“अरे त्याला फोन
केला होता मी आज...” मी अगदी जीव मुठीत धरून सांगितलं त्याला...
त्यावर त्याच अपेक्षित उत्तर... “काय म्हणाला तो??? कशाविषयी बोलले तुम्ही???”...
त्यावर त्याच अपेक्षित उत्तर... “काय म्हणाला तो??? कशाविषयी बोलले तुम्ही???”...
त्याच्या प्रश्नाने
अगदी आतून हादरून गेली मी... आणि सांगितलं... “मला नाही माहित... मला ना मुळी काही
आठवतच नाहीये...”
“वाटलच होत मला...
तू असंच काहीतरी बोलशील म्हणून... अग वेंधळे कितपत मंद असावं माणसाने... जरा जोर
दे अन् आठव...” तो बोलत होता पण खरतर मला फार मोठ कोडंच पडलं... काहीच कसं नाही
आठवत फक्त त्याचा तो “आहा...” बस फक्त तितकंच... महेश तिकडून उत्तराची अपेक्षा करत
तर होता, पण उत्तरच नव्हतं तर त्याला सांगू काय??? आणि किती हे विलक्षण??? काही केल्या
आठवत नव्हत मला... काहीच नाही यद्किंचीतही नाही... तितक्यात तो बोलू लागला...
“तुला काय वाटतं ग
त्याच्या विषयी??? Do u love him???” त्याच्या या सरळ प्रश्नाला मी तयार नव्हते... अगदी
बावरल्यागत झालं मला... अचानक घशाला कोरड पडली... ही एक सवय जी मला आवडत नाही...
स्पष्टव्यक्ता असावं पण इतकं??? समोरच्याच्या भावनांचा काहीतरी तर विचार करावा ना
त्याने??? मुर्ख कुठला... बावळट... मग काय नेहमीसारखंच दिल्या शिव्या त्याला...
“काय समजतोस तू स्वतःला??? ही माझी personal बाब आहे... तू कोण आला विचारणारा??? How dare u???”
“काय समजतोस तू स्वतःला??? ही माझी personal बाब आहे... तू कोण आला विचारणारा??? How dare u???”
मी माझं नेहमीच
हत्यार काढलं... अन् तो घायाळही झाला... चेहरा पडता जरा त्याचा... क्षणभर वाटलं
इतकं तोडून नको बोलायला हव होत मी... त्यालाही तर मन आहे भावना आहेत... किती
दुखावला गेला असेलं तो??? आजवर त्याने तर कधी अस काहीच नाही म्हटलं मला...
बऱ्यापैकी ऐकून घेतो तो माझं... भांडण झालं तरी इतकं पडून नाही बोलत आणि मी??? मन
मला खाऊ लागलं आतून... इतके दिवस त्याला कसं वाटत असेल याची जाणीव झाली मला...
अगदी जखमेवर आलेलं आवरण नखाने ओरबडलं मी... आता काय करू असा विचार करतच होते कि...
‘प्यार हूआ, इकरार
हूआ’ अस गान चक्क मोठ्याने म्हणायला लागला तो... मंद कुनिकडचा किती भावना शून्य
असावं कुणी... काय हा प्रकार??? अन् इथं मला वाटत होत कि... नाही, मेला बोलायच्या
नाही मारायच्याच लायकीचा आहे...
“अग तुला सांगतो हे
प्रेम वैगरे काहीनाही... याला ना infatuation
म्हणतात...” त्याचं बोलण पूर्ण व्हायच्या आतंच
मी त्याला टोकलं... “काय???”, काहीशी अचंभित आणि काहीशी वैतागली होते मी... एकतर
फोनवर काय बोलले आठवत नाहीये अन् हा... मुर्ख, काय बडबडतोय कुणास ठाऊक...
“ अग infatuation, according to freud psychology… infatuation is only a
attraction between male and female. It is state of being completely carried
away by un-reasoned passion, foolish
examined feeling and unappreciated often completely unwanted unwarranted
emotion….” मी तर आवासून बघताच होते...
पण काय अस पुन्हा मी विचारणार नव्हतेच नाहीतर त्याने पुन्हा सार पाठ केलेलं
वाक्य बोलून दाखवलं असत ना... बोलण्यात काहीतरीतर तथ्य तर होतेच... पण...
हसायलाच लागला ना तो मला पाहून... हसत हसत म्हणाला... “तू तेलगु पिक्चर नाही
पाहत ना म्हणून तुला माहित नाही हे... अग पण खरंच होत अस कधी... त्याच्या मनात
काही आहे का नाही हे तुला कसं कळणार??? काही बोलला का तो???” अगदी बोलता बोलता
जोरात हसू लागला... अन् म्हणाला, “अरे हो तुला तर आठवतच नाहीये ना...!!! J J J बर ठीक आहे, कधी काही लिहलं होत का त्याने अस
काही सुचवणार??? चाट मध्ये किव्वा मेल मध्ये???”
काय बोलू काही समजत नव्हतं... अचानक कंदील पेटला डोक्यातला... अन् “हो आहे
कि...” अस म्हणून मी कॉम्पुटर सुरु केला आणि त्याला एक मेल दाखवला... त्यात एक
कविता होती... माझ्यासाठी लिहलेली...
मी तरी काय करू
तूच सांग???
तू आहेस जागी म्हणूनच झोपू शकतो...
