Friday, December 30, 2011

फक्त तुझ्यासाठी ... भाग १७ आणि १८


रात्री झोप पण धड झाली नाही... या कुशीवरुन त्या कुशीवर तळमळत होती, त्याला उद्या फोन करायचा ह्या मानसिक भीतीने...
सूर्याच्या किरणांनी
जाग पापण्यांना आणली...
किरणांची किमया त्या
ओल्या दवांनी जाणली...
मिट्ट अंधाराला पहाट
संथपने गिळत होती...
कशी कुणास ठाऊक,पण तुही माझ्यासाठी झुरतोय
याची खबर मलाही मिळत होती...
            फक्त तुझ्यासाठी...
त्याला मेल केला...
सकाळपासूनच बाहेरच वातावरण एकदम ढगाळ... भरून आल होत नुसत... फक्त बरसायचंच बाकी होत... खिडकीतन बाहेरच दृश्य अलभ्य लाभ वाटत होत... सगळ गदगदून गेलेलं वातावरण...
मनात असंख्य विचार घोळू लागले ,पण शब्दात सांगण कठीण वाटायला लागल...
जणू आसमंत हाकारतोय , अन माझ्या उत्तराची... प्रतिक्रियेची वाट बघतोय... बराचवेळ गेला... काळातच नव्हत... कस सांगू ह्या आभाळाला??? आज काय होतंय मला??? पंख फुटलेत जमिनीवर राहणारीला...
माझाही मान गद्गद्लय विचारांनी... विचारांनी नाही, अपेक्षांनी... नाही, भावनांनी... नाही, संवेदनांनी... नक्की नाही माहित कशाने पण मन तर ओथंबतंय...
ऑफिसात तर जाणार नव्हतेच... पण बाकी काही करायची इच्छाच होत नव्हती... ते पिक्चरमध्ये नाही का दाखवत काहीसं तसच सगळ शांत अन् हळुवार घडत होत... तस कधी कुणाशी बोलायला इतकं मान धजावत नव्हत... ऑफिसात फोनवरच तर बोलते मी क्लाइंटसोबत... पण त्याला फोन करायच्या कल्पनेने मी फार अस्वस्थ झाले... आता तर तो ऑफिसात असणार... मग थांबते जरावेळ....  म्हणून टीवी लाऊन बसले... पण अजुन त्याच अस्वस्थ मनस्थितीत टिविच रिमोट घेऊन बसली होती... काय बोलू, काही नाही... खूपच विचारसत्र सुरू होते डोक्यात आणि तो घरी येण्याची वाट बघू लागली टीवी बघत बघत...
न्यूटनने म्हटलंय, प्रकाशाच्या गतीला पार केल्यामुळे वेळ हळू हळू होत जाऊ शकते... पण मला त्याला आवर्जून सांगावस वाटलं, ‘काहीतरी करायसाठी वाट पाहत असल तर वेळ नक्कीच हळू हळू चालते’... शेवटी लावला फोन... मानत काहीतरी होत होतं... फक्त मनात नाही तर पूर्ण शरीरात... पण अजून थांबण्यात अर्थ नव्हता... तो पण तर वाट पाहत असेल ना माझ्या फोनची... त्याला कशी ताटकळत ठेऊ??? अरे किती मी मुर्ख... का थांबले इतका वेळ??? मेल वाचल्यावर तो तरी कसा कामाला गेला असेल??? बिचारा...माझ्या फोनची वाट पाहत बसला असेल.... त्याला किती वाईट वाटत असावा.. किती मी वाईट!!! अस म्हणत म्हणत मी फोन लावला... {ते एक प्रकारे बराच झालं... त्या बहाण्याने लवकर तरी फोन लावला... नाहीतर, अस जल तर काय??? पासून सगळे प्रश्न मनात उठले असते अन् वेळ लागला असता... J}
