“हा!!! बोल काय झाल ते???”... आता काय विचारणं भाग होत ना... तस माझी मुळीच इच्छा नव्हती पण काय करू??? त्याला नको राग यावा म्हणून विचारलं... तसही तो मला सोडून कुणाशी इतकं बोलत नाही... मन मोकळ करत नाही... मग हे सांगण तर जवळ जवळ अशक्यच... अन् त्याला ते न सांगता राहणंही अशक्य... म्हणूनच...
“अरे बोल की”... आता मला हे सगळ लवकर संपाव अस् काहीसं वाटत होत... म्हणूनच...
“ठीक आहे....ऐक मग... अन् मध्ये मध्ये बोलू नकोसं...”
“म्हणजे मी मध्ये मध्ये होय, किती रे नालायकपणा तुझा... नेहमी असंच करतोस... मी बिचारी सगळ ऐकून घेते म्हणून काहीही बोलतो... एकतर मला जास्त बोलन आवडत नाही, जमत नाही तरीही... म्हणे मध्ये मध्ये बोलते... अस् काय बोलन झाल रे???”
“झाल का??? बोलू का मी??? का अजून काही बाकी आहे???” त्यानं त्याच्याच पद्धतीत उत्तरं दिल...
मग काय, “हो! बोल...”
“हा... तर, काल ऑफिसातून जाऊन तिला भेटायचं होत... काय कसली ती conference, सरली म्हणे... आता भेटायचं कुठ??? हा प्रश्नच होता ना...”
इतक्यात न राहून मी बोलले... “अरे घरी बोलवायचं ना!!! किती सोप्पंय...”
“बोललीच ना मध्ये... अग तुला माहित आहे ना मी कसा राहतो ते... तु आलीस तरी घेरी येऊन बेशुद्ध पडशील तर तिची काय बिसाद...” त्याने कळत नकळत माझा राग अर्धा अधिक कामी केला... मी किती जवळची आहे ते स्पष्ट केलं... पण प्रश्न तर होता ना....
“अरे मग कुठ भेटले तुम्ही???”
“मी पण तिला हेच विचारलं, तर म्हणते कशी... ‘अरे आधी भेट तर, शहरात फिरुया अन् आवडेल त्या ठिकाणी बसूया... म्हणजे माझ शहरपण फिरण होऊन जाईल ना...’ आता यावर काय म्हणणार होतो मी... म्हटलं ठीक आहे... ऑफिसजवळ येणार होती ती... मी मित्राची कार घेतली होती... पटकन घरी जाऊन fresh होऊन आलो...”
“अरे वाह... मित्राची गाडी??? चालवता येते ना???”
“हो... येते... चांगली येते... नको काळजी करू.... तु बसली तर नाही काही होऊ देणार तुला... आता मध्ये मध्ये नको बोलू ना ग... हा... तर मी घरी जाऊन आलो... तस आरामात गेलो माहित होत मुलगी वेळेवर येन शक्यच नाही... मी आपलं मजेत येत होतो... पाहिलं तर ती शांत आमच्या ऑफिसाशेजारी असलेल्या असलेल्या त्या तुटक्या गाडीचे फोटो काढत होती... जि गाडी रोज दिसूनही पाहत नाही आम्ही; तीच गाडी... तिला काय दिसल होत कुणास ठाऊक??? अन् तुला तर माहित आहे मी स्वतःहून विचारणारही नव्हतो ना... जमतच नाही ना...”
