Sunday, June 16, 2013

फक्त तुझ्यासाठी... भाग ३२

पाऊस मला फार आवडतो...
शरीरासोबत मनाला हि तो चिंब भिजवतो...
ढगांचा गडगडाट... विजांचा कडकडाट...
गारठलेलं वातावरण सगळ... अन त्यात "त्याच्या" सोबतीची पायवाट...
धावता धावता धडपडते... पडता पडता सावरते...
तो हळूच मग माझा हात धरता... मनातल्या मनात बावरते...
पाउसाच्या ह्या धुंदीत... न उतरणारी नशा हि चढते...!!!

आज प्रचंड भिजले पावसात... मनसोक्त ... इतक्या वर्षांची सगळी कसर भरून काढली... आम्ही फोटोहि काढले...
जस जस आम्ही माझ्या घराच्या जवळ येत होतो... लहानपणाची आठवण अधिकाधिक येत होती... शाळेत असताना पहिल्या पावसात आपल्याला खेळायला सोडलेलं आठवतय... शाळेत येतांना ड्रेसचे पुरे बारा वाजायचे... पावसात शाळेतून घरी चालत आलो होतो एकदा...  सायकल हातात धरून...  फक्त भिजण्यासाठी... दप्तरातल्या वह्या ओल्या झाल्या की खिडकीत वाळत घालायचो...  लांबच लांब रस्त्यावर साखळी धरून चालायचो... घरी एकटे असताना खिडकीत आई-बाबांची वाट बघायचो...  कितीही मोठं होत असलो तरी पावसात लाईट गेल्यावर एकदा तरी घाबरायचो... किती मज्जा असायची ...

अखेर घरी आलो... पप्पा भेटले... त्यांना बघून काय सांगू किती आनंद झाला असेल... सगळ्या जुन्या आठवणी उजळ्या...
कस आई रोज जेवण कर जेवण कर म्हणून माझ्या मागे पाळायची... माझी अन दि ची छोट्या छोट्या गोष्टीन वरून भांडण... पप्पा कसे आमच्यासाठी घोडा बनायचे अन आम्हाला खेळवायचे... सगळच... अगदी दोन मिनिट भर पप्पांना मिठी मारली... खूप बर वाटल... पप्पान हि अश्रू आवरेना...
असाच आमचा वडील- मुलगी मिलाप होत होता...  "अन हा कोण तुझ्यासोबत?" पप्पांनी नेहमीच्या खोडकर स्वरात विचारल...
मी म्हटल... मित्र आहे माझा... खूप चांगला मित्र... बस मध्ये झालेला घोळ सगळा मी त्यांना सांगितला... आणि त्याच्या मुळे आज माझी bag मला मिळाली हेहि सांगितल...
पप्पा त्याला भेटून खूप खुश झाले...
मी ह्या सुट्टीत अख मुंबई नगरी त्याला फिरवणार आहे... मी पप्पान म्हटल...
पप्पा काहीसे चिडवत मला हो हो... जा ... भरपूर फिरा 
माझ्या वडिलांचा हा नेहमीचा स्वभाव... कोण मुलगा माझ्या सोबत दिसला कि आपले चिडवायला सुरु होतात... त्याला कारण असे कि माझे अन मुलांचे फार जमत नसे... असो ... त्या खोडकर पणातही आज  वेगळीच मज्जा होती... मला ते आवडत होत...

पाऊस.. ज्याची आपण इतके दिवस आतुरतेनं वाट पाहत होतो, तो नुकताच मुंबईत दाखल झाला होता... पावसात मुंबई फारच सुंदर दिसते...  त्यात  त्यानं नुकतीच  धो-धो बरसायला सुरुवात  केली...  आणि कोसळणारा पाऊस अंगावर घेत मुंबईत फिरायला निघालो आम्ही हौशी मंडळी... 
येणारा प्रत्येक क्षण त्या थेंबाप्रमानेच... पानांवर थांबलेला होता...
कुठे कुठे जायचं याचा बेत डोक्यात आखून ठेवला होता... 


माझ्या शहराविषयी  नेहमीच्या भाषेत सांगायचं तर, ‘कधीही न थांबणारं शहर’! पण पावसाळ्याच्या काही दिवसांत शहराची धावपळ थांबते आणि असं झालं की, माझ्यासारख्या चाकरमान्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांची पावलं वळतात ती या मायानगरीतील  पाऊस अनुभवायला... हे हि तितकाच खर कि ह्या क्षणांची खूप आठवण यायची इतके वर्ष... पण हा पावसाळा त्याच्या सोबतीने सगळ काही भरून काढणार आहे जणू...