फोनची रींग कमी आणि माझ्या हृदयाची स्पंदन जास्त आवाज करत होते... मनात ती जराशी स्वतःवर असलेली चीड मला उभ ठेवण्यात यशस्वी होती... तितक्यात फोन लागला... अन् त्याने उचलला....
"हेय हाय ...” साधारण बोलले... त्याचा आवाज ऐकायला उत्सुक झाले... अक्षरशः बाहेरच्या गाड्यांचा आवाज, घड्याळ्याचे ठोके, सार सार ऐकू येत होत मला... तितक्यात तिकडून आवाज आला...
“कोण???” त्याने विचारल...
काय????????? मी कोण विचारतोय??????? अन् मला तर वाटलं........ आता मात्र मला इतका इतका राग आला कि काय सांगू... किती नालायकपणा... मी इथं जवळ जवळ मेले त्याला फोन करायसाठी अन् तो विचारतो मी कोण??? अगदी नखशिकांत जाळून खाक झाले मी...
कमाल आहे तुझी... मी बोलली होती ना , मी आज फोन करेन म्हणून??? मला वाटलं तू वाट बघत असशील !!!”... मी जरा रागातच म्हणाले त्याला... माझं पण बरोबर आहे यार... ही काय पद्धत झाली का???
“आहा... बोल कशी आहेस???”... त्याचा तो आवाज!!! त्याचा तो “आहा”... मी तर बंदच पडले....
तो बोलत होता अन् मी ऐकत होते... हा अधून मधून, अस का? बर मग? अशी संवाद चालवणारी शब्द वापरत होते... पण वरचा मजला जणू सुट्टीवर गेला माझा... शेवटी तोच म्हणाला, “ठीक आहे मग काळजी घे.... ठेऊ का???”. त्याच्या बोलण्यावरून वाटलं कि तेच वाक्य त्याने तिसर्यांदा वैगरे म्हटलं असाव... म्हणून... “ठीक आहे बाय...” एवढ म्हणाले अन् ठेवला फोन...
काहीतरी गडबड तर आहे... जाणवलं मला... कुणाशी तरी बोलाव लागणार होत... दीदीला सांगू शकत नव्हते... दुसर कोण होत???
      नाही कुणी तर माझी सखी तर आहे ना विचार केला... घेतली
Scrapbook हातात आणि लिहायचा असफल प्रयत्न करू लागले...
आश्चर्यच आहे एकही अक्षर  नाही सापडत मला,
का बर सोडलं या शब्दांनी मज एकटीला???
कुठे गेले ते शब्द सगळे
जे न बोलावताच धावत यायचे
कधी पावसाच्या थेम्बासारखे,
तर कधी नदीसारखे वाहत जायचे???
शब्दात माझा जिव गुतंला पण जिव शब्दचा ना जडला कधी...
मी लिहील्या असंख्य कविता पण शब्द उणा ना पडला कधी...
शब्दाच्या ओजंळीत श्वास माझा, शब्दाने हा जिव ना सोडला कधी...
नेहमीच तर माझ्यासोबत होते, शब्दाने विश्वास नव्हता मोडला कधी...
मी दिल्या शब्दा असंख्य हाका शब्द ना मागे वळला...
अगदी शब्दासाठी झाली शब्द्खुळी शब्द ना मज मिळाला...