{आता काय बोलू याला... माहित आहे मला... मलाच सगळ स्वतःहून सांगाव लागत... कधी काही विचारणार नाही... माहित सगळ असतं.... लक्षातही ठेवतो मग विचारायला काय होत कुणास ठाऊक... मी आजारी आहे... तरी आता अस् वाटतंय हे मीच त्याला सांगाव अशी साहेबांची अपेक्षा... नेहमीच... खडूस...}
“हा... तर ती इतकी शांत अन् गुंतलेली दिसत होती काय सांगू तुला... मी ती गाडी... ‘मित्राची’... माहितीय मधेच विचारशील म्हणून सांगतोय... मी गाडी लावली; अन् तिच्या शेजारी जाऊन उभा राहिलो... मग समजल ती काय करतेय ते... खाली एक छानसं घरट होत... पक्ष्यांच... अगदी सुरेख... रंगी बेरंगी... मी तर पाहून संभ्रमात पडलो... माझ्या ओफीसाजवळ पक्षी आहेत??? मला तर आज पर्यंत नव्हते दिसले... हिला कसे दिसले असतील??? अन् तुला तर माहित आहेच मला पण फोटो काढायला आवडत... म्हणून मीही काढला... अन् तोही तिचा...”
“अरे पण” मी काही बोलणार इतक्यात तोच...
“तु विचारायच्या आधीच सांगतो... माझ्याकडेही होताच camera पण मी तिचा घेतला... कारण मला तिचाच फोटो काढायचा होता... ती बघत होती ना... तसाच... म्हणजे आज पर्यंत इतकं गुंतलेल मी कुणालाच पाहिलं नव्हत... म्हणूनच.... अन् तिचाच camera असल्याने तिचा फोटो काढायला ती नकार देऊ शकणार नव्हती ना... हा... तर मी फोटो काढला... काय सांगू तुला,,, नेहमी योग्य angle शोधायसाठी कमीत कामी दहा मिनिट घेणाऱ्या मला प्रत्येक angle वरून अप्रतिमच फोटो जाणवत होता...”
“मग???” मी विचारलं त्याला... {तस मनात शंकेच काहूर माजल... अस् का झाल असेल??? सांगितलंय त्याने किती वेळ घेतो तो angle शोधायला... अन् म्हणे सगळ्या angle वरुण अप्रतिम... मग उगाच स्वतःची समजूत घातली तीचा cameraच चागला असणार.... त्यामुळेच... हो नक्की... त्याचमुळे...}
“मग काय जरा गप्पा सुरु झाल्या... जरा कामी... शांतच... पण सुरेख... बोलता बोलता विषय निघाला पुस्तकांचा... मी तर नाही वाचत पुस्तकं... पण तिला मी सांगू शकणार नव्हतो हे नक्की...”
तो बोलत होता, मन मोकळ करत होता... मी मनातल्या मनात विचार केला मला तर एकही क्षणाचा विचार न करता सरळ सांगितलं होत की नाही वाचत... मग तीला का नाही??? का???
तितक्यात त्याने नवीन पराक्रम सांगितला अन् माझ विचार चक्र थांबवलं...
“अग, मी काय केलं ठाऊक आहे का??? तिला सांगितलं की मी मराठी पुस्तकं वाचतो... आणि ययाति, मृतुंजय अशी नाव टाकलीत... तिने नव्हते वाचलेले... मग काय थोडक्यात ‘सार’ सांगितला... जाम छाप झाली माझी...”
“अरे पण तू तर नाही ना वाचलेली??? मी विचारलं तेव्हा तर नाही म्हणाला होतास ना??? मग कस काय सांगितला??? ‘सार’ ???”
“तू फक्त विचारलं नव्हत... सारीची सारी गोष्ट मला सांगितली होती... मग काय सांगितलं सगळ तू सांगितलेलं... शब्दांशब्द... सोप्पं...” तो सहज बोलून गेला... पण पुन्हा हे वेड मन बोलू लागलं...