 मी म्हटल... अरे मुंबईत पावसाची मज्जा अनुभवण्यासाठी तशी अनेक ठिकाणं आहेत...
 मी सर्वात आधी त्याला  "वरळी सी फेस!" इथे नेल...  पावसाळी समुद्राच्या लाटा अंगावर घेत इथल्या फुटपाथवरून फिरत... एकमेकांवर पाणी उडवत वेगळीच मज्जा लुटत होतो... किती थंड हवा... काय सांगू... अश्या वातावरणात... वाळूवर त्याचा हात अगदी घट्ट धरून चालण्यात खूप मस्त वाटल...
आज मन गात आहे... का जणू नाचत आहे... त्यात पाऊस आपले वेगळेच गाणे गात आहे ...!!!!
मध्य मुंबईतल्या या ठिकाणी फिरताना खूप भूक लागली...  एकाच शहल्यातून नारळ पाणी प्यायलो...
त्याचे ते बोलके डोळे पाहायला मला खूप आवडत होते ... एक सेकंद भर तर मला  शहाराच आला... जेव्हा त्याने खोडकरपणे शहाळ धरत माझ्याही बोटांना हात लावला... अगदी चित्रपटात आपण पाहतो तस...

त्यानंतर आम्ही आलो  बांद्रा रेक्लमेशनच्या दिशेनं!... मला आठवत शाळेत असतांना आम्ही नेहमी इथे पाउसाची मज्जा लुटायला यायचो... इकडची हवाच अगदी वेड लावणारी...मला त्याची सोबत फार आवडत होती... कदाचित खूप जास्त...
का जणू अचानक मनात आल... 
 मैत्री म्हणजे काय ??? मैत्रीची नेमकी व्याख्या काय??? प्रेम म्हणजे काय? प्रेमाची व्याख्या काय??? अशा अवजड बोजड अक्षरांच्या मर्यादेत बसूच शकत नाही मुळी आमची प्रेमळ मैत्री...  महेशहि माझा मित्र आहे... मग ह्याच्या सोबत इतके का वेगळे वाटते??? "माझ्या त्याच्यात" अस काय जे मला त्याच्याकडे खेचत!!! हा सहवास असाच आयुष्यभर राहावा अस का जणू वाटते आज!!!  आजचा दिवस जणू  आभाळ मायेच्या पावसागत रिमझिम बरसणारं... अलवार... अनिवार... आवेगानं... जसं आभाळ देखणं गडद होऊन झेपावतं धरतीकडे ... तसं...

आणि ... टचकन् हातावर थेंब पडला मी घाबरले एकदम.. पापण्यांचा पहारा तोडून हा एक अश्रू बाहेर आलाच कसा... तेही मला न विचारता न जुमानता... तर त्याबरोबर दुसरापण थेंब तिसरापण चौथापण ... हे वेडं आभाळ माझ्यासारखच आहे… सारखं भरून भरून येतं त्याला... आभाळाने पण मैत्री केली कि माझ्या त्याच्याशी... :)  एखाद्या स्त्रीच्या अंतःकरणासारखी विशाल- अपार प्रेममयी… हिरव्यागार मायेची ही जमीन असाच काही  जडलं का मन या आभाळाचं ?.??  ‘‘या नभाने या भुईला दान द्यावे…’’ तसाच...  ओंजळ भरभरून दिलेला हा पाऊस या शुभ्र जलधारा म्हणजे त्याच्या मैत्रीचा  वर्षाव !!! मी म्हटल ... हो... अशीच आमची मैत्री...

 लांबवर  धुकाळ तलम पांढरा अलवार तलम पडदा लहरतोय्... तो आकाशाकडे खुल्या बाह्यानी उभा राहिला... त्याच्या डोळ्यांच्या पापण्यांवर पावसाचे थेंब पडतायत्... गालांवरनं कपाळीवरून शुभ्र पाणथेंब सरसर तुटलेल्या मोत्याच्या माळेगत सांडतायत् असाच वाटत होत अगदी...  आई ग!!! पहिल्यांदाच मी कोणाला इतकी निरखून पाहत होते...  माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला...
 दूरवर…. अंधुक धुकाळ सगळं...माझ्यासारखीच... नारळाची झाडं डोलतायत्- त्यांच्या झिपर्‍या पानांचे केस सावरायला त्यांना वेळ नाहीय...
मला माहित आहे अगदी हास्यापद उपमा आहे... पण त्यावेळी हेच सुचल... त्याने जेव्हा कपाळावरचे माझे केस नाजूकपणे माझ्या कानाच्या माघे केले... तेव्हा तर मी चक्क लाजले... मला त्याचा स्पर्श खूप आवडला... जणू नझरेनेच बोलायचा मूड होता माझ्या त्याचा...

