Sunday, October 2, 2011

फक्त तुझ्यासाठी ... भाग ९

दिवस रोजसारखाच चालला होता; जोपर्यंत त्याने बॉम्ब नव्हता टाकला.... मी पण काय करू??? त्याने काहीही सांगितलं तरीही मनाशी घेते... खर तर मनच मनाशी लाऊन घेत... माहितीय मला बऱ्याचदा त्याच अगदी महत्वाच म्हणजे “घराबाहेर कुत्र्याच पिल्लू आलंय... तुला आवडलं असत नक्की...” एकदा तर चक्क, जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मला लवकर बोलावले ऑफिसातून आणि सांगतो “काय तर शर्टावर शाईचा डाग पडलाय कसा काढू???”
पण आज का कुणास ठाऊक??? वाटत होत की काहीतरी खरंच महत्वाचं असेल...
{तस मला प्रत्यक वेळी वाटत... पण आज मलाही त्याला काहीतरी सांगायचं होत... नव्या घरात येऊन ३ ४ दिवस होतात न होतात तोच एकचमत्कारिक प्रकार घडला... एक अनामिक पुष्पगुच्छ आला मला... अन् दुसऱ्यादिवशी छानसं घरच चित्र आल... ऑफिसातून कुणीच पाठवलं नाही... मग नेमकं कोण??? त्यातचं मला ते आवडलं पण मनात भीती पण वाटली... आज त्याला सांगाव अन् उपाय विचाराव अस् ठरवलं मी...}
घरी आले अन् गाणी लावली... गारवा... मला फार आवडायला लागले त्यातले गाणे... तस त्यानेच सांगतल होत ऐक म्हणून... नेट लावताच त्याचा म्यासेज डोकावला... “मंद किती वेळ लावते ग???”
आता मात्र मला टेन्शन आल... कितीही महत्वाचं काम असल् तरी त्याने मी सुरु केल्याशिवाय बोलन सुरु केलं नव्हत... पण आज...
“अरे लवकरच तर आले... विमान नाहीये माझ्याकडे उडत उडत यायला... अन् तुझ्या सारखं घराजवळ नाही जात मी कामाला... दूर आहे ऑफिस...आणि आम्ही काम करतो तुझ्या सारख नाही रिसर्चच्या नावाखाली झोपा काढत....मी उगाच त्याला टोचण दिली... त्याने भांडण सुरु करावं आणि मला बर वाटाव म्हणून... पण.....
“ ठीक आहे ... माझाच चुकलं...” त्याने सावध पवित्र कसा काय घेतला??? फक्त आणि फक्त भांडतांना बोलणारा तो, आज भांडण करायला नाही म्हणतोय??? कस शक्य आहे??? मी स्वप्नात तर नाही ना??? आज काल तर स्वप्न अन् सत्यातला फरक नाममात्र राहिलाय त्याच्या रोजच्या गप्पा अन् स्वप्नातल्या भेटींमुळे...पण काहीतरी मोठ्ठी सबब असणार हे मात्र नक्की झाल...
मी परत विषय टाळायचा प्रयत्न करत बोलले....”अरे तुला माहित आहे का; आज काय झाल ते???”
नेहमी काही न बोलता माझ सार ऐकणारा तो, मधेच बोलला... “काहीतरी सांगन्यासाठी तुला इथ बोलावलं ना मी???”
मनात नसूनही “अरे हो, बोल काय झाल???”.... म्हटले मी...
“अग तुला सांगितल होत ना! आई बाबा लग्नाची घाई करत आहे, आज तर हद्द केली त्यांनी... अचानक फोन केला आणि सांगितल की ‘एक मुलगी आहे जि त्यांना आवडलीय, आणि माझी संमती हवी आहे”...
माझे स्पंदन तर आसमानातल्या त्या चांदोमामालाही ऐकू येत असाव्या इतक्या जोरात सुरु झाल्या.... “अरे मग ठीक आहे ना... बघ की फोटो”
“फोटो पहायचं असतं तर कशाला इतक मनावर घेतलं असत मी... ती इथ आलीय, म्हणून बाबांनी सांगितल तिला मदत कर, आणि शहर दाखव... काहीतरी conference आहे म्हणे, pharmacy केलंय मुलीने...त्याच संदर्भात भारतच प्रतिनिधित्व करायला आलीय इथ...”
काय बोलू अन् काय नाही अस् झालेलं मला...
“आणि भेटलो मी तिला आज सकाळी... थोडाच वेळ... तिला उशीर होत होता म्हणे... Conference च्या ठिकाणी सोडून आलो... आता माझ ऑफिस सुटल्यावर पुन्हा जायचं भेटायला...”