थकली... थांबली... सांगायला, विचारायला ‘कुणाला तरी’ सापडवू लागली मी... तोच Scrapbook ची पान पलटवत पलटवत शेवटचं पान उघडलं... अन् त्या पानावर ती Scrapbook देणाऱ्याच नाव सापडलं... “महेश”... हो महेशच... तस जास्त आश्चर्य नाही वाटलं मला... तो सोडून इतका मला ओळखणार होत कोण??? फोन नंबरपण लिहून ठेवला होता पठ्ठ्याने...जणू त्याला माहीतच होत कि मला गरज पडणार आज मित्राची... मग काय... लावला त्याला फोन अन् सांगितलं जसा असशील तस निघून ये... त्याने तस पुन्हा त्याच्या सवयी प्रमाणे पांचट मारलाच... “अग पण मला तुझ घर तरी कुठ माहित आहे???”... आता याच काय करू अन् काय नाही अस झालं मला...
“अरे हो तुला तर माहित ना... गिफ्ट तुझ भूत पाठवायचं ना... आता फोनवरच शिव्या खाणार का येतो पटकन समोर शिव्या खायला???”.... मी तर गरजलेच...
“आलोच”... इतकच म्हणाला...


महेश... माझा वर्गमित्र... किंबहुना, वर्गात होता माझ्या... त्याचं बोलणं वागणं मला पटलच नाही मुळी... मी तर मोठे झाले, पण तो नाही... अन् होण्याची शक्यताही नाही... माझ्या किती रात्री त्याच्या कटकटी अन् त्याच्या बिनबुडाच्या प्रश्नांमुळे वाया गेल्या... हो वायाच गेल्या... मदत म्हणून काडीची नाही पण हक्क तर असा दाखवतो कि काय सांगू...
      पण आज तो पण चालेल!!! कारण खूप खूप अडकलंय मनात... आज तर त्यालाही सहन करू शकते मी... इतका कसा वेळ लागतोय त्याला??? अन् त्याला माझ्या नव्या घराचा पत्ता त्याला कुठून भेटला??? काय सुरु आहे??? आणि  असा अचानक इतक्या दिवसांनी का बर परत आला असावा तो??? चांगली जगतेय ना... सहन नसेल होत त्याला... फार बोलेन मी त्याला... पण पहिले येऊ तर देत...
                                पहिले फोन वाजला... जीव धडधडू लागला... वाटलं मी फोनवर काहीतरी भलतंच बोलले... म्हणून आला असावा... आय करू काय नाही होत होतं... हिम्मत करून उचलला तर नालायक महेश होत... म्हणे, “आलोय घराबाहेर दर उघड आणि परत आत जाऊन बस”... आता हा पोरखेळ का उगाच पण वाद घालण्यात अर्थ नव्हता कारण त्याने सांगाव अन् मला कळावं हे आजतागायत घडलं नव्हतं... तर आज होणार??? म्हणून दर उघडून बसले...
तो आत आला न आला तोच माझी सुप्त इच्छा उफाळून आली... तसापण तो कधीच नाही बोलत मी काहीही बोलले तरी... अगदी काहीही... आहेच तसा तो टाकून बोलले तरीही निर्लाज्जासमान हसून ऐकतो... कधी कधी वाटतं कि का एकतो एवढ??? सहनशक्ती आहे तरी किती याची ???
“नालायक हलकट बेशरम... काय समजतो स्वतःला??? निनावी गिफ्ट काय कविता काय??? आणि अचानक गायब झालास... अक्कल वैगरे नाही का दिली देवाने??? किती बेशरम असावं माणसाने... अरे बोलना आता गप्प का???”
      तो हळूच म्हणाला... “ it’s to see u too”. मी जरा नरमलेच... “आणि हो जे विचाराय ते विचार नंतर... पहिले सांग तुला काय झालं???”
“मला कसलं काय झालं??? अरे निनाव पत्र कोणी पाठवत का??? तेही मुलीला???”
“हा... जस माझं नाव वाचून तू उघलाले असतेच अन् गिफ्ट???”
“अरे पण तुला नव्या घराचा पत्ता मिळाला तरी कुठून???”
“सोप्पं आहे... तुझ्या ताईने दिला... म्हणाली अस्वस्थ आहेस म्हणे जरा... म्हणून...”
“अरे पण असा अचानक गायब का झालास??? नेमकं झालं तरी काय???”
“तस तुला आठवण नसेल.. कारण according to it’s NOT BIG DEAL…