आज जणू तो माझ्यासाठी पाऊस बनून आला होता...
हो मी त्याच्यात चिंब भिजत होते...
माझ अस्तित्व विसरून त्याच्यात सामावत होते...
अवचित हा क्षण ... अवचित माझे मन!!!

आज चा हा पाऊस खरच माझ्या गुलाबी आठवणी ना चिंब भिजवत होता... किंबहुना नव्या आठवणी साठवत होता... 
आज पाणी... पाऊस... आम्हा दोघांना खूप आवडत होत... म्हणून म्हटल... "बांद्रा वरळी सिलिंग" ला भेट देऊन येऊ... तसा विरुद्ध दिशेला होत... म्हणून मग taxi करून आलो... 
काय सांगू ... पाऊस आणि सुसाट वारा ह्याचं जणू जबरदस्त जमल होत... थंडगार वारा... अन तश्याच बरसणाऱ्या गारा... साऱ्या शरीरात शहरा आणत होत्या... पाऊस वाढत होता... छत्री असूनही आम्हाला त्याची गरज नव्हती... आज मन ते गाण गात होत... "भागे रे मन काही ... आगे रे मन काही... जाने किधर जानू ना..." :) खरच आज मन माझ्या ताब्यात नव्हत... बेधुंद वेड पीस ते धावत होत... अनोळखी दिशने... पण अगदी भरारीने... खोडकरपणे मी त्याला विचारल... "इस नाचीझ के साथ आप dance करना पसंद करेंगे...??? " 
तो पण अगदी प्रेमाने... "जरूर" म्हणाला... 
तो जवळ आला ... जेव्हा त्याने खांद्यावर आणि कमरेवर हात ठेवला... काय सांगू... तो मुलायम स्पर्श... इतक्या थंडीत अजून थंड पडले... एक वेगळाच करंट गेला अंगातून... आजूबाजूकडे लक्षच नाही राहील... अन आम्ही नाचत होतो... आमच्या मनाच्या तालावर... तो इतका जवळ होता कि... त्याचा श्वास हि मला ऐकू येत होता... त्याच्या हृदयात होणारी प्रत्येक हालचाल मला जाणवत होती... त्यात अगदी बुडून गेले होते... त्याच्या मिश्किल हसण्यात... शांत पण प्रेमळ स्वभावात... सगळ्यातच... हा क्षण कधी संपूच नये अस वाटत होत... "फक्त तो मी आणि पाऊस" बस इतकाच ह्या जगात उराव...  खरच किती अविस्मरणीय क्षण आहे... 

आपण पहात रहातो खिडकीतून रिमझिमणारा पाऊस पाणी... 
पण तो पाऊस नसतोच मुळी त्या असतात सोबतीच्या  आठवणी...
आपल्याही नकळत आपण खिडकीतून हात बाहेर काढतो...
आणि त्यांना  तळहातावर घेतो....  
पुन्हा पावसात नाही तर त्या क्षणात पुन्हा हरवून जातो... 


सुर्य कधी मावळतीला आला समजलाच नाही... एकमेकांशी फक्त heart to heart बोलत आम्ही तिथून निघालो... 
त्याचा हात धरत ...खांद्यावर डोक ठेवून चालण्यात काही वेगळच समाधान होत... 
पाऊसाने जसा मग वेग घेतला आम्ही छत्री उघडली... त्या एकाच छत्रीत आम्ही अर्धवट भिजत ... एकमेकांवर पाणी उडवत ... खूप मज्जा करत घरी येयला निघालो... 


पावसाच्या सरी...
ओलेचिम्ब झालेलं... मन... 
गोठलेले श्वास...अन... 
हरुदयाचे नाजुक स्पंदन
आणि एक टपोर थेम्ब अलगदच
ओघलला होता... 
तो... मी ... आणि पाऊस  ...
भिजलेला होता....
 
 

SDC
Get Your Own Free Hypster.com Playlist.

4 comments:

Unknown said...

pudhe kuthe firayla janar?????

Unknown said...

blog chan ahe

GST Training Delhi said...

very informative post American state|on behalf of me} as i'm perpetually craving for new content that may facilitate me and my data grow higher.

App Devlopment Company said...

That is an especially good written article. i will be able to take care to marker it and come back to find out further of your helpful data. many thanks for the post. i will be able to actually come back.

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)