तुझीच तर साथ आहे, ज्यामुळे मी जगू शकतो...
मी तरी काय करू तूच सांग???
तुला चिंतेत पाहन जमत नाही मला...
सांगू कस न हिणवता, हे पण तर समजत नाही मला...
मी तरी काय करू तूच सांग???
माझी लहान सहन आवडही लक्षात ठेवते तू...
पण तू मला किती आवडते हे बर विसरते तू...
तुला न विचारताच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मी,
त्यामुळेच तर नेहमीच तुला निरखून बघतोय मी...
तू आहेस जागी म्हणूनच झोपू शकतो...
तुझीच तर साथ आहे, ज्यामुळे मी जगू शकतो...
मी तरी काय करू तूच सांग???
तुला चिंतेत पाहन जमत नाही मला...
सांगू कस न हिणवता, हे पण तर समजत नाही मला...
मी तरी काय करू तूच सांग???
माझी लहान सहन आवडही लक्षात ठेवते तू...
पण तू मला किती आवडते हे बर विसरते तू...
तुला न विचारताच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मी,
त्यामुळेच तर नेहमीच तुला निरखून बघतोय मी...
अगदी तोंड पाठ होती ती मला
... माहितही नाही किती वेळा वाचली असेल मी तिला... अगदी मोजण अशक्य व्हावं
इथपर्यंत...
त्यावर महेश, “हा छान आहे
पण त्यात त्याची तुझ्याबाद्दल्ची ओढ आणि तू त्याची घेतलेली काळजी दिसतेय प्रेम
अथवा जवळीक नाही... आणि हो तू मला शिव्या द्याव्यात किव्वा दरवाजा दाखवावा याच्या
आत मी हे सिद्ध करू शकतो... हे बघ जर त्याने लिहलं असत कि...” बोलता बोलता तो लिहू
लागला... अन् मी डोळे वटारून त्याला पाहत होते, पण जेव्हा मी वाचू लागले...
मी तरी काय करू तूच सांग???
स्वप्नात तू भेटलीस तर स्वप्नातून उठावास वाटणार नाही...
आणि झोपून राहून तुला सत्यात मिळवण मला कादापि जमणार नाही...
म्हणूनच वेळ नाही मला अस कारण तुला सांगतो...
तुला न मला एकत्र आणणारा पूल, त्यावेळेत मी बांधतो...
मी तरी काय करू तूच सांग???
तू & मी, आपण हे स्वप्नावर तर मी जगत आहे...
अन तेच सत्यात आणण्यासाठी मी असा वागत आहे...
काय बोलू मला कळेना... खरंच
यात होती जवळीक, माझ्याबद्दल ओढ, ओतप्रोत प्रेम... त्याने जे बोललं मघाशी ते कळू
लागला मला थोडं थोडं...
“होरे, हे वाचून जाणवतं
मलाही...”
मी पुढे काही बोलणार याच्या
आताच तो म्हणाला, म्हणाला काय अगदी मला दाच्कवत ओरडला...
“सांग पटकन फोनवर काय विषय
होता ते... पटकन पटकन... संपूर्ण संवाद नाही तर विषय सांग...” तो ओरडला म्हणून
किव्वा ती कविता वाचून किव्वा काही अजून कारण ते माहित नाही पण मला आठवलं...
“अरे मी त्याचं अभिनंदन करत
होते... पण कसलं हे नाही आठवत.. खर म्हणजे तो इतका खुश होता कि त्याच्या आवाजात
गुंतून गेले मी अन् ऐकलाच नाही तो काय म्हणत होता ते... किती मी वेडी??? खरंच तो
म्हणतो ते बरोबर आहे... आहेच मी मंद...” मी महेशशी बोलत होते पण खरतर तर मी अन्
माझं मन एकमेकांशी संवाद साधत होत... मी विचारत पडले जी गोष्ट आठवत आठवत नाकी नऊ
आले माझ्या ती गोष्ट याने किती सहजासहजी काढून घेतली माझ्याकडून??? म्हणजे तो ही
बडबड, ते iflatuation का काय ते, ती कविता पूर्ण करणे सारं मला आठवण यावी म्हणून
करत होता??? म्हणजे आजपर्यंत त्याची जी वागणूक मी बालिश आणि मुर्खपणा म्हणून सोडत
होते, ते सगळ तो जाणून बुजून आणि उद्देशपूर्ण पद्धतीने करत होता तर... अन् मी
त्याला या वागण्यामुळे किती वेळा रागावलय... अक्षरशः तुझ्या अश्या वागण्यामुळे
तुझी कधीच प्रगती होऊ नाही शकणार!!! तू असंच एकटाच राहशील!!! वैगरे वैगरे, नाही ते
म्हटलेय... ते सगळ म्हणजे माझी चूक होती तर???
तितक्यात तो फोन जवळ
गेला... loudspeaker सुरु केला आणि redial
केलं...
“अगदी १०० वर्ष आयुष्य...
मी पण तुझीच आठवण काढत होतो... आहा... आहेस ना???” फोनवरून आवाज आला...
काय बोलू??? काय होतंय??? सुरवातीला
कळतच नव्हतं... पण तो “आहा” ऐकला अन् माझं लक्ष उडलं... पुन्हा एकदा...
फक्त तुझ्यासाठी... भाग 20
फक्त तुझ्यासाठी... भाग 20
1 comments:
its really beatyful
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)