अगदी दरड कोसळावी तस झाल मला... अगदी शून्यात हरवले मी... काय होतय अन् का होतय हे समजणे तर दूर पण अनुभवण्याच्या पलीकडे गेले मी... माहित नाही का??? पण प्रत्यक गोष्टीला कारण असताच अस् नाही ना!!! आणि जरी असलच तरी ते आपल्याला माहित असतच अस् नाही... आणि माहित जरी असल् तरी आपण ते मान्य करतोच अस् नाही... काय करणार खूप गोष्टीत असंच होत, कळत पण वळत नाही... आणि वळल तरी मिळतच अस् नाही....
“ए मंद आहेस ना...??? बोल की काहीतरी... हेलो...”
“अरे आहे ना... कशी आहे रे दिसायला???”
“ते तर विचारूच नको... मला खर सांगू तर ती सोडून दुसर काहीच नाही दिसत आहे... आता पण मी तू लिहलेल वाचतोय पण वाटतंय ती बोलत आहे... ते तर बरय माझ हृद्य कमजोर नाही... नाहीतर नक्कीच मी मेलो असतो... मी तीन चार ठोके तरी चुकवले असतील... खर सांगू तर माझ हृदय सुरु आहे की नाही हेच मला कळत नाहीये.... मी स्वास घेणच विसरलो होतो... मला अचाणाक वाटलं की कुणीतरी माझा गळा दाबत आहे म्हणून... मला रक्त माझ्या धाम्ण्यातून खाली खाली वाहत जातंय आणि आता ते बाहेर येणार अस् वाटत होत ग... मला वाटलं मी नक्कीच मारणार आता... कमीत कामी बेशुध्द तरी पडेल अस् वाटलं... किती सुंदर आहे कस सांगू??? अप्रतिम अशी आहे... नाही अशक्य अशा प्रतीची सुंदर... अवास्तव....असंभव...आज पर्यंत जे पण प्रेम कवितांमध्ये कवी प्रेमिकेला लिहतो, ते सार खर होऊन अवतरलं होत माझ्या समोर... ती स्वप्नवत आहे... खर सांगू तर कुणी स्वप्नातही अस् नाही पाहू शकत इतकी ती सुंदर आहे...जगातले सारे प्लास्टिक सर्जन जरी एकत्र आले तरी एकट संपूर्ण रूप नाही बनवू शकत इतकी सुंदर...काय सांगू कशी आहे... खर तर शब्दकोश उना पडेल तिच्या विषयी सांगतांना... पण नाही सांगितल तर मी नक्की आतल्या आत मारणार म्हणून मी प्रयत्न करतो...
ते नितळ स्वच्छ डोळे... एका महिन्याच्या बाळाचे कसे असतात??? अगदी तसेच... त्यांना पाहतच रहावस वाटत होत मला... जणू काही त्यांनी माझी नजर धरून ठेवली होती...
ते केस काय सांगू तुला... जस् काय कुणीतरी खास ब्लोवर घेऊन ते उडवत होत... ती लाट पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावर येत होती... आणि काय सांगू जेव्हा ती त्यांना सावरत होती ना, बापरे...
ते नाक शिल्पकारेने रेखाटलेल वाटत होत... दुधाळ वर्ण, तोही डाग विरहीत... ते तुमच software आहे ना photoshop त्यात सुद्धा न करता येण्या इतकं स्वच्छ... आणि काय सांगू तूला...
ती नक्कीच देवी असणार... नाहीतर अप्सरा... नाहीतर नक्कीच चेटकीण... पण मनुष्य शक्यच नाही...”
तो बडबडतच होता अन् मला सुचत नव्हत काय समजू काय बोलू... काहीतरी कारण तर आवश्यक होत...
“ ए मंद... काय झाल??? कुठ हरवलीस??? आहेस ना???”... त्याने प्रश्नाचा भडीमार चालवला...
“होरे आहे... पण जरा काम आहे, लगेच जाव लागणार... येते मी... bye…”
“अग पण... ठीक आहे ... bye…” मला माहित होत तो कधीच मला थांबत नाही, जास्त विचारत नाही... आणि हेही माहित होत की त्याला माझ्याशी खूप खुप बोलायचं होत... पण मी बोलू शकत नव्हते... शक्यच नव्हत ते... आणि मी त्याच्या या वागण्याचा उपयोग करून घेतला आणि offline झाले...
झोप लागणार नाही हे माहित असल् तरी प्रयत्न कारण भाग होत... उद्या लवकर जाऊन आज लवकर आल्यामुळे राहिलेली काम करणही भाग होत मला... पण... हा ‘पण’ फार जास्त त्रास देतो काय करू...
पण...

1 comments:

Hema said...

sabse exciting topic.... New entry???
Whos this???? Gifts????

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)