{त्याला मी सांगितलेलं सगळच्या सगळ लक्षात होत??? इतक्या दिवसांपूर्वीच??? कस शक्य आहे??? इतकं लक्षात ठेवतो तो???}
“ए मंद, तू मध्ये बोलू नको सांगितलं ना तुला??? हा... तर मी अस् सांगत होतो... माझ्या नंतर तिने सांगायला सुरवात केली... तिला William Shakespeare आवडतो म्हणे... ज्याला A fool's paradise म्हणायचो त्यला ती Romeo and Juliet म्हणत होती... आणि Dog will have its day ला Hamlet म्हणत होती ग... Othello, The Tempest, Julius Caesar आणि As You Like It हे तर ऐकले होते... पण The Tempest, Macbeth हे पण तिने सांगितले... मग म्हटलं हि खरंच William Shakespeare ची fan आहे... मग मी पण ठरवलं की आता हिला William Shakespeare च्या सहवासात न्यावं... मग काय सहल सुरु... तिला मी William Shakespeareच्या जन्म ठिकाणी नेलं... ती तर तिथ हरवून गेलेली... जीथ काही नट नटी त्याच्या काही जग प्रसिद्ध क्षणांना जिवंत करून दाखवत होती... खूप खूप मजा आली... लहान मुलाला फुगेवला बघून आनंद व्हावा तसा होत होता...” तो पहिल्यांदा इतकं सार लिहीत होता अन् तेही न थंबता... आश्चर्य आहे... मग काय मी पण शांत होऊन लहान झाले... अन् आजी गोष्ट सांगत असावी अशा अविर्भावात ऐकत होते...
“नंतर Royal Shakespeare Theatre ला नेलं तिला... तिथंही फिरली... प्रत्येक फोटो निरखून बघत होती... मग वर जाऊन सार शहर एका नजरेत बघायचा; अन् सामावून घ्यायचा प्रयत्न करू लागली... तितक्यात समोरच्या Bancroft Gardens कडे लक्ष गेल... बाहेर असलेली माहितीपर पाटी म्हणजे एक आकर्षण केंद्र होती... चारच फुलांविषय लिहलं होत पण काय सांगू काय सुंदर फोटो होते ग... शप्पत... खुपच छान...ते पुतळे... ती रंगी बेरंगी फुल... काय सांगू काय छान वातावरण होत... मी एक फुल विकत घेऊन तिला दिल... तिचा चेहरा एकदम खुलला... अन् पहिल्यांदा दिसल की तिला खळी पडते म्हणून... अप्रतिम... ते फुल छान दिसतंय की ती हे सांगण अशक्य वाटलं मला...”
{ हो ना... ती फुल अन् मी काय काटा??? किती हलकट पणा आहे हा... तिला फुल दिल....म्हणे फुलाहून सुंदर... नक्कीच ते फुल तिच्या कडे जाण्याच्या विचाराने मेलं असणार... किती निर्लज्जपणा... अस् कुणी पहिल्या भेटीत फुल घेता का??? तीच तर ठीक आहे; पण याला नको का लाज??? म्हणे खळी पडते... खळीत काय ठेवलंय??? ती कोण प्रिती झिंटा येते अन् गालावरची खळी लोकप्रीय होते... त्याआधी नव्हत्या का खळी पडत???... }
“मग आम्ही खूप खूप फिरलो... तिला म्हणे हॉटेलच नाव आवडत नव्हत... अस् करत करत अर्धा अधिक शहर आम्ही फिरलो... शेवटी The Encore मध्ये गेलो...” तो बोलत असतांना मी मधेच माझी शंका विचारली...
“The Encore हे काय नाव झाल रे???” मी स्पष्टपणे विचारलं... काय ते नाव??? काय त्याचा अर्थ??? अन् म्हणे होटेल...मला ते microprocessor च नाव वाटलं ते...
“अग त्या हॉटेलवर William भाऊंच चित्र होत ना... अन् तो pub आहे; होटेल नाही... मग काय धूम... तिला नाचता पण येत हे पण प्रत्यक्ष अनुभवातून माहित पडल... अन् तेही छान... मी तर आपला आपला छान ‘बेताला’ नाचत होतो... पण ती आली अन् माझी ‘बेताला’ शैली बदलवून टाकली... close dance नाही केला... पण तरीही एक साधर्म्य जाणवल... काय सांगू कस वाटत होत??? ... जस तिला सवय होती माझी... अन् मला तिची... Ball dance केला... मी... बोल... अशक्य वाटत ना???... पण खरंच केला...तिचा हात हातात घेतला अन् मग काय पाय स्वतः हालत होते... काय सांगू किती मजा आली ते... तो अनुभव नाही विसरू शकत मी...”
