Thursday, June 28, 2012

फक्त तुझ्यासाठी... भाग २१


{खरे सांग ना रे तुझ्या मनात काय आहे !
रात्रीत दडलेली पहाट आहे, की
शांततेत दडलेलं वादळ आहे???
एकदा म्हणतोस तू माझी अन् माझीच मंद आहेस
एकदा असे म्हणतोस की माला अशी हवी जिच्याशी
साता जन्माच्या गाठी बांधेन...
खरे सांग ना रे तुझ्या मनात काय आहे !

तू तरी सांग तुझ्या मनात काय आहे...
माझं मन तर ऐकत नाही माझं,
ते तर म्हणतं, ‘ते माझं होत आता तुझच आहे’...
मी तरी कसं समजवू त्याला,
त्याला तुझ खुळ लावलं, कारस्थान तर माझच आहे..
.}

मनात तर विचाराची गर्दी... काही समजेनास झालं त्यात महेश ने दर लावलं...
मोबाइलचे हेडफोन्स कानात होते पण काही गाणी सुरू नव्हती मी थोडी अस्वस्थ होती आतून... थोडी म्हणण कदाचित कमी होईल... पण अस्वस्थ होती हे मात्र खर... रात्री झोप पण निट झालेली नव्हती... या कुशीवरून त्या कुशीवर... काय करू समजत नव्हत... घरात जीव घुसमटू लागला माझा...
सगळा घर आवर, पडदे बदल, लादी स्वछ करणे, कुशन कवर्स चेंज करण, सगळया गोष्टी जागच्या जागी ठेवण... सार केलं पण मन काही स्थिर होत नव्हतं... किंबहुना त्याला शांत व्हायचंच नव्हत...
माझे पाय साखळदंड बांधल्यासारखे जड झाले होते... अंगातली शक्ती निघून गेल्यासारखी वाटत होती...
आता करू तरी काय??? शेवटी मनाशी ठरवलं बहेस जाते आणि जरावेळ बागेत जाऊन बसते... कारण फुल ही एकच गोष्ट आहे जी मला शांत करू शकते... इच्छा तर मुळीच नव्हती पण जाण तर भाग होत...
तयारी करायची पण तसदी नाही घेतली मी... पायताण घातले अन् निघाली... निघाली काय जरा दाराच्या या बाजूने आले lock चेक केलं... (माहित आहे होत दर बंद नेहमी... अन् नसलं तरी इथं सुरक्षा कडक आहे... पण काय करणार भारतीय ना आपण... सवय जडलीय अंगात रक्तात... J)
पलटली तर... लालबुंद होत जाणारा सूर्य ... आणि त्यामुळे क्षणाक्षणाला बदलत जाणारा आकाशाचा रंग ....हे सांर दृश्य अतिशय विलोभनीय... माझं जीवन पण तर असंच आहे... रंगीबेरंगी... एक एका घटनेने बदलत जाणारे... किंबहुना बदलत राहणारे...  समोर पाहिलं तर महेश बसलेला... एका कोपर्यात... काय करत होता कुणास ठाऊक... म्हणजे इतका वेळ इथंच बसला होता कि काय???
जाऊन खडसावलेच त्याला.... “अरे काय हे??? ही आय पद्धत झाली का??? मी...” काही पुढ बोलणार तितक्यात त्याने एक पुष्पगुच्छ दिला... पुष्प गुच्छ म्हणू कि फुलांची महफिल म्हणू अस झालेलं...
“अग तुझ तर नेहमीसारखंच तापलेलं बोलण ऐकण शक्य नव्हत... अन् सोडून जान शक्य नाही ना... मग तुला शांत करायचा एकाच उपाय ना... फुलं तेही वेगवेगळी... आणली जमवून... म्हटलं राणीसाहेब शांत होतील....” अस म्हणत तो शांत झाला... आता हा खरंच त्या फुलांचा महिमा कि त्याचा बोलण्याच ठाऊक नाही... पण हा... मी शांत झाले...
हळूच त्याला विचारलं... “इथं रे काय करत होतास??? मी खरंच दुखावलं रे तुला ठाऊक आहे मला... तू अगदी आत्ताच निघून गेलास ना तरी मी काही नाही म्हणणार तुला.. अगदी खरंच...” जे बोलली ते मनापासून...
“अग मी इथं हे वारूळ बघत बसलो होतो...” माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव न लपण म्हणजे नवलच... म्हणून तो पुढ बोलू लागला... “अग ते काय आहे ना, आठवणीपण या वारुळासारख्याच असतात...  वारुळाला पाहून सांगू शकत नाही कि किती मुंग्या आहेत आत... मनाचही तसच आहे... बाहेरून कळूच शकत नाही कि आत किती आठवणी दडलेल्या आहेत... अगदी जोवर मुंग्या बाहेर येत नाही तोपर्यंत काहीच अंदाज लागत नाही... पण  जर का एकदा एका मुंगीने रस्ता धरला कि एका मागून एक अश्या असंख्य वाटन्याइतक्या मुंग्या बाहेर येतात... आठवणींचं पण तसच आहे... तू शेवटी कशी वागली हे जेव्हा आठवत तेव्हा खूप खूप त्रास होतो... मग हळूच मैत्रीचे क्षण आठवतात... मग त्या आपल्या गप्पा गोष्टी आठवतात... बरोबर केलेल्या गमती आठवतात... अन् मग काय राग आणि काय रुसवा... आणि मग काय निघून जायचं??? कधी नाहीतर आज राणीसाहेबांना जराशी मदत करायची संधी भेटली आहे मग कशी सोडू????”त्याने एका दमात सार सार बोलून टाकलं...
मला माहित होत कि स्वतःला स्पष्टीकरण द्यायला लागण चांगलं नाही तरी पण मी प्रयत्न केला...
“अरे मैत्री एका हद्दीपर्यंत ठीक असते... जास्त झाली कि दडपण वाटत अरे... तसच काहीसं तुझं झालं... अस मला वाटत... तुला नाही का वाटत???” आता त्याला काय वाटत हे मी त्याला का विचारलं हे माझं मलाच माहीच नाही... पण विचारलं मी...
“मला ना वाटायचं... आता नाही वाटत पण आधी वाटायचं... मैत्रीच नात जरा वेगळ असत... त्यात जर सगळ्याच विलक्षण ताकद असेल ना तर ती म्हणते त्यातली सहजता... त्या सहजतेतून हक्काची साय वर तरंगते... जशी साय दुधातूनच वर येते आणि दुधावरच छत करते ना अगदी तसच... मला वाटायची दुधाला साय आपलीच ना... गुलामी नसेलच वाटत... सायीखाली दुधाला सूरक्षितता वाटत असेल... हा पण दुधाला सायीच दडपण येत हे नंतर कळल मला... पण तोपर्यंत जरा उशीर झाला होता...”
अ अ अ अ अ अ अ अ.......... काय बोलू??? काय???? इथं तर ... आणि मी.... पण आता......????

फक्त तुझ्यासाठी... भाग २२

0 comments:

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)