पण मला तर काही फरक तो पडणार नव्हताच ना... कारण मला वाटत सगळ्यांनी माझ्या अन् माझ्या मित्रांसारखं असावं... नाही तर हा वेडा महेस... कुठेच नाही येत माझ्या लिस्ट मध्ये... आणि काही केल्या येणार नाही... मला हसूच आवरत नव्हतं... काय उपयोग याचा...
“काय झालं हसायला??? मी जोक केला का इथे??? बुटकी घरी जा...!!! कळल का??” त्याने कटाक्ष टाकला...
“मी माझ्याच घरी आहे... मुर्खा... तुझं असच असतं नेहमी... त्या तुझ्या भंगार motorcycle वर पण बसलेली... किती छान होती ना... किती मस्त वाटायचं तिच्यावर बसल्यावर... सीटवर स्प्रिंग किती छान रुतत असायची... आणि काय आवाज होणा ना गाडीचा... अगदी छोटे छोटे फुटतात ना तसे... आणि वातावरण तर अर्रे वाह... अगदी सगळ कसं foggi foggi... नाही का??? तरी बसायचेच ना मी??? तरी अस कसं बोलतो तू??? नालायका...” मी पण काही ऐकून घेणारी नाही... सरळ बोलून मोकळी झाली...
तितक्यात त्याने कॅडबरी काढली खिच्यातून... अन् माझ्यासमोर धरली...
मी विचारलं... “हे काय???” त्यावर त्याचं नेहमी सारखं उत्तर... “आम्ही तरी याला चोकलेट म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते नाहीत नाही...” मी मानेनेच नकार दिला...
“अग घे कि तुझ्याचसाठी आहे... please…” मग काय नाईलाजच झाला... घेतली मी हातात.. अन् विचारलं कि, “नेमकं कशासाठी???” त्यावर त्याने उत्तर दिल ... “ तुझ कडू झालेलं तोंड गोड करायसाठी...”
“मी जरा हसलेच मनात पण त्याला नाही कळू दिल... आणि त्याला विचारलं, “माझं तोंड कडू आहे का??? कारण पण  आहेच कि मी चिडते... आता तू म्हणशील चिडत नको जाऊ...”
“अग तस नाही... ते तर उलट तुला शोभत... तुझ रागावण... रागवावं तर तुच आणि चिडव तरीही तूच...
भडकाव पण तूच.... फक्त तूच...” त्याने हे सगळ असं काही सांगितलं कि त्याच्या मुर्खपणावर हसून का होईना पण माझा मूड चांगला झाला...
      “अरे पण मंद माणसा अस कोणी करता का??? मी तर नेहमीच बोलते अन् तू नेहमीच ऐकतो ना मग यावेळी इतका का माजला रे???” मी त्यालाच उलट सवाल केला...
      “ते असू दे काय झालं ते आधी सांग... कारण विनाकारण शेवटच्या पानापर्यंत पोहचणारी नाहीस तू... सांग काय झालं ते??? आणि हे समजूनच शेवटच्या पानावर नंबर लिहला मी... थोडं का होईना ओळखतो तुला...” त्याने अस काही वाक्य टाकलं कि गांगरून जायला झालं मला...
“अरे ...” मी काही बोलणार त्या आताच तो म्हणाला... “आता मी तुला ओळखताच नाही या गोष्टीवर वाद नको... अग तू नसशील मानत, पण u r one of my bestest friend… आणि ते कसं आहे ना हे नातच जरा वेगळ आहे... पावसासारखं.... कधी कधी हमखास चुकतं... तर कधी कधी चुकून बरोबर पडतं... असो नेमका मुद्दा काय तो सांग म्हणजे मिळवली...” तो नेहमीच्याच त्याच्या स्वतःच्या जगातल्या गोष्टी बोलून गेला... practical म्हणजे काय हे तर माहीतच नाही ना त्याला... स्वतः एक जाग बनवायचं आणि त्यातचं रहायचं अशी सवय आहे त्याला...
  मग काय, काय काय घडलं ते त्याला संशिप्त स्वरुपात सांगितलं मी...

“अरे त्याला फोन केला होता मी आज...” मी अगदी जीव मुठीत धरून सांगितलं त्याला... त्यावर त्याच अपेक्षित उत्तर... “काय म्हणाला तो??? कशाविषयी बोलले तुम्ही???”...
त्याच्या प्रश्नाने अगदी आतून हादरून गेली मी आणि सांगितलं... “मला नाही माहित... मला ना मुळी काही आठवतच नाहीये... पण...



 
SDC


फक्त तुझ्यासाठी... भाग १९ 

3 comments:

Unknown said...

nice poem

anaconda said...

आभारी आहे...
असंच वाचत राहा म्हणजे लिहण्याची प्रेरणा मिळेल...

Anonymous said...

nice

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)