस...
मग माझ्यासमोर इतकी का नराम्तेस..??
स्वभावाला थोडी मंद आहेस पण हा अनोळखी सहवास फार गोड आहे ...
तासंतास monitor वर तुझीच छवी  तयार करतो...
बनवतो ... खोडतो... बनवतो खोडतो...
रोज एक नवे चित्र कोरतो...
सतत माझ्या स्वप्नात येतेस...
अगदी जवळ भासतेस... पण सत्यात मात्र अगदीच दूर असतेस...
तुझं दूर असणं आत्ता माझ्या गणितात बसत नाही...

पावसाचे दिवस हे... धो धो पाऊस कोसोळ्तो... वारा हि मग सुसाट धावतो...
सरीवर सरि दाटून आल्या मझं भिजवायला...
फरक इतकाच... कि त्या पाउसाच्या नाहीत... पण आहेत तुझ्या आठवणीच्या..
                                                                   
कशीतरी मनाला गवसणी घालत असतो... पण माझ्या चारोळ्या अन कविता
  वाचून  मीच हसत असतो... खर सांगायच तर... मला "एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या मालिकेतील "कुहू" झाल्यासारखा वाटतंय ... सतत कविता करायचा जणू छंदच जडलाय मला... फक्त तुझ्यामुळे... आणि फक्त तुझ्यासाठी...

कधी भेटशील ग मला.....तुला भेटण्याची वेडी आस आहे मला...
पण भेटल्यावर... ओंजळीतील  पाण्याची गोडी तुला जाणवेल का...
माझा होत
  असलेला गोंधळ तुला उमगेल का???

मनावर विचारांचा आत्ता ताबा नाही....
माझं काय होतंय ह्याचा तुला अंदझाही नाही....
इतका विचार करण्यात वेळ तू घालवू नकोस ....
आत्ता चटकन फक्त हो बोल...
आतुरतेने वाट बघतो फक्त तुझीच... }

“अगं काय झालं???” महेशने विचारलं... अन् मी भानावर आले...
“अरे काही नाही स्वप्न बघत होते जरा...” म्हणत म्हणत जरा केस सावरले मी...
“काय होत स्वप्न मलाही सांग पाहू” त्याचा प्रश्न ऐकताच मी हसू लागले...
“अरे काही नाही, जरा विचित्रच स्वप्न होत... कसं सांगू तुला माहित नाही... तू विश्वास ठेवशील अस वाटत नाही... पण मी स्वप्नात त्याच्या डायरीवर लिह्णारी लेखणी झाले होते...
J


फक्त तुझ्यासाठी... भाग २३

5 comments:

Unknown said...

perfect

Hema said...

Really perfect...it should be reality,not only her dream....

anaconda said...

अनिकेत आणि हेमा... धन्यवाद...
हेमा:मलाही तसच वाटत मनापासून...

Unknown said...

I just love this blog !!!
Exceptionally!!

Unknown said...

waw!!! Unblievable

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)