Wednesday, August 17, 2011

फक्त तुझ्यासाठी ... भाग १


माझिया प्रियेला प्रीत कळेना' हि एक आगळी वेगळी प्रेम कथा आहे......पूजाने लिहलेली...
त्यामुळेच काहीतरी लिहतोय, वाचा आणि सांगा कस वाटलं ते...
एक निव्वळ प्रयत्न
तीला समजून घेण्याचा....

फक्त तुझ्यासाठी ...
एक मुलगी आहे... शहाणी की वेडी माहित नाही पण आहे तिच्याच सारखी ती...
“ती”...

म्हणतात ना...
 
‘आहे सगळ्यांसारखी पण तरीही आगळी,
दिसते पठनितली पण आहे मात्र वेगळी...’
अशीच काहीशी आहे मी...
 
जगावं कस हे स्वतःनेच ठरवाव, आणि जेव्हा जस् वाटेल तस करावं असंच जगते मी...
त्रिकोणाचा चवथा कोण नाही शोधत मी, पण हा!!! तिन्ही कोनांचे निरीक्षण जरूर करणार...
मुंबईची आहे ना काय करणार, घाटकोपरच पाणीच अस आहे, मान्यय संत तेरेसा नावाच्या शाळेत शिकलीय १०वी पर्यंत, पण स्वभाव मात्र जरासा वेगळाच तेरेसांपेक्षा...

पण आता नाही राहत मुंबईत, आता संगणक क्षेत्रात काम करत आहे मी, पण परदेशात... ताई आहे माझ्याजोडीला, ती पण असते परदेशातच, तीच लग्न झालंय, जाते वरचेवर तिला भेटायला पण एरवी एकट जाणवत...

मराठी कविता किव्वा चारोळ्या आवडतात वाचायला आणि लिहायलाही... कुठेतरी छानसं वाचव आणि त्यात काही वेळ जगावं अस वाटत मला... त्यामुळे इंटरनेटवर असते मी नेहमीच... orkut तर माझी आवडती जागा आहे, विसावा घेण्यासाठी, जगण्यासाठी आणि नवीन क्षितीज शोधण्यासाठी...  
आपल नसूनही आपलच असणार जग
,  आवडत या जगात राहायला जगायला... माझं विश्व तयार करायला... ज्यात मी अन् माझे विचार मनाप्रमाणे फिरत असतात...

माझे आपले साधे विचार...खूशच राहावं अस काही माझा नियम नाही... आपत्ती पण यावी अधून मधून... पण आपत्तीपण अशी यावी की समोरच्याला हेवा वाटावा, माझा पूर्ण कसं लागावा... पडायचच असेल तर ठेच लागून काय पडाव बरं... मस्त २००० फुटावरून पडावं... बघणाऱ्यांना कळू तर देत किती उंचावर होते मी... 


फक्त तुझ्यासाठी ... भाग 2
 



SDC
Get Your Own Free Hypster.com Playlist.

5 comments:

Chetan Mahajan said...

Very GooD....!

Hemant said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

kharach chan suruvat ahe blog chi

Unknown said...

Mast, Ek no, amazing

Yogesh Sonawane said...

Excellent keep going .. Yogesh Sonawane

Post a Comment

तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)