{हा Ball dance करा तुम्ही... इथ माझ्या काळजाला foot ball समजून लाथा मारा अन् तिच्या बरोबर Ball dance करा... आणि पण खरंच, इतकं कस काय जमल त्याचं???... पहिल्या भेटीत??? नाही शक्य... मग का??? कस काय???}
“अरे पण किती नाचालात???... अन् जेवण वैगरे??? तू जेवला नाही काल??? किती रे... किती वेळा सांगितलं आहे पण तू...” मी न राहून चिडले त्याच्यावर... {हजार दा सांगितलं आहे!!! जेवणावर लक्ष दे... काय तर Ball dance करत होता... जसा नसता केला तर शेरभर मांस कमी झाल असता ना... }
“अग ऐक तर... आता तर खरी मजा आहे... नाचून थकलो अन् मग ‘जेवायला दुसरी कडे जाऊ या’ अशी फर्माईश आली... मग काय??? गाडी काढली,,, अन् Falcon Hotel ला गेलो.... तू विचारायच्या आत सांगतो त्यावर Falcon पक्ष्याच चित्र होत म्हणून त्यात गेलो... मग काय जेवण सुरु झाल अन् तिच्या डोळ्यात पाणी आल... मी तर घाबरलो... म्हटलं अचानक काय झाल??? आत्ता तर चांगली होती... मग सांगितलं तिनं... तिला न फोटो आवडायचे, न गाड्या, न William Shakespeare, न नाच; काही म्हणजे काही नाही... फक्त अभ्यास अन् ति असंच होत तीच जग... काय करावं??? मी विचार केला.... माझ्या ऐवजी मंद असती तर तीन काय केलं असत??? मग काय बाकी सोप्पं होत न... मी सरळ विचारलं... ‘काय त्याच नाव???’ ”... त्याच्या या वाक्यावर मी जागेवरच उडाले...
“खर??? तू??? अस् विचारलं??? मग रे??? काय म्हटली ती??? चिडली का???” आता माझी अत्कांठा शिगेला पोहचली...
“नाही ग कसली चिडते.. ती तर रडली... मुसमुसून... मग म्हटली ‘तुला कस कळल???’ मी तर सरळ सांगितलं आहे कोणीतरी... माझी मंद... माझ्या जवळ... तीन शिकवलं आहे... आणि मग..........................”
तो काय बोलत होता हे कळालंच नाही... फक्त मी अडकली तर त्या शब्दात... “माझी!!!”... मला तर सार जग थांबल्यासारखं वाटलं... काय होतो याचा अर्थ??? का म्हटलं असेल अस्... उगाच चिडवत असेल मला... हो नक्कीच ... आहेच तसा तो हलकट... पण... जेवढ मी त्याला ओळखते, मनातलं सांगतो तो... मनाने बनवून नाही... म्हणजे याचा अर्थ??? तो माझ्यावर... हे शक्य आहे का???... का अस् बोलला तो???
जेव्हा हि दिलस अगदी भरभरून दिलस
कधी ओंजळ रिकामी होणारच नाही
तुझ्या आठवणीनी भरून गेलीय मी
एकटी आहे मी अस कधी म्हणणारच नाही
7 comments:
zakkass.. awsum come bak.. :)
gud one . . .
thanks...
dude... its an awesome..... peity zinta ch suchli na tula..... athwani..:)
Mast re... awadla re mala... Really nice!!!! Now next part please...!!!!!
:):)
this one is ur writing.. expecting something like this again...
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)