Thursday, October 6, 2011

फक्त तुझ्यासाठी ... भाग १०

पण,,, किती सोपा वाटणारा पण क्लिष्ट शब्द आहे...
जसा तो जवळ जाणवतो पण दूर आहे... मला त्याच्यातला अन् माझा दुरावा कधीच जाणवला नव्हता... कॉम्पुटर च्या त्या बाजूला तो अन् या बाजूला मी असंच जाणवायचं मला... पण त्याच्या कालच्या बोलण्यामुळे त्रास झाला मला... का ??? माहित नाही... किती वेळ होईल??? माहित नाही... अस् ह्यायला पाहिजे का??? हे पण नक्की माहित नाही... फक्त एवढाच माहित आहे त्रास होतोय...
तस आमच्यातलं वागन फक्त मैत्रीपर्यतच आहे... हा फक्त एकमेकांवर हक्क गाजवू लागलोय एवढंच... पण ....
हा ‘पण’ आलाच कशाला माझ्या आयुष्यात ठाऊक नाही... त्याची आठवण येत आहे... ऑफिसात, घरात रस्त्यात... सगळ काही त्याचीच आठवण करून द्यायला आहे अस् वाटत आहे मला... काय करणार...
मलातर माहित आहे सगळ ‘पण’ या मनाला कोण समजावणार... हे सगळ जरी खर असल् पण त्याच्या मनात काय आहे कोणास ठाऊक... त्यालाही बोलावस वाटत का उगाच मला वाईट वाटेल म्हणून बिचारा येत असेल... माझ सार बोलन सहन करत असेल... अस असत तर त्याने मला इतका वेळ नसता दिला...प्रत्येक प्रश्नाला उत्तरं आणि उत्तराला प्रश्न नसत दिला...
पण अस् असत तर तो काहीतरी स्वतःहून बोलला असता ना???... नेहमी मीच त्याला म्यासेज करते... त्यानेही कधी केला असता ना???... नाही चारोळी करू शकत तर कमीत कामी छान केईय चारोळी म्हणून reply तर केला असता ना???? हे तर खर आहे.... पण...... त्याच माझ्याशी बोलतांना जेवण विसरून जान... इतक्या कामाच्या तनात माझ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवण???... अस् नको ना व्हायला... नाही कळत काही माझ्या कामातला तरी सार कस काय ऐकून घेतो अन् गप्पपणे नाही... मधेच प्रश्न विचारेल... कधी कधी काम करायची पध्धत नेट वर शोधून का होईना पण सांगेल... अस् का केलं असत त्याने ???
कधी कधी वाटत त्याच्या विषयी मनात मैत्रीपेक्षा जास्त काहीच नाही... पण.... तस असत तर काळ कोण ती न जाने तुच्या विषयी ऐकून इतकं वाईट का वाटलं असत मला??? मग वाटू लागत की नाही काही तरी वेगळ आहे मनात... मैत्री पेक्षा पण जास्त काही... कारण माझ्या 'दि' पेक्षा पण त्याच्याशी जास्त जवळचा वाटू लागलं मला... इतकी आठवण ना कुणाची कधी आली होती न मला वाटत कुणाची येऊ शकते...
हा हे मात्र जरा किचकट आहे... कारण जरी मला त्याच्या एवढी आठवण कुणाची येत नसेल अतारीही रोज ज्या आतुरतेने मी त्याची बोलाय्साठी वत पाहते तशीच अजून कसलीतरी किंबहुना कोणाची तरी वत मी पाहू लागलेय...

