फक्त तुझ्यासाठी ... भाग 2 |
ऑफिसला इंटरनेट आहे, वापरता येत, पण orkut, gmail बंद आहेत, म्हणून yahoo अंगवळणी पडलंय... ऑफिसला काम कमी असलं तर बघत बसते yahoo, त्यावरील समूह, कुणी काय लिहलय... सार सार वाचायला आवडत मला... समूह, गप्पा यांबरोबर अजून भरपूर असत असत, प्रोफाइल वरील चित्र पण भरपूर काही बोलून जातात... मी माझ्यासाठी चित्र शोधलं होत छानसं, सुंदर फुलाचा डीपी... त्या फुलावर बसलेला भ्रमर...
आयुष्यच मांडलं होत, फुल म्हणजे हे सार जग आणि भ्रमर म्हणजे मन, जीथ चांगलं वाटेल, तिथ जाऊन थांबणार... हवं तेवढा वेळ हवं तस...
आयुष्यच मांडलं होत, फुल म्हणजे हे सार जग आणि भ्रमर म्हणजे मन, जीथ चांगलं वाटेल, तिथ जाऊन थांबणार... हवं तेवढा वेळ हवं तस...
मन हे जगाच्या चालींवर चालत नाही,
जगाच्या पद्धती ते कधीच मनात नाही.
मन तर स्वच्छंद पक्ष्याप्रमाणे सैरवैर उडत राहत,
गगनाची उंची वा सागरही खोली सगळीकडे फिरत राहत.
सर जग मनासाठी अनेकदा कमी जाणवत,
अशा वेळी मन स्वतःच नवीन जग बनवत...
असंच आपल् सुरु होत, रोजचच वेळापत्रक... ऑफिसातून आले...
खूप थकली होती, पण तरीही माझ्या आवडत्या विश्वाचा फेरफटका मारावासा वाटला म्हणून लावल orkut, छान समूह चर्चा बघता बघता एक चारोळी वाचली,
खूप थकली होती, पण तरीही माझ्या आवडत्या विश्वाचा फेरफटका मारावासा वाटला म्हणून लावल orkut, छान समूह चर्चा बघता बघता एक चारोळी वाचली,
नेहेमीच जे हव ते मिळत नसत
काहीतरी हातातून सुटत असत
कधी कधी ते नकळत सुटत
तर कधी आपणहून सोडावं लागत ..!!
छान वाटली, त्याहूनही जास्त खरी वाटली, पण आपल्याला काय त्याच???
काही आहेच नाही, तर सोडव लागूच शकत नाही ना...
काही आहेच नाही, तर सोडव लागूच शकत नाही ना...
अचाकन जरा शांतता वाटली, तसा काही जास्त वेळ झालेला नव्हता, आताच तर आलीय ऑफिसातून पण अमावास्येसेची रात्र वाटू लागली...
इतक्यात लक्ष गेल तर “तो” निरागस चंद्रमा online दिसला....
इतक्यात लक्ष गेल तर “तो” निरागस चंद्रमा online दिसला....
तोच...... {असंच एकदा भटकत भटकत मन आल एका समूहावर, छान वाद-विवाद किव्वा संवाद सुरु होता, त्यातील एक उत्तर आवडलं, उत्तर देणाऱ्याच भित्तीचित्र (dp) फार आवडलं, “एक निरागस चंद्रमा”
काहीतरी वेगळीच भुरळ पडली त्या उत्तराने आणि त्या चंद्रानेही, म्हणून त्याचा प्रोफायील चाळला, का कुणास ठाऊक मनात आलं "एक निरागस चंद्रमा "... तशीच याच्या चेहेर्यावरची निरागसता असेलं... कोण जाने कुठून पण इच्छा झाली मैत्री करावी... म्हणूनच request पाठवली होती... आणि त्यानंही add केलं, १ - २ दिवसातंच, ओळख वैगरे काही नव्हती पण ती निरागसता मला फार आवडली होती... (फोटोची)
तस request पाठवन्यात मला काही वागव नाही वाटलं... जे मनाला वाटलं ते करावं आपण, वाट्टेल तस रहाव असच काहीस आम्हा मुंबय्या मुलींना वाटतं...
त्याला पिंग केल.......{तो उत्तर देईल का? आपण तर नाही ओळखत त्याला...... नाही reply केला तर???
असा विचार करणारी मी नाही... त्यामुळे मनात आलं आणि पिंग केल...}
त्यांनही उत्तर दिल, असंच थोडी विचारपूस केली... पाच मिनिटांच संभाषण होत ते... पण परत बोलायची इच्छा बाळगणार... अन् उगीचच मनाला आनंद देणार... छान वाटलं... त्याला घाई होती कसली तरी अन् मीही जास्त नाही ताणलं...
जरा फ्रेश होऊन आली अन् पुन्हा चारोळ्या हाताळायला लागली...
तो अन ती ...
{छान समूह आहे, कुणीतरी लिहत मग आपण त्याला साजेस लिहायचं अन् उत्तराची वाट पाहायची...}
{छान समूह आहे, कुणीतरी लिहत मग आपण त्याला साजेस लिहायचं अन् उत्तराची वाट पाहायची...}
ती— सरीवर सर बरसतच राहते
भिजलेली वाट निसरडी होते,
पुन्हा तुझ्या मिठीत येतांना,
सर पुन्हा भिजवत असते...
तो— तुला भिजवायला सये, सारिला मीच पाठवत असतो,
भिजून चिंब व्हावीस अन् अलगद मिठीत यावीस हेच मागत असतो...
तू मिठीत आलीस की सखे, मीच माझा उरत नाही,
तुला भिज्वल्याशिवाय, पावसाचही मन भरत नाही...
ती— भिजले होते मी खरंय, पण पावसाने नाही तुझ्या प्रेमाने,
शहारला होता कण अन् कण, गारव्याने नाही, तुझ्या स्पर्शाने...
तो— सार जग मागे राहील, मी राजा अन तू माझी राणी,
ओठांच तर ठाऊक नाही पण मन नक्कीच गातय गोड गोड गाणी...
मजा येते... खूप मजा येते...
नंतर जेवली अन् झोपले मी...{तस लवकर झोपण हा प्रकार ठाऊकच नाही मला...}
मजा येते... खूप मजा येते...
नंतर जेवली अन् झोपले मी...{तस लवकर झोपण हा प्रकार ठाऊकच नाही मला...}
2 comments:
charolya khupach sundar ....manala bhidnarya aahet!
Sagar,
khupach chhan zali suruvat.... M really impressed. Aata paryant kiti tari vela tu sangital pan mi kadhich seriously vachal navhat... But he vachalyavar, kahi kal bhan harapale hote...
Its really wonderful.
Post a Comment
तुमचा प्रतिसाद नक्की इथे लिहा...:)