त्या अनामिक व्यक्तीची आणि त्याच्या त्या वेगवेगळया भेटीची मी वाट पाहू लागलीय... मला काय आवडतं हे त्याला कस कळत हे मलाच कळत नाहीये... आता कालच जशी मी ऑफिसातून घरी आले आणि छानसं paperweight; कागदाचच पण छान सुरेख... सहा भाग त्याचे दिसत होते, अन् प्रत्येक भागावर माझ्या नावाच्या अद्याक्षरावरून अप्रतिम दोन ओळी लिहलेल्या होत्या... काय सांगू किती वेळ मी बघतच राहिले... अचंभित... आज पर्यंत खूप gift मिळाले... नाही अस् नाही... कारण माझीच ग्यांग आहेच तशी... भेट आणि भेटपत्र तर आमचा जसा अविभाज्य भागच आहे... कधीही कशाही साठी भेट देणार... पण एकातही इतकी जवळीक पेरलेली नव्हती... जणू फक्त मलाच अन् माझ्याचसाठी... मलाच कळल नाही मला ती भेटवस्तू इतकी कशी आवडली.... अन् का नको आवडावी??? हरवणार नाही इतकी ती मोठी आहे... अन् paperweight म्हणून वापरता येन्याइतकी ती लहान आहे, बरोबर घेऊन जाऊ शकते...
किंबहुना माझ्याबरोबरच ती असावी अशी देणाऱ्याची इच्छा असावी... अन् माझ्या मते ती पूर्ण होणार... कारण मला तिला नजरे आड कारण जीवावर जातय... नेट वर बोलत असतांनाही कॉम्पुटर वर ठेवते मी... माझाच नाव मलाच माहित नव्हत अशा पद्धतीत मांडलं होत... काय सांगू... कस सांगू... कळत नकळत पुढच्या भेत्वास्तूची वत मी पाहू लागले... आधी ऑफिसातून परत येण्याची ओढ असायची नेट वर गप्पा मारन्याठी... अन् आता आज काही भेटवस्तू आली आहे का हे पाहण्यासाठी... टे घरच चित्र तर माझ्या खोलीत भिंतींची शोभा वाढवत आहे... अन् आता हा paperweight... इतका विचार माझ्यासाठी करतं कुणीतरी... माझी आवड निवड जि मलाही माहित नव्हती ती जाणत्य कुणीतरी... नसूनही असल्याची जाणीव करून देतं कुणीतरी... पण मग मला त्याला भेटायची ओढ का नाहिये??? मलाच समजत नाहीये... पण एवढंच माहितीय मी बदललीय... नेट वरच्या गप्पा अन् भेटवस्तूची भुरळ यात अटकलीय...
पण सध्यातरी कोण ती कुठली अप्सरा.... तिची चीड मला येतेय... म्हणे देवी... चेटकीनच असणार नक्की... अन् तीच काय चुकलं... तो काही लहान बाळ आहे का??? त्याला नाही का समजत... म्हणे पुन्हा जाणार भेटायला जाणार... जाऊ दे... माझ काय अडलय खेटर??? मित्र म्हणे माझा...
बाकीचे माझे मित्र किती काळजी घेतात माझी... रात्री रात्री मला फोन करून बोलतात... न थांबता... न थकता... याच्या सारख नाही... म्हणे झोपायचं असतं मला... साध च्याट नाही करू शकत??? याला मित्र म्हणतात??? माझ्यासाठी झोप नाही सोडू शकत??? मान्यय बाकी वेळ जमेल तेव्हा असतो तिथ... पण काय अर्थ त्याला... माझे बाकीचे मित्र कशे मला एकदा हसवण्यासाठी कधीही आणि काहीही करायला तयार असतात...
आणि हा??? म्हणे माझा मूड बदलवण्यासाठी मुद्दाम मुर्खपणा करतो... काय अर्थ आहे का याला???
पण बराय महेश सारखा तरी नाहीये...असंच होता महेश पण... कधीच नाही करायचा बाकीच्यान्सारख... काय समजायचा स्वतःला कुणास ठाऊक... म्हणजे त्यालाही असतील काही त्याच्या गोष्टी पण मला हवा तसा नाही ना... माहितीय त्याला मी रात्री ११ शिवाय नाही बोलत... पण तरीही मध्ये मध्ये म्यासेज काय, कधी कधी तर कौल पण करायचा... मी खूप वेळा उचलायचेच नाही त्याचे फोन... त्यालातर भेटनही टाळायची... माहितीय तो माझ्या सारखा नाही... Worthless fellow… स्वतःला काय समजायचा काय माहित ??? मित्र म्हणे... माहितीय मी पण कधी त्याला वेळ दिला नाही... समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही... का करू??? काय गरज??? असेल लहानपणीचा classmate… पण काय त्याचा अर्थ मित्र होतो की काय??? तिथच अटकून होता... म्हणून एकदा झापलं चांगला त्याला... इतकी की त्याने स्वतःशीच नजर मिळवू नये... काय उपयोग त्याचा??? मेला तर मारू दे... मला काय त्याच??? कोण कुठला??? मला जास् हवं तस वागत नाही तर मित्र कसा??? माझासारखा नाही राहत, बोलत तर मी का बोलू त्याच्याशी... निर्लज्ज... लापट सारखा वागतो... माहितीय I hate him… तरीही...

पण हा तसा नाहीये... कारण मला याच्याशिवाय राहता येत नाहीये... राहून राहून विचार येतात मनात... अन् मग मनाच्या खोलीत घर करून बसतात... काही केल्या जात नाही...
म्हणून न राहून त्याला मेल केला...

तूलाही कळत नसेल.. तुझ्यात काय आहे
पण माझ्या शब्दांना तू तुझ रूप देतोस
प्रत्येक ओळीला भावनांचा हळवा स्पर्श देवून
तुझ्याही नकळत तू माझ्या चारोळीत उतरतोस...
फक्त तुझ्यासाठी ...


फक्त तुझ्यासाठी ... भाग ११ 

2 comments:

Hema said...

Ekadam sahi.... !!!1
Awadal mala.... Thanks....

Unknown said...

kavita chan ahe!

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)